www.upkarmarathi.com
खाली दिलेल्या चित्रातील कविता वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
प्रिय पालक ,विद्यार्थी तसेच शिक्षक बांधव आपल्या पाल्यांना किंवा विद्यार्थ्यांना या प्रश्नपत्रिका सोडवायला सांगा. त्यामुळे त्यांचा खूप चांगला अभ्यास होईल.
कवितेचा अर्थ वाचा.
या कवितेमध्ये कवी म्हणतात की आपण सगळे या धरतीची लेकरे आहोत. शेतकरी वर्गाचे देखील या कवितेमध्ये वर्णन करण्याचा कवीने प्रयत्न केलेला आहे.
आपल्या धरतीची लेकरे आहोत आणि खरोखर भाग्यवान आहोत.
आपण सगळे शेतामध्ये जाऊया आणि आनंदाने कष्ट करू या .गाणे गाऊ या. जसे शेतामध्ये पक्षी गातात तसे आपण आनंदाने गाऊ.
वर्षभर शेतामध्ये आपण कष्ट करतो, घाम गाळतो. आपल्या कष्टाच आपल्याला फळ मिळतं.
आपल्या कष्टामधूनच शेतामध्ये सुंदर पिक येते. हे पीक शेतामध्ये आनंदाने डोलताना बघून मनाला खूप आनंद होतो.
शाळु आणि जोंधळा यांची पिके शेतात जेव्हा डोलत असतात तेव्हा ते मोत्यासारखे चमकत आहेत असे वाटते. शाळु आणि जोंधळ्याच्या पिकावर ज्यावेळी ऊन पडते तेव्हा ते दाणे चमकू लागतात. या चमकणाऱ्या दाण्यानाच कवीने मोती म्हटलेले आहे.
आम्ही सगळीकडे समानता स्थापन करू. एकमेकांमध्ये पोलादासारखे मजबूत एकता निर्माण करू. कुणीही मालक नाही आणि कुणीही नोकरी नाही सगळे समान आहेत अशा पद्धतीची समानता आपण निर्माण करूया असे कवि म्हणतात.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.