www.upkarmarathi.com

mobile phone band Jhale tar, essay in Marathi

     मोबाईल फोन बंद झाले तर | mobile phone band Jhale tar, essay in Marathi , हा निबंध आपण आज पाहू. आजच्या उपकरणांच्या युगात मोबाईल फोन मानवी जीवनात फार खोलवर शिरला आहे. मोबाईल हे एक उपकरण आहे जे बोलण्यासाठी वापरले जाते आणि या दिवसात आपण या उपकरणा शिवाय राहू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोबाईल फोनवर आपले अवलंबून असणे हा एक अतिशय मनोरंजक विषय आहे. आजच्या निबंधात आपण बघू की मोबाईल फोन बंद केला तर काय मजा येईल.

 
mobile phone band Jhale tar, essay in Marathi

    मोबाईल  बंद झाले तर




    मोबाईल  बंद झाले तर

 mobile phone band Jhale tar, essay in Marathi


        आजचे युग हे विज्ञान युग आहे. आजच्या युगाचे आधुनिक युगात रूपांतर करण्यात मोबाईलची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे हे विकासाच्या या युगात सर्वकाही डिजिटल होत आहे मोबाईल नसता तर डिजिटल क्रांती हे केवळ स्वप्नच राहिले असते.

      मोबाईल मुळे पैशांचे कितीतरी व्यवहार ऑनलाइन होत आहेत. जर मोबाईल बंद झाले तर दूरवर पसरलेल्या आपल्या नातेवाईकांशी आणि मित्रांशी तसेच व्यवसायिकांशी संपर्क साधणे अशक्य होऊन जाईल. सध्याच्या आधुनिक युगामध्ये प्रत्येक गोष्ट स्मार्टफोन मध्ये उपलब्ध आहे. आपण घरात खुर्चीत आरामात बसून जगभरातली कोणतीही माहिती मोबाईल मुळे सहज मिळू शकतो मगाशी मोबाईल बंद झाले तर फारच अवघड परिस्थिती निर्माण होईल.

     ॲमेझॉन, फ्लिपकार्ट ,अलीबाबा यासारख्या ऑनलाइन शॉपिंग साठी प्रसिद्ध असणाऱ्या वेबसाईट मोबाईल मुळे फारच भरभराटीला आलेल्या आहेत. मोबाईल मुळे कोणीही ऑनलाइन दुकान उघडू शकते आणि आपला माल जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सहज पोचवू शकते. संगणक देखील अत्यंत उपयोगी आहे परंतु संगणकाची जवळजवळ सगळीच कामे मोबाईल मधून करता येतात.

     मोबाईल मध्ये विविध प्रकारचे ऍप्स आलेले आहेत त्यामुळे माणसाचे जीवन अगदी सोयीस्कर झालेले आहे. वर्तमानपत्रात वाचता येणाऱ्या बातम्या मोबाईलच्या साह्याने अगदी सहज वाचता येतात त्यामुळे जगभरात काय चालले आहे हे लगेच कळते. मोबाइल बंद झाले तर मात्र हे सगळे समजण्यासाठी आपल्याला पूर्णपणे वृत्तपत्रांवर आणि बातम्या या देणाऱ्या वाहिन्यांवर अवलंबून राहावे लागेल.

      ऑनलाइन शॉपिंग च्या माध्यमातून आपण घरबसल्या हजारो रुपयांची खरेदी विशेष काही शारीरिक कष्ट न घेता सहज पद्धतीने करू शकतो. मोबाईल मध्ये आपल्याला हवे ती वस्तू  बघायची तिच्या विषयीची सर्व माहिती वाचायची .मग वस्तू विकत घ्यायची. किती सुसह्य जीवन झाले आहे मोबाईल मुळे.

     एखाद्या अनोळखी प्रदेशात गेल्यावर ती आपल्याला तेथील रस्ते माहीत नसतात. अशावेळी अचूक पद्धतीने रस्ता शोधून देण्यासाठी व आपल्या निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी मोबाईल मधून गुगल मॅपच्या मदतीने  आपल्याला रस्ता शोधता येतो. आपण कुठे हरवलो तर आपल्या जागेचा पत्ता म्हणजे लोकेशन आपल्याला दुसऱ्याला पाठवता येते. यामुळे तर किती त्रास वाचलेला आहे. मोबाइल बंद झाले तर मात्र आपल्याला हा त्रास पुन्हा सहन करावा लागेल.
   
      काही सुखदुःखाचे संदेश अचानकपणे आपल्याला ज्यावेळी आपल्या प्रियजनांना पर्यंत पोहोचवायचे असतात ,तेव्हा मोबाईल सारखे साधन दुसरे नाही.

     मोबाइल बंद झाले तर मात्र एक गोष्ट चांगली होईल आपला बराच वेळ मोबाईलवर विविध ॲप्स बघण्या मध्ये गेम खेळणे मध्ये आणि इंटरनेटचा वापर करण्यामध्ये वाया जात असतो. हा वेळ नक्की वाचू शकतो. मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांच्या विविध समस्या निर्माण होतात. दृष्टीदोष देखील निर्माण होतो. मोबाइल बंद झाले तर मात्र या आरोग्यविषयक दुष्परिणामांपासून आपण वाचू शकू.

    मोबाईल हे यंत्र आहे त्यामुळे त्याला स्वतंत्र विचारशक्ती नाही. मोबाईलचा वापर किती प्रमाणात करायचं आहे प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या बुद्धीप्रमाणे ठरवायला हवे. मोबाईल फोन बंद झाले तर काही तोटे होतील. त्या पद्धतीनं काही फायदे देखील होतील.

    प्रिय वाचक मित्रांनो तुम्हाला हा मोबाईल बंद झाले तर मराठी निबंध कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच काही बदल सुचवायचे असतील तर तेही सुचवा.

या निबंधाचे खालील प्रमाणे ही नावे असू शकतात
  1. |मोबाईल बंद झाले तर
  2. |मोबाईल फोन बंद झाले तर
  3. |मोबाइल बंद झाले तर मराठी निबंध





Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने