www.upkarmarathi.com
हस्ताक्षर कसे सुधारावे |how to improve handwriting
देवाने आपल्याला सगळ्यांना सगळे अवयव सारखे दिलेले आहेत परंतु तरीदेखील प्रत्येकजण भिन्न आहे. सगळ्यांचे स्वभाव वेगवेगळे आहेत, चेहरे वेगवेगळे आहेत, सगळ्यांच्या आवडी-निवडी देखील वेगवेगळ्या आहेत त्या पद्धतीनेच प्रत्येकाचे हस्ताक्षर देखील वेगळ असतं.
असे म्हटले जाते की ज्याचे अक्षर खराब तो माणूस खराब.
हस्ताक्षर कसे सुधारावे |how to improve handwriting |
काही माणसांचे अक्षर अगदी मोत्यासारखे सुंदर असते तर काहींनी काय लिहिले आहे ते समजणे म्हणजे पीएचडीची डिग्री मिळण्यासारखे आहे.
हस्ताक्षरावरून माणसाचा स्वभाव देखील कळायला मदत होते. आपले अक्षर जर सुंदर असले तर समोरच्या व्यक्तीवर आपला प्रभाव देखील लगेच पडतो. हस्ताक्षर सुंदर असणे हे कोणताही व्यक्ती जन्मतः शिकून येत नाही. हस्ताक्षर सुंदर होण्यासाठी नियमित सराव गरजेचा आहे. प्रत्येक अक्षराच्या लिखाणाच्या योग्य त्या पायऱ्या असतात त्या पायऱ्या नुसार आपण लेखन केले तर आपले हस्ताक्षर देखील सुंदर होते.
आजच्या लेखामध्ये आपण हस्ताक्षर कसे सुधारावे या विषयी सविस्तर माहीती बघूया .चला अधिक वेळ वाया न घालवता , वळूया आपल्या आजच्या लेखाकडे ज्याचे नाव आहे हस्ताक्षर कसे सुधारायचे.
हस्ताक्षर सुधारण्यासाठी कोण कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे हे जाणून घेण्या अगोदर हस्ताक्षर म्हणजे काय हे समजून घेऊ या.
|हस्ताक्षर म्हणजे काय
हाताच्या बोटांच्या सहाय्याने खडू पेन्सिल लेखणे किंवा इतर कोणत्याही साधनाचा वापर करून अक्षरांचे लिखाण करणे म्हणजेच हस्ताक्षर होय.
देवाने आपल्याला दोन्ही हात व इतर सर्व अवयव व्यवस्थित दिलेले आहेत तरी देखील आपले अक्षर चांगले नसेल तर ही फारच लाजिरवाणी गोष्ट आहे. काही दुर्दैवी लोकांना मात्र हात नसतात तरी देखील त्यांच्या जिद्दीच्या जोरावर ते पायाच्या सहाय्याने लिखाण काम करतात. त्यांचे अक्षर देखील फार सुंदर असते. अशा कर्मवीरांना आदराने प्रणाम करावासा वाटतो. त्यांच्यासारखी जिद्द आपल्यामध्ये निर्माण करा आणि हस्ताक्षर सुंदर करण्यासाठी प्रयत्न करा.
|सुंदर हस्ताक्षर म्हणजे काय?
बऱ्याच जणांच्या लिखाणात असे दिसते की काही अक्षरे मोठी तर काही अक्षरे लहान काढलेली असतात. काही अक्षरे तिरपी लिहिलेली असतात काही सरळ असतात. काही लोक रेषेवर लिहितात,तर काही रेषेच्या खाली किंवा मधोमध लिहितात. मग नेमकं सुंदर हस्ताक्षर म्हणजे काय असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो.
वरवर पाहता अक्षर डोळ्यांना छान दिसत असले तरी देखील त्याला लगेच आपण सुंदर हस्ताक्षर म्हणू शकत नाही.
हस्ताक्षर मध्ये लिहिलेल्या प्रत्येक अक्षराचा कल एकसारखा असावा. म्हणजेच एक अक्षर डावीकडे झुकलेले आणि दुसरे अक्षर उजवीकडे झुकलेले आणि मध्येच अक्षरे सरळ उभ्या रेषेत लिहिलेली अशा पद्धतीचे लिखाण करू नये. अशा लेखनाला सुंदर हस्ताक्षर म्हणता येणार नाही.
काही जण तिरकस पद्धतीने अक्षरे लिहितात परंतु जर ती अक्षरे सारख्याच पद्धतीने तिरकस पद्धतीने लिहिलेले असतील व अक्षरे लिखाणाचे नियम पाळून लिहिलेले असेल तर ते अक्षर सुंदरच दिसणार यात अजिबात शंका नाही.
हस्ताक्षर कसे सुधारायचे ?
- हस्ताक्षरावर परिणाम करणारे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बसण्याची पद्धत(sitting posture) होय. लिहिताना अगदी सरळ किंवा खूप वाकून बसू नये. आपले खांदे आरामशीर पोझिशन मध्ये असले पाहिजे.
- पेन किंवा पेन्सिल पकडण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळे असते . मित्रांनो पेन किंवा पेन्सिल पकडण्याची पद्धत तुम्हाला जसे कम्फर्टेबल वाटते त्याप्रमाणे पकडा. या गोष्टीकडे लक्ष द्या तुमची पेनाची पकड खूप टाईट किंवा खूप सैल नसावी .
- अक्षर किंवा शब्दांमध्ये एक सारखेच अंतर ठेवा.जर तुम्ही अक्षरांमध्ये खूप जागा ठेवत असाल तर ते जवळ लिहा किंवा जर तुम्ही खूप चिकटून अक्षरे काढत असाल तर त्यांच्यामध्ये थोडी जागा ठेवा . याचाच अर्थ शब्द आणि अक्षरांमध्ये जागा सारखीच असली पाहिजे.
- लिहिताना खूप दाबून लिहू नये. आवश्यक असेल तेवढा दाब देऊनच लिहावे. जास्त दाब देऊन लिहिल्याने मागील पानावर ठसे उमटतात.
- अक्षरांना उगाचच जास्त खाली खेचू नका अक्षरे अगदी गोलाकार आणि व्यवस्थित काढावीत.
- शब्दातील प्रत्येक अक्षराचा आणि प्रत्येक शब्दाचा उतार एक सारखा असावा.
- योग्य पेन किंवा पेन्सिल ची निवड करा. सारख्या मोडणाऱ्या पेन्सिलचा किंवा अस्पष्ट उमटणाऱ्या पेनाचा वापर करू नका.
- शब्दांची शिरोरेषा म्हणजेच शीर्ष रेषा द्यायला विसरू नका. या रेषेला आपल्या दैनंदिन वापराच्या भाषेमध्ये शब्दावर ची टोपी असे म्हटले जाते.
- हस्ताक्षर सुधारण्यासाठी जास्तीत जास्त लेखनाचा सराव करा.
|सुंदर हस्ताक्षराचे महत्व
- हस्ताक्षर मुळे पहिले इंप्रेशन पडते.
- विद्यार्थ्यांसाठी तर अक्षराचे महत्त्व खूपच आहे.
- खराब अक्षरामुळे विद्यार्थ्यांना परीक्षे मध्ये कमी मार्क मिळतात.
- सुंदर हस्ताक्षर असेल तर लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलतो.
|जागतिक हस्ताक्षर दिन |jagtik hastakshar din
23 जानेवारी हा दिवस जागतिक हस्ताक्षर दिन म्हणून साजरा केला जातो.
|हस्ताक्षर इन इंग्लिश|हस्ताक्षर in English
इंग्लिश मध्ये हस्ताक्षराला handwriting असे म्हणतात.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.