www.upkarmarathi.com
प्रिय मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण रस्त्याचे मनोगत या विषयावर आधारित दोन निबंध बघणार आहोत. रस्ता बोलू लागला तर तो आपल्याशी कसा बोलेल रस्त्याची कैफियत कशी मांडेल हे आपण आजच्या या निबंधामध्ये बघूया. चला तर बघुया 2 छानसे निबंध रस्त्याचे मनोगत किंवा रस्त्याचे आत्मकथन
|रस्त्याची कैफियत मराठी निबंध
रस्त्याचे मनोगत मराठी निबंध |
रस्त्याचे आत्मकथन, मराठी निबंध
| RASTYACHE ATMAKATHAN
नमस्कार प्रिय मित्रानो मी रस्ता बोलत आहे हे आज आहे तसा मी पुर्वी नव्हतो. माझी कथा अर्थात माझे आत्मचरित्र खूपच मनोरंजक आहे माझे आत्मचरित्र ऐकून तुम्हाला नक्की आनंद होईल. माझे आत्मचरित्र ऐकाल का बर ,मग ऐका तर..
खूप वर्षांपूर्वी मी फक्त एक लांब ,अरुंद पायवाट होती. आजच्यासारखे माझे रूप नव्हते. पायी चालत जाणारे खूप लोक माझा वापर करत असत. मी खूप अरुंद असल्यामुळे मोठे वाहने माझ्यावरून येत नसत.
एके दिवशी गावातील काही तरुण एकत्र आले आणि म्हणाले आता ही पायवाट मोठी करूया. मग गावातील अनेक लोक एकत्र येऊन त्यांनी माझे रूप पालटले. दिवसातच मी एका अरुंद रस्त्या पासून एका छान रुंद रस्त्यामध्ये रूपांतरित झाली.
आता मला खूप आनंद झाला आता कारण आता माझ्या वरून मोठ्या गाड्या ही धावू लागल्या होत्या. सकाळ संध्याकाळ तेव्हाही लोक माझ्यावरून ये-जा करू लागले. काही दिवसांनी गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीने जिल्हा कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटून माझ्यावर दगड गोटे यांनी चांगला थर दिला. त्यामुळे मी अधिकच सुंदर झाले.
यावर्षी निवडणुका होणार होत्या त्यामुळे मतदानाचे वारे चांगलेच वाहू लागले होते. तुझा वापर करणाऱ्या काय लोकांनी माझ्या दुरवस्थेकडे नेत्यांचे लक्ष वेधले . नेत्यांनी माझ्या चांगल्या बांधकामाचे आश्वासनही जनतेला दिले. काही दिवसातच माझे कच्च्या रस्त्यातून पक्क्या रस्त्यामध्ये रूपांतर झाल
. आता माझे रूप पूर्णपणे बदलले आहे. या भागामध्ये येणाऱ्यांची संख्या देखील आता खूप वाढलेली आहे. मोठी वाहने माझ्यावर वेगाने धावू लागलेली आहेत. माझ्या दोन्ही बाजूंना आता अनेक पक्की घरे बांधली गेली तर काही दुकाने देखील आलेले आहेत. घरे आणि दुकानांमुळे आता इथे रहदारी देखील वाढलेली असते.
काही निसर्गप्रेमी तरुणांनी माझ्या दुतर्फा सुंदर सुंदर झाडे लावलेली आहेत. या हिरव्यागार झाडांमुळे माझे सौंदर्य अधिकच खुललेले आहे. या झाडांमध्ये असलेले काही फुलझाडे जेव्हा फुलांनी बहरतात त्यावेळी माझे सौंदर्य अगदी नवीन नटलेल्या नवरी सारखे दिसते. फुलांचा सुगंध रस्ता भरुन दरवळत असतो. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अचानक जेव्हा सुगंध येतो तेव्हा ते कावरीबावरी होऊन इकडे तिकडे बघू लागतात. त्यांची झालेली ही अवस्था बघून मला फार मजा वाटते.
माझ्यामुळे आता दुसऱ्या गावाला जाणाऱ्या लोकांची फार मोठी सुविधा झालेली आहे. रात्री पहाटे कधीही लोक माझ्यावरून ये-जा करू शकतात. माझ्या दुतर्फा विद्युत रोषणाई देखील केलेली आहे त्यामुळे स्त्रियांना देखील सुरक्षित भावना निर्माण होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उन्हाने अंगाची काहिली होत असताना वाटसरू ज्यावेळी झाडांच्या गार सावली मध्ये बसतात, तेव्हा त्यांचा थकवा लगेचच हरपून जातो.
आपल्यामुळे इतरांना जर आनंद मिळत असेल तर आपल्याला देखील आनंद मिळतो. याचा अनुभव मी वारंवार घेत असते. परोपकारामध्येच मानवी जीवनाचे सार्थक आहे.
रस्त्याचे मनोगत निबंध, क्रमांक दोन
|रस्त्याची कैफियत मराठी निबंध
|रस्ता बोलू लागला तर
| मी रस्ता बोलतोय मराठी निबंध
नमस्कार लोकांना मित्र रस्ता बोलतोय! माझं थोडं ऐकता का.. मला आज तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही माझं बोलणं शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. तुम्ही सगळेजण माझ्या अंगाखांद्यावरून नेहमी ये जा करत असतात. तुमची प्रत्येकाची कामे वेगवेगळी असतात.कुणी शेतामध्ये काम करण्यासाठी जातात तर कुणी आपल्या प्रिय माणसांना भेटण्यासाठी जातात बऱ्याचदा बाहेर गावची माणसे देखील तुम्हाला भेटण्यासाठी येतात. म्हणजे तुमच्या विविध गरजा भागवण्यासाठी मी तुमच्या उपयोगाला येतोच. माझ्यामुळे तुमच्या जीवनाला किती वेग प्राप्त झाला आहे? याचा जरा विचार कधी केला आहे का तुम्ही? मला स्वतःची फुशारकी मारायची नाही परंतु माझ्यामुळे तुमच्या जीवनात आनंद आलेला आहे हे तुम्ही नाकारू शकत नाही.
माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये मी किती प्रकारची माणसे पाहिले आहेत. काहीजण मोठमोठ्याने एकमेकांशी गप्पा मारत जातात तर काही जण स्वतः अशीच अगदी मनात बोलतात. प्रत्येक जण आपल्या सुख-दुःखाच्या अडचणीच्या आनंदाच्या गप्पा मारत असतात. अनेक जणांच्या गप्पा ऐकून माझे मन व्यथित होते परंतु मी काहीही करू शकत नाही. अनेक वर्षांनी एकमेकांना भेटणारे मित्र कडकडून एकमेकाला मिठी मारतात. तर दुसरीकडे एकमेकांचे शत्रू दुसऱ्याच्या तोंडाकडे देखील बघत नाही.
हजारो वर्षांपासून रस्ते माणसांचे जीवन बघत आलेले आहेत. अगदी पूर्वीच्या काळी माणूस कसा होता मी आजच्या प्रगत वर्गातला माणूस कसा आहे हे आम्हाला रस्त्यांना तंतोतंत माहित आहे. एवढ्या उपयोगाचे आम्ही आहोत . तरीसुद्धा आमच्याकडे मात्र सहजपणे दुर्लक्ष केले जाते.
जरा माझ्या अवस्थेकडे लक्ष द्या. इतकी दुरावस्था माझी आजपर्यंत कधीही झालेली नव्हती. मी तुमच्या सुखदुःखाचा साथी तुम्हाला तुमच्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी आजन्म प्रयत्न करत असतो. पण तुम्ही मात्र माझ्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. आता तरी माझ्या कडे लक्ष द्या हीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. प्रिय मित्रांनो तुम्ही माझे रस्त्याचे मनोगत शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
|डांबरी रस्त्याचे मनोगत
नमस्कार , मित्रांनो मी रस्ता बोलतोय आहे. आज मी माझ्या आयुष्याचा जीवनक्रम तुम्हाला सांगणार आहे. रस्त्याची कैफियत ऐकताना तुम्हाला देखील आनंद होईल. आज माझा या डांबरामुळे जो कायापालट झालेला दिसतो तसा काही दिवसांपूर्वी नव्हता. मी म्हणजे अत्यंत छोटीशी पायवाट होतो परंतु गावाला जोडणारी ही एकमेव पायवाट असल्यामुळे इथून वाटसरूची ये-जा कायमच चालू होती.
लहान असले तरी देखील पायी जाणाऱ्यांची याठिकाणी फार वर्दळ राहायची.
दुचाकी वाहने देखील मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात परंतु मोठी वाहने या ठिकाणाहून येणे शक्य नव्हते.
एके दिवशी बरेच माणसे या ठिकाणी गोळा झाले व त्यांनी मोजमाप केले. ही माणसे कशाचे मोजमाप करत आहे याविषयी मला काही कल्पना नव्हती. परंतु मोजमाप करून गेल्यानंतर दोन-तीन आठवड्यातच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाळू, खडी, दगड येऊन पडले. रोड रोलर च्या माध्यमातून माझा पृष्ठभाग सपाट करण्यात आला मग त्यावर भरपूर पाणी मारून दगड खडे पसरवण्यात आले. मुरूम माती टाकून सपाट केले गेले.
हा रस्ता काही दिवस वापरासाठी मोकळा ठेवण्यात आला मग पुन्हा आठ-दहा दिवसांनी काही गाड्या आल्या आणि मग डांबर वापरून चांगल्या पद्धतीचा पक्का रस्ता तयार करण्यात आला.
या निबंधाचे खालील प्रमाणे ही नावे असू शकतात.
- |Autobiography of road in Marathi
- |मी रस्ता बोलतोय
- |मराठी निबंध रस्त्याचे मनोगत
प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा रस्त्याचे मनोगत निबंध कसा वाटला ? हे मला कमेंट करून नक्की सांगा. हे दोन निबंध तुम्ही तुमच्या विविध परीक्षांमध्ये वापरू शकता.
तुम्हाला एक मोलाचा सल्ला द्यावासा वाटतो की, हे निबंध जसेच्या तसे लिहू नका. या निबंधाचा फक्त संदर्भ म्हणून वापर करा आणि तुमच्या शब्दांमध्ये तुमच्या भावना व्यक्त करून निबंध लिहा .त्यामुळे निबंध अधिक सुंदर होतो.
- सत्यमेव जयते कल्पनाविस्तार मराठी निबंध
- एका पुतळ्याचे मनोगत eka putlyache manogat marathi nibandh
- वाचाल तर वाचाल Marathi nibandh vachal tar vachal
- भेदाभेद भ्रम अमंगळ मराठी कल्पनाविस्तार bhedabhed bhram amangal Marathi essay
- प्रेम लाभे प्रेमळाला ! त्याग ही त्याची कसोटी
- नदी बोलू लागते तेव्हा/ नदीचे मनोगत, nadi bolu lagli tar
- निसर्ग दृश्याचे वर्णन वर्णनात्मक निबंध varnanatmak nibandh
- फळ्याचे मनोगत मराठी निबंध
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.