www.upkarmarathi.com
10 lines on crow in Marathi
प्रिय वाचक मित्रांनो आता आपण या लेखामध्ये कावळ्यावर मराठी लघुनिबंध बघूया. सर्वत्र आढळून येणारा कावळा पक्षी फारच हुशार असतो. आजच्या लेखात आपण कावळ्यावर एक लघुनिबंध व काही माहिती बघणार आहोत. चला तर मग आता जास्त वेळ वाया न घालवता आपण बघूया, 10 lines on crow in Marathi.
10 lines essay on crow |
10 lines on crow in Marathi
|कावळा निबंध 10 ओळी
- कावळा अत्यंत चतुर पक्षी आहे .
- तो खूप हुशार व समजूतदार असतो.
- कावळ्याचा रंग काळा असतो.
- कावळा काव काव असा ओरडतो.
- कावळा झाडावर आपले घरटे बनवतो.
- घराच्या छतावर कावळा बसून ओरडला ,की पाहुणे येतात असे म्हणतात.
- कोकीळ पक्षी त्याची अंडी कावळ्याच्या घरात ठेवतो.
- कावळा किडे पोळी आणि छोटे उंदीर खातो.
- आमच्या पुस्तकात चतुर कावळा अशी गोष्ट आहे.
- विजेच्या तारांवर बऱ्याच वेळा कावळा बसलेला दिसतो.
|short essay on crow in marathi |कावळ्या वर निबंध
कावळ्याचा रंग काळा कुळकुळीत असला तरीसुद्धा तो एक अत्यंत सुंदर पक्षी आहे. कावळा आपल्या बुद्धिमत्तेसाठी सर्व पक्षांमध्ये हुशार म्हणून गणला जातो. आमच्या घरावर दररोज एक कावळा येऊन बसतो.
मी दिसलो कीतो खूप जोराने ओरडतो. तो ओरडायला लागला, की मी माझ्या खिशातील बिस्किट हळूच त्याच्या दिशेने फेकतो. दोन्ही पायांवर उड्या मारत तो हळूच येतो आणि बिस्कीट उचलून घेऊन जातो. छतावर बसून आपल्या टोकदार चोचीने मजेत ते बिस्कीट खातो.
आजी म्हणते हा कोणीतरी आपला पूर्वज आहे. मला ते पटत नाही पण आजी सांगते म्हणून ऐकून घ्यावे लागते. कावळ्याला धार्मिक महत्त्व देखील आहे. जोपर्यंत पिंडाला कावळा शिवत नाही तोपर्यंत आत्म्याला शांती मिळत नाही असे समजतात.
कोणी काहीही समजो परंतु मला कावळा खूप आवडतो .कावळ्याकडून मला खूप शिकायला मिळाले आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये कावळे आढळत नाहीत. कावळ्याचे चौफेर लक्ष असते त्यामुळे तो कोणाला सापडत नाही.
कावळ्याची माहिती मराठी मधून |crow information in Marathi
कावळ्या विषयी सर्वात गमतीची बाब म्हणजे कावळा जगात सर्वत्र आढळतो. कावळ्याला इंग्रजी भाषेमध्ये क्रो (crow) असे म्हणतात.कावळ्याचा रंग काळा असतो असे असले तरी कावळ्याच्या गळ्याभोवती मात्र अगदी फिकट काळ्या रंगाचा पट्टा देखील असतो.
जंगलामध्येही अगदी काळ्या रंगाचे कावळे देखील दिसतात. ते कावळे ईतरत्र दिसणाऱ्या कावळ्यापेक्षा आकाराने देखील मोठे असतात. त्यांना डोमकावळे असे म्हणतात. डोमकावळ्यांना रानकावळे असे देखील म्हणतात.
कावळ्याची शरीररचना|the anatomy of the crow|body structure of crow
- कावळा एक मध्यम आकाराचा पक्षी आहे.
- कावळ्याची चोच खरच टोकदार असते.
- या चोचीच्या साह्यानेच कावळा अन्न तोडून खातो.
- कावळ्याचे वजन सुमारे 40 ग्रॅम ते दीड किलोपर्यंत (1.5kg) असते.
- कावळ्याची नजर अत्यंत तीक्ष्ण असते.
- सर्व पक्ष्यांप्रमाणे कावळ्याच्या शरीरावर देखील पिसे असतात.
- पिसे काळ्या रंगाची असतात.
FAQs
कावळे कुठे झोपतात?
उत्तर कावळे झाडावर झोपतात.
कावळ्याला किती डोळे असतात?
कावळ्याला दोन डोळे असतात, तो दोन्ही डोळ्यांनी बघतो.पण कावळा एकावेळी फक्त एका डोळ्याचा वापर करतो.अर्थात याला ठोस पुरावा नाही .
डोमकावळा म्हणजे काय?
रानकावळ्या लाच डोमकावळा असे म्हणतात. सर्वसामान्य कावळ्या पेक्षा डोमकावळा जास्त काळा असतो व त्याचा आकारही मोठा असतो.
कावळा किती वर्षे जगतो ?
कावळा साधारणपणे 18 ते 20 वर्षे जगतो.
कावळा शिवणे |कावळा शिवणे शुभ की अशुभ|कावळा शिवणे याला काही शास्त्रीय आधार आहे का?
इतर सर्वसामान्य पक्षांप्रमाणेच कावळा हा एक पक्षी आहे. त्यामुळे कावळा शिवणे शुभ की अशुभ या मध्ये पडू नये.
कावळ्याची गोष्ट | तहानलेला कावळा
एकदा एका कावळ्याला खूप तहान लागलेली होती. तो सगळीकडे पाणी शोधत होता परंतु त्याला पाणी मिळत नव्हते.
एका झोपडीजवळ एका माठात त्याला पाणी दिसले. पाणी खाली होते त्यामुळे त्याला पाणी पिता येत नव्हते. त्याने एक युक्ती केली बाजुलाच पडलेले छोटे खडे उचलून त्याने पाण्यात टाकायला सुरुवात केली.
हळूहळू पाणी वर येऊ लागले कावळ्याने पाणी पिले आणि तो उडून गेला. अशारितीने कावळ्याने युक्तीने आपली तहान भागवली.
क अक्षरावरून वाक्य बनवा.
- काळा कावळा काव काव करतो
- काकूने काकांचे कामाचे कागद कपाटातून काढून कात्रीने कराकरा कापुन काढले.
- कपाटातून कागद काढ.
- कपाटातून कात्री काढ.
- करणने कागद कट केला.
- काकुने काल केक केला.
- काकुने काल काजूचा केक केला.
- काकांनी कटिंग केली.
- कपिल ने कपाटातून कपडे काढले.
Conclusion
प्रिय वाचक मित्रांनो एक होती क्रो इन्फॉर्मेशन इन मराठी , crow information in Marathi, म्हणजेच कावळ्याची माहिती मराठीमधून.
मला नक्की आशा आहे की तुम्हाला या लेखांमधून कावळे विषयी भरपूर माहिती मिळाली असेल तरी अजूनही काही शंका असतील तर ते आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा तसेच तुमच्या मनातही कावळ्या विषयी काही विचार असतील तर ते आम्हाला कळवा.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.