www.upkarmarathi.com
सर्व मंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्रंबके गौरी
नारायणी नमोस्तुते
सर्व मंगल कार्य सिद्ध करणारे तू मंगलमई आहेस. हे मंगलकारिणी नारायणी माते तुला माझे कोटी कोटी नमन.हे जगदंबे माता तू या संपूर्ण जगाची आई आहेस आणि या संपूर्ण जगामध्ये सर्व स्त्रिया तुझेच प्रतिरूप आहेत.
- |नवरात्र उत्सवाचे महत्व
Navratri information in Marathi, भारत देश म्हणजे अनेक सण आणि उत्सवांची खाण आहे. या उत्सवांमध्ये दीपावली नंतर नवरात्र या उत्सवाला देखील महत्त्वाचे स्थान आहे. नवरात्र या नावाप्रमाणेच हा उत्सव नऊ दिवसांचा असतो. नवरात्रि संपल्यानंतर दहाव्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो. हिंदू संस्कृती मध्ये साजरे केले जाणारे सर्वजण हे वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात, परंतु नवरात्र या सणाची शान मात्र काही वेगळीच आहे. यात जो भारदस्तपणा असतो त्यामुळे सर्वच जण नवरात्र सणाची आतुरतेने वाट बघत असतात. आपल्या लाडक्या गणरायाचे प्रस्थान झाल्यानंतर सर्वांना आई जगदंबेच्या नवरात्रोत्सवाचे वेध लागतात.
या दरम्यानच्या काळामध्ये येणारा पितृपक्ष त्याला आपण महालय असेदेखील म्हणतो कधी संपून जातो हे आपल्याला जाणवत देखील नाही.
| देवीची नऊ रूपे
- पहिले रूप शैलपुत्री
- दुसरे रूप ब्रह्मचारिणी
- तिसरे रूप चंद्रघंटा
- चौथे रूप कुष्मांडा
- पाचवे रूप स्कंदमाता
- सहावे रूप कात्यायनी
- सातवे रूप कालरात्री
- आठवे रूप महागौरी आणि
- नववे रूप सिद्धिदात्रीी
नवरात्रीतील नऊ माळा व फुले
पहिली माळ
शेवंती किंवा सोनचाफा यासारख्या पिवळ्या फुलांची
दुसरी माळ
चमेली ,मोगरा ,अनंत किंवा तगर सारख्या पांढऱ्या फुलांची
तिसरी माळ
कृष्णकमळ किंवा गोकर्णा सारख्या निळ्या फुलांची
चौथी माळ
केशरी किंवा भगवी फुले अबोली तेरडा अशोक किंवा तिळाची फुले
पाचवी माळ
या दिवशी देवीला बेल किंवा कुंकवाची
सहावी माळ
कर्दळीच्या फुलांची माळ
सातवी माळ
झेंडू किंवा नारंगीची फुले
आठवी माळ
तांबडी फुले (जास्वंद कमळ कन्हेर किंवा गुलाब )
नववी माळ
या दिवशी कुंकुमार्चन करतात
नवरात्री घट माळ
- पहिली माळ (गुरुवार)- विड्याची पाने
- दुसरी माळ (शुक्रवार)-बेल धोतरा रुई
- तिसरी माळ (शनिवार)-दूर्वा झेंडू
- चौथी माळ (रविवार) -मोगरा जाई जुई
- पाचवी माळ (सोमवार) -तुळशी
- सहावी माळ (मंगळवार)-गुलाब कमळ
- सातवी माळ (बुधवार )-शेवंती कृष्ण कमळ
- आठवी माळ (गुरूवार) -लाल जास्वंद
- नववी माळ (शुक्रवार)-लिंबूू
| नवरात्रीत प्रत्येक वारी देवीला कोणता नैवेद्य द्यावा ? हे देवी भागवतात सांगितले आहे ते पुढीलप्रमाणे
- सोमवार - गायीचे तूप
- मंगळवारी - केळी
- बुधवारी -लोणी
- गुरुवारी -खडीसाखर
- शुक्रवारी -साखर
- शनिवारी -गाईचे तूप
- रविवारी -पायस म्हणजेच खीर
याबरोबरच नवरात्रात प्रामुख्याने दुर्गा स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक, कनक स्तोत्र ,राम रक्षा ,देव्यपराध स्तोत्र, श्रीसूक्त, शालिनीदुर्गासुमुखी स्तोत्र इत्यादी स्तोत्रांचे यथाशक्ती पठण केले पाहिजे.
नवरात्रीची प्रथा आणि परंपरा
नवरात्री बहुदा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात येत असते. आपल्या पारंपारिक रिवाजाप्रमाणे नवरात्रोत्सवाची स्थापना केली जाते. घराघरांमध्ये तसेच मंदिरांमध्ये देवी दुर्गेच्या प्रतिमेची स्थापना व पूजा केली जाते. प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या प्रकारची फुले आणि नैवेद्य अर्पण करतात. देवीला वेगवेगळ्या दिवशी कोणती फुले आणि नैवेद्य अर्पण करतात याविषयी आधीच माहिती दिलेली आहे. कृपया नीट वाचून घ्या.
नवरात्रीच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये देवीच्या कुमारी ,पार्वती आणि काली रूपाचे पूजन केले जाते.
|घटस्थापना कशी करतात (घटस्थापना 2021)
घटस्थापना करण्यासाठी एक लाकडांच्या काड्या पासून बनवलेल्या टोपलीमध्ये माती भरली जाते. या मातीमध्ये प्रकारचे धान्य टाकतात. टोपलीत व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर यामध्ये एक तांबे या धातूचा तांब्या ठेवला जातो. या तांब्या मध्ये पाच विड्याची पाने गोलाकार ठेवतात आणि त्यावर नारळ ठेवतात. घटाची पूजा केली जाते. तांब्याला पाच बाजूने कुंकवाच्या उभ्या रेषा मारल्या जातात.
प्रत्येक दिवशी या घटाची पूजा करून त्यावर फुलांची माळ चढवली जाते. देवीच्या या घटाजवळ दहा दिवसांसाठी सुंदर दिवा लावला जातो. हा दिवा अखंड तेवत राहण्यासाठी माता भगिनी विशेष काळजी घेतात.
घरातील जे व्यक्ती व्रत करतात त्यांनी नऊ दिवस उपवास किंवा योग्य ते भोजन करून व्रताचे पालन करायचे असते.
|महानवमी
नवरात्र हा नऊ दिवसांचा सण आहे. माता दुर्गा हे या व्रताची मुख्य देवता आहे. नवरात्री मधील नव्या दिवसाला दुर्गा नवमी किंवा महानवमी असे म्हटले जाते. उद्यापनाच्या दिवशी कुमारिकांना यांना नैवेद्य दाखवून भोजन घातले जाते.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.