www.upkarmarathi.com
 
    संपूर्ण पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्राणी व वनस्पती आपल्याला आढळून येतात. प्राणी आणि वनस्पती दोन्हीही सजीव आहेत. मग नेमके सजीवांची लक्षणे कोणती हे आपण आता बघुया.

सजीवांची लक्षणे

सजीव नेमक कोणाला म्हणायचं ? हे आपण आता खालील लेखामध्ये बघूया.



|सजीवांची प्रमुख लक्षणे

  1. पेशीमय रचना
  2. हलचाल
  3. चेतना क्षमता
  4. प्रजननक्षमता 
  5. वाढ
  6. श्वसन
  7. उत्सर्जन
  8. मृत्यू

|पेशीमय रचना :- 

    ज्यावेळी आपण खडूने फळ्यावर लिहितो, एखादे लाकूड कापतो त्यावेळी त्याचे बारीक कण खाली पडताना दिसतात . म्हणजेच खडू किंवा लाकूड  अशाच बारीक कणांपासून बनले असतात. अगदी त्याप्रमाणेच सजीवांचे पूर्ण शरीर देखील पेशींचे बनलेले असते.
     पेशी अत्यंत सूक्ष्म असतात. सजीवाचे शरीर तेवढे आहे यावरून पेशींची संख्या कमी अधिक असते. म्हणजे हत्ती सारख्या या प्राण्यांमध्ये पेशींची संख्या जास्त असणार त्याच्या तुलनेत मुंगीच्या शरीरात पेशींची संख्या अत्यंत कमी असणार.
      क्लोरेला, यीस्ट, पॅरामेशिअम ,अमिबा सजीवांचे शरीर तर एकाच पेशीपासून बनलेले असते. म्हणून त्यांना एक पेशीय सजीव असेदेखील म्हणतात. तसेच घोडा माणूस पक्षी पेरूचे झाड आंब्याचे झाड सजीवांचे शरीर अनेक पेशींपासून बनलेले असते म्हणून यांना बहुपेशीय सजीव असे म्हणतात.
       सायकल, छत्री ,मोटार या वस्तू निर्जीव आहेत. निर्जीवांमध्ये पेशीमय रचना नसते.

|हालचाल


      फुलपाखरू फुलांवर उडतं महाराज चालतो बेडूक उड्या मारतो मासा पाण्यात होतो हे चालणे, उठणे ,बसणे ,बोलणे या सर्व क्रियांना हालचाल म्हणतात. सजीव हे स्वतःहून म्हणजेच स्वयंप्रेरणेने हालचाल करू शकतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. वनस्पती जागा सोडू शकत नाही परंतु त्यांची हालचाल जागच्या जागीच होत असते. विली घराच्या दिशेने आपोआप झुकतात ही एक प्रकारची हालचालच आहे.
    निर्जीव वस्तू स्वतःहून हालचाल करत नाही. गाड्या इकडून तिकडे जातांना आपल्याला दिसतात परंतु गाड्या स्वतःहून चालत जाऊ शकत नाही.

|चेतनाक्षमता


   चेतना मिळाल्यानंतर प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता असे म्हणतात . निर्जीव पदार्थांमध्ये  या क्षमतेचा अभाव असतो.
    आपल्याबरोबर जशी क्रिया घडते त्यावर आपण तशी प्रतिक्रिया करत असतो. जसे खेळताना तुम्ही जिंकलात तर तुम्हाला आनंद होतो आणि तुम्ही मोठमोठ्याने ओरडू लागतात. जर तुम्हाला चटका बसला तर तुम्ही जोरात हात बाजूला घेता आणि आई ग असे ओरडता. ही प्रतिसाद देण्याची क्षमता आहे इलाज चेतना क्षमता असे म्हणतात.
       एखाद्याने तुमच्या कानाखाली वाजवली तर तुम्हाला काहीच फरक पडणार नाही असे अजिबात होणार नाही. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार काहीतरी प्रतिउत्तर कराल हीच झाली चेतना क्षमता.
     परंतु खेड्यांमधल्या बाहुलीला किंवा बाहुल्याला तुम्ही कितीही कानाखाली मारल्या तरी तुम्हाला पुन्हा कानाखाली मिळणार नाही कारण तो बाहुला किंवा बाहुली निर्जीव आहेत त्यांच्यामध्ये चेतना क्षमता नाही.

 |वाढ

     अनेक वर्षापूर्वी जेव्हा तुमचा जन्म झाला तेव्हा तुम्ही लहान होतात परंतु आता मोठे झालात.पण तुम्ही ज्या खेळण्यात बरोबर खेळत होतात ती खेळणी मात्र अजूनही तेवढेच आहेत याचे कारण काय? कारण की ते निर्जीव आहेत.
     निर्जीव वस्तूंची वाढ होत नाही .सजीवांची वाढ होत राहते. एकाच दगड अनेक दिवस एकाच ठिकाणी पडून राहिला तरीदेखील त्याची वाढ होणार नाही. वृक्ष देखील वाढत राहतात म्हणून वृक्ष सजीव आहेत.

|श्वसन

    श्वसन हे सजीवांचे एक प्रमुख लक्षण आहे.सजीव श्वसन करतात. निर्जीव श्वसन करत नाहीत. प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. उंदीर बैल मनुष्य हे नाकाने हवेतील ऑक्सिजन वायू शहरात घेतात आणि कार्बन डाय ऑक्साईड वायू बाहेर सोडतात. वनस्पती सुद्धा हीच क्रिया त्यांच्या अवयवांवर जे बारीक छिद्र असतात त्या द्वारे करतात.

|प्रजनन किंवा पुनरुत्पादन


   सजीव पिलांना जन्म देतात. म्हणजेच सजीव आपल्यासारखाच दुसरा जीव निर्माण करू शकतात यालाच प्रजनन असे म्हणतात. गाय ,म्हैस, मांजर, कुत्रा यासारखे प्राणी पिलांना जन्म देतात तर पक्षी अंडी देखील घालतात. या अंड्यांमधून पुन्हा नवीन सजीव बाहेर येतो यालाच पुनरुत्पादन असे म्हणतात.
   

|उत्सर्जन


     उत्सर्जन म्हणजे शरीराला निरुपयोगी असणारे पदार्थ शरीराबाहेर टाकणे. सचिव त्वच्या फुप्फुसे मूत्रपिंड आतडे यांच्यामार्फत उत्सर्जन करतात. आपल्याला घाम येणे मलमूत्र विसर्जन करणे हे सर्व उत्सर्जनाच आहे .वनस्पती अन्न तयार करत असताना अनेक पदार्थ तयार होत असतात या पदार्थांची वनस्पतींना पोषणासाठी गरज नसते असे पदार्थ वनस्पती बाहेर टाकून देतात.
    बाभूळ शेवगा कडुलिंब अशा वनस्पतींच्या गोडाऊन मधून डिंक बाहेर येतो हे वनस्पतींनी केलेले उत्सर्जनाच आहे.

|मृत्यू

    सजीवांच्या जीवन काळ सर्वसाधारणपणे ठरलेला असतो. सुरुवातीच्या काळात सजीवांमध्ये वाढ होते . वाढ पूर्ण झाली की सजीव प्रजननक्षम होतात. मग ते नवीन सजीवांना जन्म देतात. काही काळानंतर त्यांचे अवयव क्षीण होत जातात व शेवटी त्यांची जीवन क्रिया थांबते म्हणजे त्याचा मृत्यू होतो.
     सर्व सजीवांना मृत्यू येतोच. त्यामधून कोणाचीही सुटका नाही. प्राण्यांची आणि वनस्पतींची सुद्धा आयुष्य मर्यादित असते. वेगवेगळ्या प्राणी आणि वनस्पतींची आयुष्याची मर्यादा वेगवेगळी असते. काही झाडे अनेक वर्ष जगतात. तर काहींचा जीवनकाल कमी असतो.
   


    





 

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने