www.upkarmarathi.com
|पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे तुमच्या शब्दात सांगा
पुस्तके ही माणसाची खरे मित्र असतात असे म्हटले जाते याला कारणही तसेच आहे. पुस्तक म्हणजे केवळ काहीतरी लिहिलेल्या किंवा छापलेल्या कागदांचा संच नाही. पुस्तकांना देखील जीव असतो. प्रत्येक पुस्तकाचा स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. आपण जसे इतरांशी बोलण्यासाठी उत्सुक असतो त्या पद्धतीने पुस्तके देखील आपल्या बरोबर बोलण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात. फक्त आपण त्यांच्याशी बोलण्याची गरज असते संवाद साधण्याची आपण तसदी घेतली तर पुस्तकं सारखा चांगला मित्र जगात दुसरा शोधूनही सापडणार नाही.
एकदा का पुस्तकांशी आपली मैत्री जुळली एक नातं निर्माण झालं की मग पुस्तके आपल्याला फक्त देत राहतात आणि आपण पुस्तकां कडून फक्त घेण्याचं काम करायचं. देवाने सर्वांना एकच आयुष्य दिले आहे परंतु या दिलेल्या एका आयुष्यामध्ये आपण अनेक आयुष्याचा आनंद ह्या पुस्तकांच्या मदतीने घेऊ शकतो.
पुस्तके विविध प्रकारची असतात. ऐतिहासिक, सामाजिक ,सांस्कृतिक, विनोदी इत्यादी. प्रत्येक पुस्तकाशी आपली मैत्री जोडली तिथे पुस्तक आपल्याला त्या पद्धतीचा आनंद देते. शिवाजी महाराजांवर आधारित पुस्तक वाचायला लागलो की पुस्तकातील शब्द जिवंत होता पुस्तकाच्या शब्दाशब्दातून इतिहास आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. आपण इतिहासाच्या मनोहर कालखंडामध्ये डोकावून बघू शकतो.
जंगलांचे आणि निसर्गाचे वर्णन वाचताना रंगीबिरंगी पशुपक्षी सुंदर सुंदर फुले घनदाट अरण्य सृष्टीचे मनोहारी रूप प्राण्यांशी संवाद साधतो. पक्षांशी संवाद आपण साधतो. हजारो प्रकारच्या प्राणी आणि पक्षांविषयी माहिती आपल्याला पुस्तकांमुळे होत जाते आणि आपल्या ज्ञानामध्ये प्रचंड भर पडते.
पुस्तकांशी मैत्री केल्यानंतर सतत आपले व्यक्तिमत्त्व सुधारण्याची आपल्याला सवय लागते. स्वतःचे परीक्षण करणे. परिवारामध्ये वागताना आपले वर्तन कसे असावे इत्यादी विषयीचे साधक-बाधक ज्ञान आपल्याला येत असते.
विनोदी कथा किंवा लेख वाचताना आपण भन्नाट आणि गमतीदार लोकांच्या विश्वामध्ये हरवून जातो. अडचणींना किंवा समोर आलेल्या प्रत्येक प्रसंगाला हसत-खेळत कसे उत्तर द्यावे हे आपल्याला अशा पुस्तकांमधून शिकायला मिळते.
उत्तमोत्तम लोकांची चरित्रे वाचताना प्रतिकूल परिस्थिती आणि थोरामोठ्यांचे कार्य आपल्याला अंतर्मुख केल्याशिवाय राहत नाही. स्वतःच्या गुण दोषांकडे तटस्थपणे बघण्याची शक्ती आपल्याला पुस्तके देतात मुळे पुस्तकांशी मैत्री करणे म्हणजे आपल्या हातामध्ये कल्पवृक्ष मिळण्यासारखे आहे.
पुस्तक हे आयुष्याला श्रीमंत आणि संपन्न करणारे ज्ञान भांडार आहेत. या ज्ञान भांडारातून आपले मनोरंजन होतेच आणि जाणिवा देखील प्रगल्भ होत जातात. एक बहुआयामी व्यक्तिमत्व निर्माण होण्यामध्ये पुस्तकांशी मैत्री हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.
ज्या पद्धतीने आपल्या शरीराचा विकास होण्यासाठी आवश्यक असणारे हे सर्व घटक आणि जीवनसत्वे अन्नातून मिळतात तसेच पली मन आणि बुद्धी यांच्या योग्य भरण पोषणासाठी आवश्यक असणारे सर्व सत्व केवळ पुस्तकेच देतात. म्हणून पुस्तकांशी मैत्री करा.
पुस्तके केवळ कागदांवर छापलेला मजकूर नाही पुस्तके प्रकाशवाटा दाखविणारे मित्र असतात. त्यांच्याशी नातं जोडायलाच हवं.
थोडक्यात सांगायचे झाले तर खालील प्रमाणे आपल्याला मुद्देसूदपणे ,पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे सांगता येतील.
|पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे
- परिस्थितीचे आकलन करण्याची जाणीव निर्माण होते.
- समोर आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी सर्व बाजूने विचार करण्याची क्षमता निर्माण होते.
- व्यक्तिमत्व बहुआयामी बनते.
- विनोद बुद्धीचा विकास होतो.
- संभाषण कौशल्य वाढण्यासाठी महत्त्वाचा असा शब्दसंग्रह वाढतो.
- लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी योग्य पद्धतीने संवाद साधण्याची कला निर्माण होते.
- सौंदर्यदृष्टी विकसित होते.
- पुस्तकांशी मैत्री केल्याने मनुष्य बहुश्रुत होतो.
- जगातील विविध प्रकारच्या नैसर्गिक परिस्थितीची आणि घटकांची माहिती मिळते.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.