www.upkarmarathi.com


|Indian rivers information in marathi
Indian rivers information in marathi 




भारतातील नद्या


भारतीय नद्यांचे खालील प्रमाणे गट करता येऊ शकतात.
  • हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या
  • भारतीय पठारावरील नद्या

हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या

  1. गंगा 
  2. ब्रह्मपुत्रा
  3.  सिंधू

हिमालयात उगम पावणाऱ्या नद्याची वैशिष्टे

  •   उत्तर भारतातील प्रमुख नद्या हिमालया मध्ये उगम पावतात. उन्हाळ्यामध्ये हिमालयातील बर्फ वितळतो त्यामुळे हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांना पावसाळ्यात ,उन्हाळ्यात देखील भरपूर पाणी असते.
  • या नद्या तीव्र उतारावरून वाहत येतात म्हणून यांच्या पाण्याला वेग भरपूर असतो.
  • वेगाने वाहत असल्यामुळे खडकांची देखील खूप मोठ्या प्रमाणात झीज होते.
  • ही झीज झाल्यामुळे जो गाळ निर्माण होतो तो नद्यांच्या प्रवाहासह वाहत येतो.
  • सपाट प्रदेशात आल्यावर नद्यांचा वेग मंदावतो आणि त्यांच्याबरबर वाहून आलेला गाळ नदीकाठच्या प्रदेशात गोळा होतो.
चला तर मग हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या विषयी अजून सविस्तर माहिती जाणून घेऊया.

गंगा नदी|Ganga nadi information in Marathi

  • गंगेचा उगम हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून होतो.
  • गंगा ही भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे.
  • गंगा नदीचे खोरे भारतातील सर्वात मोठे खोरे आहे.
  • गंगा नदी उत्तरांचल उत्तर प्रदेश बिहार पश्‍म बंगाल या राज्यातून वाहत जाते व पुढे बंगालच्या उपसागराला मिळते.
  • यमुना ही गंगेची प्रमुख उपनदी आहे.
  •  यमुना नदीचा उगम हिमालयात यमुनोत्री येथे होतो.
  • गंगा व तिच्या उपनद्यांनी मिळून अत्यंत सुपीक प्रदेश तयार केलेला आहे. या प्रदेशाच्या पूर्व भागामध्ये गंगा नदीच्या अनेक वितरिका तयार झालेल्या आहेत.
  • हुगळी नदी ही गंगेची पहिली व प्रमुख वितरिका आहे.
  • हुगळी नदी दक्षिणेकडे वाहत जाते व नंतर बंगालच्या उपसागराला मिळते.
  • छोट्या नागपुर पठारावरील महत्त्वाची दामोदर नदी हुगळी नदीला येऊन मिळते.
  • गंगा नदीने आपल्या मुखाजवळ विस्तृत असा त्रिभुजप्रदेश तयार केलेला आहे.
  •  या त्रिभुज प्रदेशाला सुंदरबन म्हणतात .
  • सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे.

Indian river information in marathi

ब्रह्मपुत्रा|bramhaputra nadi information in Marathi


  • ब्रह्मपुत्रा नदीचा उगम भारताबाहेर तिबेटमध्ये मानसरोवराजवळ झालेला आहे.
  • सुरुवातीला ब्रह्मपुत्रा नदी पूर्वेकडे वाहते. दक्षिणेकडे वळून अरुणाचल प्रदेशमध्ये तिला दिहांग नावाने ओळखले जाते.
  • आसाम राज्य मधून वाहत असताना तिला ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखले जाते.
  • पुढे बांगलादेशात प्रवेश केल्यानंतर ती गंगा नदीला मिळते.
  • ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह मार्ग जास्त लांबीचा असला तरी भारतामध्ये त्याची लांबी कमी आहे .
  • या नदीच्या पात्रात आसाम राज्यांमध्ये अनेक बेट तयार झालेली आहेत .
  • या बेटांपैकी माजुली  बेट नदी पात्रांमधील जगातील सर्वात मोठे बेट आहे.

ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या कोणत्या?


सुबनसिरी ,मनास व तिस्ता या ब्रह्मपुत्रेच्या मुख्य उपनद्या आहेत.

वारंवार येणाऱ्या पूरांसाठी ब्रह्मपुत्रा नदी प्रसिद्ध आहे.


 सिंधू |sindhu nadi information in Marathi


  • सिंधू नदी तिबेटमध्ये मानसरोवराजवळ उगम पावते.
  • ती पुढे जम्मू आणि कश्मीर राज्यांमधून वाहते व पाकिस्तानात वाहत जाते.
  • सिंधू नदी अरबी समुद्रास मिळते.
  • भारतामध्ये सिंधू नदीच्या प्रवाहाची लांबी कमी आहे.
  • श्योक व गिलगिट या सिंधू नदीच्या उत्तर काश्मीर मधील उपनद्या आहेत.
  • झेलम, चिनाब ,या सतलज नदीच्या उपनद्या कश्मीरच्या दक्षिण भागातून वाहतात.
  • रावी ,बियास व सतलज या हिमाचल प्रदेश व पंजाब राज्यांमधील प्रमुख नद्या आहेत.
  •  सतलज नदी व तिच्या उपनद्या पुढे पाकिस्तानात वाहत जातात व पुढे त्या एकत्रितपणे सिंधू नदीला मिळतात.
  •  या नद्यांनी विस्तृत मैदानी प्रदेश तयार केलेला आहे.

भारतीय पठारावरील नद्या

भारतीय पठारावरील नद्या पश्चिम घाट सातपुडा अरवली या पर्वतांमध्ये उगम पावतात .
भारतीय पठारावरील प्रमुख नद्या पूर्ववाहिनी आहेत मात्र काही नद्या पश्चिमेस अरबी समुद्राला देखील मिळतात.

नर्मदा नदी Narmada nadi information in Marathi

  •  
  •   नर्मदा नदी अमरकंटक येथे उगम पावते.
  •  नर्मदा ही भारतातील सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे.
  • ही  नदी विंध्य व सातपुडा पर्वतांच्या दरम्यान असलेल्या खचदरी मधून वाहते नर्मदा नदी छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्र व गुजरात राज्यांमधून वाहते व पुढे अरबी समुद्राला मिळत
  •  नर्मदा नदीवर जबलपुर जवळ धुवाधार धबधबा आहे त्यानंतर ती भेडाघाट या संगमरवरी खडकांच्या घळईतून वाहते.

तापी नदी | Tapi Nadi information in Marathi


  •  तापी नदी देखील पश्चिम वाहिनी नदी आहे.
  •  तापी नदी सातपुडा पर्वतात मुलताई जवळ उगम पावते 
  • ती मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात राज्यांमधून वाहत जाते व पुढे अरबी समुद्राला मिळते 
  • पूर्णा ही तापी नदीची प्रमुख उपनदी आहे
  •  या नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर गाळाचे संचयन झालेले आहे 
  • भारतीय पठारावरून दक्षिणेकडे वाहत जाणाऱ्या साबरमती, मही व लुणी या प्रमुख नद्या आहेत 
  • यापैकी साबरमती व मही या नद्या खंबायतच्या आखातास मिळतात तर लुणी नदी कच्छच्या रणास मिळते.

महानदी,Mahanadi information in Marathi

  • महानदीचा उगम छत्तीसगड राज्यांमधील बस्तर डोंगररांगांमध्ये होतो.
  •  ही नदी प्रथम उत्तर आणि नंतर पूर्व दिशेने उडीसा राज्यातून वाहत जाते व पुढे बंगालच्या उपसागराला मिळते
  •  महानदीने  किनारी प्रदेशात मोठा त्रिभुज प्रदेश तयार केला आहे.


गोदावरी नदी Godavari Nadi information in Marathi


  •   गोदावरी ही भारतीय पठारावरील सर्वात जास्त लांबीची नदी आहे.
  • विस्ताराच्या दृष्टीने गंगा नदीच्या खोऱ्यात नंतर  गोदावरी नदीच्या खोर्‍याचा क्रमांक लागतो.
  • गोदावरी नदीचा उगम सह्याद्रीमध्ये त्रंबकेश्वर येथे होतो .
  • ही नदी महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्यांमधून वाहते आणि पुढे बंगालच्या उपसागराला मिळते.
  • मांजरा ,प्राणहिता ,इंद्रावती इत्यादी गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत.

कृष्णा नदी Krishna Nadi information in Marathi


कृष्णा नदीचा उगम सह्याद्री पर्वत यामध्ये महाबळेश्वर येथे होतो.
कृष्णा नदी महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या मधून वाहत जाते व पुढे बंगालच्या उपसागराला मिळते.
भीमा आणि तुंगभद्रा या कृष्णेच्या प्रमुख उपनद्या आहेत.

कावेरी नदी Kaveri Nadi information in Marathi

  • कावेरी ही दक्षिण भारतातील प्रमुख नदी आहे.
  • कर्नाटक राज्यामध्ये ब्रह्मगिरीच्या डोंगरात कावेरी नदीचा उगम होतो.
  •  कावेरी नदी कर्नाटक व तामिळनाडू राज्यांमधून वाहत जाते व पुढे बंगालच्या उपसागराला मिळते.
  •  भवानी, अमरावती या कावेरी नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत.

पश्चिम किनाऱ्यावरील नद्या


  • पश्चिम किनाऱ्यावरील नद्यांमध्ये सावित्री  वशिष्ठी  उल्हास  मांडवी  तेरेखोल, पेरिया या प्रमुख नद्या आहेत .
  • या पश्चिम घाटामध्ये उगम पावून अरबी समुद्रास मिळतात .
  • या सर्व नद्या शीघ्र वाहिनी व कमी लांबीच्या आहेत .
  • नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झालेल्या आहेत.

नद्यांचे प्रदूषण river pollution


  • मानवाने प्रगतीच्या नावाखाली मिळाले उद्योगधंदे सुरू केले .
  • या उद्योगधंद्यांमध्ये ऊन आणि नागरी वसाहती मधून येणारे अनेक प्रकारचे टाकाऊ पदार्थ नदीच्या पात्रात सोडले जातात.
  • या पदार्थांमुळे नद्यांचे प्रदूषण होते व जीवसृष्टीला हानी पोहोचते.
  • नद्यांचे पाणी दूषित होते .
  • या दूषित पाण्यामुळे विविध प्रकारचे रोग पसरतात.
  • पाण्यामधील सजीवसृष्टी धोक्यात येते.
  • पर्यायाने आपण आपल्या जलसंपत्तीचा विनाश करत असतो.
  •  नदीच्या पाण्याचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहेच व ती प्रत्येकाची जबाबदारी आहे.


FAQ'S


नदीपात्रातील जगातील सर्वात मोठे बेट कोणते?

माजुली हे नदीपात्रातील जगातील सर्वात मोठे बेट आहे .ते ब्रह्मपुत्रा नदीपात्रात आहे.

भारतीय पठारावरील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?

गोदावरी नदी भारतीय पठारावरील सर्वात जास्त लांबीची नदी आहे.

 River names in Marathi

गंगा ,गोदावरी ,कृष्णा ,कावेरी ,तुंगभद्रा ,नर्मदा ,सिंधू ,झेलम ,चिनाब ,रवी ,बियास ,सतलज 


         प्रिय वाचक आजच्या या भारतातील नद्या  | Indian river information in marathi|भारतातील नद्या व भारतीय नदी प्रणाली  लेखामध्ये आपण भारतीय नद्यांची माहिती घेतली .तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती असेल तर आम्हाला नक्की कळवा. तसेच ही नद्यांची माहिती कशी वाटली ते देखील सांगा .धन्यवाद .  

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने