www.upkarmarathi.com
गरज आहे क्षमता आधारित शिक्षणाची
शिक्षण म्हंटले की डोळ्यासमोर येते ती व्यापक संकल्पना .या संकल्पनेबरोबर आठवते म्हणजे शाळा, बालपण, अनेक नव्या जुन्या आठवणी, शाळेतील पहिला दिवस, शिक्षकांबद्दल मनात असणारी आदरयुक्त भिती, बालपणीचे मित्र आणि अजुन बरच काही.
या शिकण्याला साचेबद्ध करण्याचा इतिहास तसा १६ व्या शतकापासून सुरु झाला. अमेरिकेमध्ये १६३५ च्या आसपास पहिली सार्वजनिक शाळा "बोस्टन लँटिन" सुरु झाली ही शाळा सुरु करण्यामागे तेथील राज्यकर्त्यांचे दोन महत्वपूर्ण उद्देश होते यात “वैचारिक गुलामगिरी व दैववाद” या मुख्य गोष्टी होत्या.
राजाला राजा संबोधने व राजापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही, राजाची आज्ञा मानने, हे त्याकाळी मुलांमध्ये रुजवण्यास सुरूवात करण्यात आली.
पुढे पुढे या साचेबद्ध शिक्षणात मुलांचा शिकण्याच्या अर्थाने खुप काही विचार केला गेला नाही. राज्यकर्त्याना ज्या गोष्टि हव्या होत्या त्या या साचेबद्ध शिक्षणातून देण्याचा विचार रुजवण्यास सुरूवात झाली, पुढे असे लक्षात येते की , शिक्षणात “दैववाद, साचेबद्धता, धर्मवाद, औद्योगिक क्रांति, नोकरशाही” या गोष्टीला महत्व देण्यात येऊ लागले, मुलांनी फक्त तेवढाच विचार करावा हे हेतुपुरस्करपणे राबवन्यात येऊ लागले परिणामी तसे धोरणे राज्यकर्त्यांकडुन आखण्यात येऊ लागले.
भारताचा विचार केला तर आपल्या लक्षात येते की ,स्वातंत्र्यपूर्व कालखंडात ब्रिटिश राजवटीकड़ूंन भारतीयांना कारकुनी शिक्षण दिले जात असत. याचा उद्देश स्पष्ट होता की , भारतीयांनी फक्त तेवढाच संकोचित विचार करावा व त्यातच आपले समाधान मानावे. अशा शिक्षणात मुलांना व्यक्त होण्याला मर्यादा येऊ लागल्या.
एका फ्रेंच शिक्षकाने आपल्या २५ वर्षाच्या शिक्षकी पेशात मुलांना केलेल्या शिक्षेबद्दल आपल्या रोजनिषित लिहले की, मी किती वेळेस मुलांना शिक्षा केली हे ज्या वेळेस त्या शिक्षकाने मोजले तर त्याच्या लक्षात आले की मी माझ्या शिक्षकीय कार्यकिर्दीत १०.३ लाख वेळेस काठीने, ९ लाख वेळेस सळईने व ४.५ लाख वेळेस शारीरिक इजेने मुलांना शिक्षा केली. अशा घटना इतिहासात घडल्या आहेत परंतु खरच मुल शिक्षेतून शिकतात का? तर याचे उत्तर नकारार्थी येईल यात शंका नाही.
असे असतांना देखील मुलांच्या शिक्षणात शिक्षा का असावी ? मुलांचे "शिक्षण" म्हणून का इतरांणी ठरवावे, मार्केटला ज्या शिक्षणाची गरज आहे तेच शिक्षण का दिले जावे? यांची खरच गरज आहे का? पालक म्हणून मी मुलांना स्पर्धेचाच अट्टहास का धरतो यांची उत्तरे आजही मिळत नाही.
आजच्या आपल्या शिक्षण पद्धतीतही विषयनिहाय शिक्षणावर भर दिला जातो. Content या घटकाला येवढे महत्व का? मुलांच्या शिक्षणात क्षमता आधारित शिक्षणाचा विचार का होत नाही. यातुन मुल खरच शिकत आहे का?
आपण शिक्षण घेतलेले क्षेत्र व त्याचा प्रत्यक्ष जीवनात होणारा उपयोग हा नेहमी चर्चेचा विषय राहिलेला आहे.
“१० शिक्षकांच्या एका गटाला तूम्हाला कशाची आवड़ आहे” हा साधा प्रश्न विचारण्यात आला त्यापैकी फक्त एका शिक्षकाने मुलांना शिकवायला आवडते हे उत्तर दिले तर उर्वरित ९ शिक्षकानी दिलेली उत्तरे शिक्षकी पेशाच्या पलिकडिल विचारांची होती. या उदाहरणाने स्पष्ट होते की , ज्या विचाराबद्दल आपल्याला आवड नाही तो विषय अथवा विचार आपल्याला रटाळवाणा वाटतो, त्यात कल्पकतेला खूप कमी संधी असते. हे का घडले असेल तर त्यांच्या बालपणी त्यांच्यावर ते लादले गेले," तुला तेच करायचे आहे जे “राज्यकर्ते, समाज, कुटुब ठरवेल”.
हे का होत असेल याचा थोड़ा बारकाइने विचार केल्यास असे निदर्शनास येते की, आपल्या मानसिकतेत व शिक्षण पद्धतीत काही अंशी बदल होणे आवश्यक आहे.
एक छान लेख वाचा : जाणीव
हे बदल मुख्यत्वे मुल समजून घेणे, शिकने ही प्रक्रिया म्हणून बघणे, शिकण्यासाठी मुलांना पोषक वातावरण तयार करून देणे. त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणात पुढील बाबी विचारात घ्याव्या .ज्यात शिक्षण, क्षमता, शिकणे , अभ्यास, आवड़, कौशल्य, विषय यांचा समावेश असणे आवश्यक आहे.
जागतिक शिक्षणाचा व भारतीय शिक्षणाचा विचार केल्यास असे निदर्शनास येते की बऱ्याचदा विषयनिहाय शिक्षणाला प्राधान्यक्रम दिला जातो. तो काही अंशी ठेवून मुलांच्या शिकण्यात “क्षमता व कौशल्य “ यांचा आधार घेऊन शिक्षणाच्या प्रक्रियेत बदल घडवणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या या प्रक्रियेचा अंगीकार करून हा बदल स्वतःपासून सुरु झाला तर भविष्यात येणाऱ्या पिढीला हा बदल महत्वाचा व पोषक वाटनार आहे. या बदलात शिक्षणात शिकणे होते, त्यात मुलांना अनुभव दिले जातात, मुलांच्या क्षमताना वाव मिळतो असे शिकणे शिक्षणातून देऊ असा विश्वास आहे. चला तर सर्व मिळुन हा पुरोगामी नव विचार करू. तो प्रत्यक्षात शिक्षणात उतरवण्याचा प्रयत्न करू.
*धन्यवाद,*
*राहुल मिसाळ,*
*"लेखक शैक्षणीक क्षेत्रातील अभ्यासक आहेत"*
९०१११२६८१४
Nice very nice thought
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.