www.upkarmarathi.com
मराठी सिनेसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे दुर्गाबाई खोटे होय. दुर्गाबाई खोटे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमधून देखील काम केले.
दुर्गाबाई खोटे यांच्या विषयी माहिती
- जन्म------- -14 जानेवारी 1905
- मृत्यू ---- - 22 सप्टेंबर 1991
- कार्यक्षेत्र --अभिनय क्षेत्र
- भाषा ----- मराठी
- राष्ट्रीयत्व ----भारतीय
- प्रमुख चित्रपट -अयोध्येचा राजा, अमर ज्योती
Durga khote information in Marathi |
बालपण
दुर्गाबाई खोटेचा जन्म 14 जानेवारी 1905 रोजी झाला. लहानपणी दुर्गा यांना बानु असे म्हटले जात. दुर्गाबाई खोटे यांना दोन बहिणी होत्या त्यातील एका बहिणीचे नाव इंदू व दुसरीचे नाव शालू होते. दुर्गाबाईंचे लहानपण कांदेवाडी या गावामध्ये गेले. कांदेवाडी येथे त्यांचा वाडा होता . हा वाडा बानू म्हणजेच दुर्गाबाई खोटे यांना खूप आवडायचा. या वाड्यातील वातावरण अत्यंत आनंददायक होते. दुर्गाबाईंच्या काका आणि काकू यांनी सगळ्या पोरांचा सांभाळ केला ते दांपत्य अत्यंत प्रेमळ होते.
दुर्गाबाईंच्या आईचे नाव मंजुळाबाई होते व वडिलांचे नाव पांडुरंग शामराव लाड होते ते मुंबई येथे सॉलिसिटर झाले दुर्गाबाईंच्या वडिलांची विचारसरणी उदार होती.
शिक्षण
दुर्गाबाई खोटे यांचे शिक्षण कॅथेड्रल शाळेमध्ये झाले. कॅथेड्रल मधील सर्व शिक्षक युरोपियन होते. दुर्गाबाई खोटे यांना खेळाची देखील विशेष आवड होती. त्या बास्केटबॉल या खेळाच्या शाळेच्या संघाच्या लीडर होत्या.
सांस्कृतिक कार्यक्रम ,इंग्रजी नाट्य ,वक्तृत्व, कला या सर्व कलांमध्ये देखील अत्यंत आघाडीवर होत्या. एकंदरीत शिक्षणाबरोबरच सर्व कलांमध्ये देखील त्यांना विशेष गती होती.
चित्रपट
दुर्गाबाई खोटे यांनी मराठी तसेच हिंदी सिनेमांमध्ये देखील काम केलेले आहे. 1932 आली प्रदर्शित झालेला मराठी मधील पहिला बोलपट अयोध्येचा राजा यामध्ये त्यांनी राणी तारामती ची भूमिका केली होती.1942 साली प्रदर्शित झालेला चित्रपट "भरत मिलाप " यामध्ये त्यांनी कैकयीची भूमिका केली होती. याबरोबरच मुघल-ए-आझम या चित्रपटात 1960 साली त्यांनी जोधाबाई ची भूमिका केली . प्रदीर्घ अशा पाच दशकांच्या कारकीर्दमध्ये त्यांनी मराठी व हिंदी या भाषांमध्ये अनेक चित्रपट व नाटकांमध्ये विविधरंगी भूमिका साकारल्या आणि या भूमिका देखील विशेष गाजल्या.
दुर्गाबाईंच्या बहिणीने फरेबी झाल या चित्रपटात अभिनय नाकारला म्हणून या चित्रपटांमध्ये दुर्गाबाईने काम केले. यानंतर दुर्गाबाईंनी सोंगडी , प्रभात या चित्रपटांमध्ये काम केले. त्या बरोबरच पृथ्वीवल्लभ या चित्रपटात देखील त्यांनी सुंदर भूमिका साकारली.
पुरस्कार
दुर्गाबाई खोटे यांना
- 1968 साली पद्मश्री पुरस्कार मिळाला व
- 1983 साली दादासाहेब फाळके पुरस्कार देखील मिळाला.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.