www.upkarmarathi.com
असे ठेवा तुम्ही तुमचे घर स्वच्छ आणि टापटीप
How to keep your house clean and organised
How to keep your house clean information in Marathi? मित्रांना स्वच्छतेचे महत्त्व तर सर्वश्रुत आहेतच जिथे स्वच्छता नाही त्या ठिकाणी रोगांचा वास असतो व तेथे कोणाचेही आरोग्य नीट राहू शकत नाही हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहित आहे आपल्या घरात आई किंवा मोठी माणसे घर स्वच्छ ठेवतातच परंतु घरातील प्रत्येक सदस्याची ही जबाबदारी आहे की त्यांनी घर स्वच्छ ठेवायला हवे आजच्या आपल्या या लेखामध्ये आपण घर कसे स्वच्छ ठेवावे (How to keep your house clean ) मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत.
How to keep your house clean without a maid |
How to keep your house clean information in Marathi?
प्रत्येक घरातील प्रत्येक गृहिणीला असे वाटते की आपले घर अत्यंत सुंदर आणि छान दिसावं. प्रत्येक गृहिणीला असे फक्त वाटत नाही तर त्यासाठी ती सतत राबतही असते. घरातील दैनंदिन कामे जसे की मुलांची तयारी करणे, स्वयंपाक करणे, शाळेची तयारी करणे ,बाजारहाट त्याची कामे करणे. ही काम झाल्यानंतर गृहिणी घराच्या साफसफाईला थोडासा वेळ देतेच. नोकरदार स्त्रिया देखील सुट्टीचा एखादा दिवस आपल्या घर कामासाठी राखून ठेवतात. घरात असे काही कोपरे आणि काही वस्तू असतात की त्या स्वच्छ करताना अगदी नको नकोसे वाटते. काही वस्तूंवरील चिवट डाग कितीही प्रयत्न केला तरी निघत नाही. तुमची ही डोकेदुखी घालवण्यासाठी तुमच्यासाठी खाली काही टिप्स देत आहोत त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.
ओवन स्वच्छ कसा करावा
ओवन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही जो स्पोंज वापरता त्या स्पोंजवर लिक्विड सोप टाका. त्याचा जास्त फेस होऊ देऊ नका व हलक्या हातानेच ओव्हनमध्ये फिरवा. ओवन मध्ये स्पोंज ने घासल्यानंतर ओव्हन मधे ठेवा व मिनिमम पावर वर सेट करा असे 30सेकंद होऊ द्या. हे झाल्यानंतर ओवन बंद करा व कॉटनच्या स्वच्छ कपड्याने आतील संपूर्ण भाग पुसून घ्या. असे जर तुम्ही केले तर ओवन मधून येणारा कुबट वास येत नाही आणि स्पोंज आतील सर्व घाण शोषून घेईल.
गादीची स्वच्छता
घरातील छोटे कपडे धुणे शक्य आहे परंतु गादी धुणे म्हणजे काही खायची गोष्ट नाही. गादी धुणे अशक्य गोष्ट आहे गादी खराब होऊ नये तिच्यावर डाग पडू नये म्हणून आपण त्यावर कव्हर घालतो. जेव्हा गादीच्या स्वच्छतेचा प्रश्न येतो तेव्हा फक्त आपण हे गादीचे कव्हर धुतो परंतु मूळ गादी मात्र तशीच राहते. ही अडचण दूर करण्यासाठी तुम्ही व्याक्युम क्लिनर आणि बेकिंग सोडा वापरू शकता. थोड्यावेळासाठी गादीवर बेकिंग सोडा पसरवून द्या त्यानंतर व्याक्युम क्लिनर ने गादी स्वच्छ करा. असे केल्यामुळे गादीचा कुबट वास निघून जाईल गादी वरील डाग देखील नाहीसे होतील .ही पद्धत वापरून तुम्ही जुने सोफेही स्वच्छ करू शकतात.
इस्त्रीची स्वच्छता कशी करावी
तुम्ही बघितले असेल की इस्त्री च्या खालील भाग काळपट झालेला असतो आणि ज्यावेळी इस्त्री करण्यासाठी आपण घेतो तेव्हा त्या काळपट भागालाच कपडे चिकटतात. असे झाल्यामुळे आपल्या आवडीचे कपडे खराब होतात. हे टाळण्यासाठी काय करायचे ते आपण बघू या. प्रथम एका आयर्न बोर्डवर एक पेपर टाका त्या पेपर वर थोडेसे मीठ टाका. इस्तरी चांगली गरम झाली की मीठ टाकलेल्या पेपरवर फिरवावा असे केल्याने इस्त्रीची स्वच्छता होईल काळपट भाग निघून प्लेट अगदी चमकू लागेल.
चोपिंग बोर्ड (पॅड ) ची स्वच्छता
जेवण बनवत असताना भाज्या चिरणे फळ कापणे या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात आणि त्यासाठी आपण वापरतो चोपिंग बोर्ड हा चोपिंग बोर्ड स्वच्छ असणे अत्यंत गरजेचे आहे. बरेच काळ शॉपिंग बोरड वापरल्यानंतर त्याचा रंग काळपट होतो. अशा वेळी फक्त पाण्याने हा बोर्ड धुतल्यावर तो पूर्णपणे स्वच्छ होत नाही. मग एक काम करा चोपिंग बोर्ड वर मीठ पसरा त्यावर लिंबू फिरवा. त्यानंतर गरम पाण्यात व धुवा. असं केल्यावर बघा काय गंमत दिसते तुमचं चोपिंग बोर्ड अगदी स्वच्छ दिसेल त्यावरील सगळे डाग घेऊन गेलेले दिसतील.
नळांची स्वच्छता कशी करावी?
तुम्ही कितीही भारी दिसणारे आणि महाग दिसणारे नळ वापरले तरीदेखील त्या वरील पाण्याचे डाग त्याची शोभा नष्ट करतात. असे नळ स्वच्छ करण्यासाठी तुम्ही वॅक्स पेपरचा वापर करू शकता. त्याच्या वापरामुळे पाण्याचे डाग ही जमा होणार नाही.
कार्पेट कसे स्वच्छ करावे?
कार्पेटवर मोठ्या प्रमाणामध्ये धूळ बसते. व्याक्युम क्लिनर वापरून तुम्ही कार्पेट वरील धूळ स्वच्छ करू शकता तरी डाग मात्र निघत नाहीत . कारपेट स्वच्छ करण्यासाठी एका बाटलीमध्ये पाव भाग विनेगर आणि दोन पाव पाणी असे मिश्रण तयार करा स्त्री च्या साह्याने हे मिश्रण गालिच्यावर पसरा व त्यावर ओला कपडा टाका. इस्त्री स्टीम मोडवर गरम करा आणि त्या ओल्या कपड्यावरून तीस सेकंद फिरवा बघा तुमची कार्पेट नवीनच दिसेल.
फ्राईंग पॅन कसे स्वच्छ करावे?
थँक पॅन मध्ये बनवलेले आपल्या आवडीचे पराठे डोसे आमलेट तुम्ही मोठ्या आनंदाने खातात. परंतु हे ज्या मध्ये शिकते ती पॅन मात्र यामुळे चिकट होते. हा चिकट पणा घालवण्यासाठी पॅन वर थोडेसे मीठ पसरा थोडावेळ तसेच राहू द्या आणि नंतर हलक्या हाताने घासून गरम पाण्याने धुऊन टाका मीठ तेलाला शोषून घेते त्यामुळे पॅन अगदी चमकू लागेल.
How to keep your house clean essay
How to keep your house clean and organised
- घर स्वच्छ करण्यासाठी घरातील सर्व सदस्यांची मदत घ्या त्यामुळे काम लवकर आणि व्यवस्थित होते.
- घराच्या स्वच्छतेची सुरुवात बेडरूम पासून करा.
- कोणकोणत्या घटकांची स्वच्छता जास्त गरजेची आहे त्याचा प्राधान्यक्रम ठरवा.
- रात्री झोपण्यापूर्वी किमान पंधरा मिनिटांसाठी पटकन स्वच्छतेचा उपक्रम चालू ठेवा.
- घर स्वच्छ असल्याने मन प्रसन्न राहते आणि मन प्रसन्न राहिल्याने पुन्हा घर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रेरणा मिळते.
- दररोज लागणाऱ्या वस्तू आणि कपडे एकाच जागी ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे गरज असताना लगेच त्या वस्तू सापडतील.
- बाहेर जात असताना घरात अस्ताव्यस्त ठेवून जाऊ नका.
- तुमच्या बिछान्याच्या बाजूला असलेला टेबल नेहमी स्वच्छ ठेवा.
- कपाटातील सर्व कपडे आणि वस्तू व्यवस्थित रचून ठेवा.
How to keep your house clean without a maid
How to keep your house clean and tidy
How to keep your house clean and hygienic
How to keep your house clean all the time
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.