www.upkarmarathi.com
Computer information in Marathiसंगणकाची माहिती (sanganakachi Mahiti)
जर मी तुम्हाला विचारलं की अनादी काळापासून तर आत्ताच्या या जगामध्ये तुम्हाला काही साम्य वाटते का तर सहजच काही किरकोळ गोष्टी सोडल्या तर तुम्ही सांगणार की पूर्वीच्या काळातील परिस्थिती आणि आताच्या काळातील परिस्थिती यामध्ये जमीन आकाशाएवढे अंतर आहे. अनेक युगे मागे टाकून शतके ओलांडून आपण एकविसाव्या शतकात प्रवेश केला आहे.मग मनात असा प्रश्न येतो की माणसाने नेमकं काय केलं? प्राप्त परिस्थितीचा स्वतःच्या उपयोगासाठी वापर करण्यासाठी स्वतःच्या राहणीमानात, खाण्यापिण्यात आणि सवयींमध्ये बदल केले. माणसाच्या काम करण्याच्या पद्धती देखील आता बदलल्या आहेत.information for computer
information of computer |
आपण सिनेमामध्ये बघतो की एक जादूचा चिराग असतो आणि तो घासल्यावर त्यामधून एक जिन बाहेर येतो तो जिन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो. अगदी तसाच संगणक आत्ताच्या युगामध्ये आपल्यासाठी काम करतो. आजच्या लेखामध्ये आपण नका विषयी माहिती जाणून घेऊया. (Computer information in Marathi)
Computer information in Marathiसंगणकाची माहिती (sanganakachi Mahiti)
Computer information in Marathi |
संगणकाचा इतिहास history of computer in Marathi
चार्ल्स बॅबेज यांनी डिफरेंशियल इंजिन नावाच्या उपकरणाचा शोध लावला. हे उपकरण अत्यंत वेगाने गणना करणारा जगातील पहिला संगणक असल्याचे म्हटले जाते. त्या काळातील गणितज्ञांना अचूक आकडेवारी करणे अडचणीचे होत असे. ही अडचण दूर करण्यासाठी चार्ल्स बॅबेज यांनी या यंत्राचा शोध लावला होता.
ज्यावेळी चार्ल्स बॅबेज यांनी हे डिफरेंशियल इंजिन बनवायला सुरुवात केली त्या वेळी सरकारने आर्थिक मदत केली पण सुमारे 25 हजार स्पेअर पार्ट व 17000 पाऊड खर्च केल्यानंतरही अपयश हाती आले. त्यामुळे सरकारने ने हा प्रोजेक्ट बंद केला पण बॅबेज यांनी कधीच हार मानली नाही.
चार्ल्स बॅबेज यांनी इंजिन बनवण्याच्या कामाला सुरुवात केली आणि नवीन इंजिन बनवले देखील. हे इंजिन पूर्वीपेक्षा अधिक जास्त वेगवान होते. हे घडण्यासाठी 1832 हे वर्ष उजाडले.
संगणकाचे (कम्प्युटरचे) भाग-parts of computer in Marathi
कम्प्यूटर ची प्राथमिक माहिती घेतल्यानंतर आता आपण पुढे बघूया. कम्प्यूटर चे भाग कोणते असतात?कम्प्युटर या शब्दाचा अर्थ असा आहे , गणना करणे म्हणजेच मोजणी करणे. ही मोजणी करण्यासाठी संगणकाला दोन भागांमध्ये काम करावे लागते.
ज्या पद्धतीने माणसाच्या कोणतीही क्रिया करण्यासाठी शरीर आणि बुद्धी म्हणजेच मेंदू याचा उपयोग होतो. मेंदूमध्ये कोणतीही कल्पना किंवा युक्ति येते आणि त्याचे काम शरीरा मार्फत केले जाते. अगदी त्याच पद्धतीने संगणकामध्ये देखील मुख्य सॉफ्टवेअर (software) आणि हार्डवेअर (hardware) असे दोन भाग असतात. या दोन्ही भागांची आपण माहिती जाणून घेऊया.
सॉफ्टवेअर (software )
सॉफ्टवेअर म्हणजे कम्प्युटरची बुद्धी किंवा कम्प्युटरचा आत्मा आहे असे म्हटले तरीही चालेल. सॉफ्टवेअर हा एक प्रोग्रॅम असतो जो कम्प्युटरला दिलेले काम व्यवस्थित पणे करत असतो. म्हणजे शरीर कितीही चांगले असले परंतु त्यात जर आत्मा(जीव) नसला तर त्याचा काही उपयोग नाही त्या पद्धतीने संगणक कितीही आकर्षक असलीत परंतु त्याचे सॉफ्टवेअर नसले तर त्याचा काहीही उपयोग होऊ शकत नाही.
हार्डवेअर (hardware)
जसे आपल्यासाठी आपले शरीर असते तस कॉम्प्युटरचे शरीर म्हणजेच त्याचे हार्डवेअर. संगणकाच्या हार्डवेअर बाबतीत बोलायचे झाले तर त्यामध्ये इनपुट डिव्हाईसेस आणि आऊटपुट डिव्हाइसेस असे अजून भाग पडतात. कीबोर्ड माऊस मदरबोर्ड मेमरीची प्रिंटर मॉनिटर इलेक्ट्रॉनिक सर्किट केबल स्विच एक्स पेन्शन कार्ड इत्यादीचा समावेश होतो. या सर्व वस्तूंना आपण स्पर्श करून अनुभवू शकतो म्हणून यांना हार्डवेअर असे म्हटले जाते. या सर्व हार्डवेअर च्या माध्यमातून सॉफ्टवेअर काम करते व एकत्रितपणे संगणक काम करते असे आपण म्हणू शकतो.(Computer info in Marathi)
संगणकाच्या भागांची नावे (computer parts names)
संगणकाचे भाग आहेत ते इनपुट डिवाइस आणि आऊटपुट डिव्हाइस असे विभागता येतात .
इनपुट डिवाइस
माऊस ,कीबोर्ड ,टच स्क्रीन
आऊटपुट डिव्हाइसेस
मॉनिटर, स्पीकर ,स्क्रीन, प्रोजेक्टर, प्रिंटर
इतर डिव्हाइसेस
फ्लॉपी डिस्क, प्रोसेसर, रॅम, रॉम ,हार्ड डिस्क इत्यादी .
संगणकाचे उपयोग व महत्व (uses of computer)
अलीकडच्या काळात सुशिक्षित आणि अशिक्षित या संकल्पना बदलल्या आहेत संगणकाचे ज्ञान नसलेल्या व्यक्तीला आज-काल अशिक्षित म्हटले जाते सध्याचे युग हे संगणकाचे युग आहे असे म्हणावे लागेल हे देखील सर्वांनी मान्य केले आहे.
संगणकाने मानवी जीवनाला खूप गती दिली आहे त्यानंतर काळानुरूप मानवाने संगणकात आवश्यकतेनुसार बदल केले संगणक ही मानवी जीवनातील मूलभूत गरज बनली आहे संगणक काम करण्यासाठी बराच वेळ वाचवतो माणसाच्या मेहनतीमुळे त्याची काम करण्याची क्षमताही वाढली आहे.
जेव्हा लोकांना प्रथम संगणकाची ओळख झाली तेव्हा अनेकांना वाटले की ते एक मोठे संकट आहे संगणकामुळे लोक बेरोजगार होतील, अशी भीती अनेकांना होती. ही सुरुवातीची भीती मात्र फार काळ टिकली नाही. संगणकामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्याची एकमेव अट म्हणजे संगणकाचे ज्ञान घेणे संगणक वापरण्याची कला शिकणे.
बऱ्याच ठिकाणी संगणक साक्षर त्यामुळे लोकांचे उदरनिर्वाह करणे सोपे झाले आहे. संगणकामुळे कामात शिस्त आली संगणकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणतेही काम अतिशय जलद आणि अचूकपणे करू शकते.अंकगणित गणित आणि छपाई यासारखी अनेक गुंतागुंतीची कामे संगणक करू शकतात. संगणकाच्या विविध गुणधर्मामुळे आता अनेक कार्यालयांमध्ये तसेच मोठ्या कंपन्यांमध्ये संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. संगणक कागदाची बचत करतात.
संगणक तुम्हाला हवी तेवढी माहिती साठवून ठेवू शकतो आणि ती माहिती तुम्हाला काही क्षणात अगदी कमी वेळात मिळू शकते त्यामुळे संगणकाची गरज सातत्याने वाढत आहे.आता असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे संगणकाने आपला दबदबा निर्माण केला नाही. संगणक कल्पवृक्ष आहे संगणक पाहिजे ते करून देते.
संगणकाचे उपयोग व कामे(uses of computer in Marathi)
- संगणकाचा काम करण्याचा वेग खूप जास्त असतो त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात एखादा डाटा प्रोसेस करणे करता संगणकाला केवळ काही सेकंदाचा वेळ लागतो .
- संगणकाकडून चुका होणे जवळजवळ अशक्य आहे जर तुम्ही पुरवलेला डेटा योग्य आणि अचूक असेल तर त्यावर प्रक्रिया करून मिळणारे उत्तर देखील अचूकच मिळेल यात कसलीही शंका नाही.
- कितीही मोठ्या प्रमाणात माहिती असली तरीदेखील संगणकामध्ये ती अत्यंत थोड्या जागेमध्ये साठवता येऊ शकते व याहून महत्त्वाचे म्हणजे आपल्याला हवे तेव्हा ती माहिती आपण पुन्हा बघू शकतो व मिळवू शकतो.
- संगणकावर आपण पत्र लिहिणे चित्र काढणे चित्र रंगवणे ऑनलाईन फॉर्म भरणे संगीत ऐकणे कार्यालयीन कामकाज करणे एखादी सॉफ्टवेअर डेव्हलप करणे व्हिडिओ पाहणे या प्रकारचे अनेक कामे करू शकतो.
- तुमच्यामध्ये जेवढा जोर असेल तेवढा वापरून तुम्ही संगणकाकडून काम करून घेऊ शकता. संगणक कधीही थकत नाही. त्याची वेळोवेळी काळजी घेतली पाहिजे.
FAQs
संगणक काय कार्य करते?संगणक( computer) म्हणजे काय?
संगणक हे मोबाईल प्रमाणेच इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आहे. यामध्ये संगणक वापरणाऱ्या व्यक्तीकडून संगणकाला जी माहिती दिली जाते त्यावर ती प्रक्रिया करून योग्य तो रिझल्ट मिळवता येतो. याबरोबरच संगणकामुळे हवामानाचा अंदाज रंगकाम चित्र काम नवीन नवीन घरांची डिझाईन इत्यादी कामे करता येतात.
कॉम्प्युटर चा फुल फॉर्म काय आहे?(computer full form in Marathi)
संगणकाला इंग्लिश मध्ये कॉम्प्युटर असे म्हणतात. Computer = commonly operated machine practically used in technical and educational research.
संगणकाचे प्रकार?कॉम्प्युटर चे प्रकार कोणते?
तसे पाहता संगणकाचे 11 प्रकार पडतात परंतु त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरून ते खालील तीन प्रकारांमध्ये वर्गीकृत केले आहेत
- Analogue computers
- digital computers
- hybrid computers
संगणकाचा शोध कोणी लावला?/संगणकाचे जनक कोण आहेत?
चार्ल्स बॅबेज,(father of computer)
संगणकाची पहिली पिढी कोणती होती?
1940-1956
Computer chi vyakhya
संगणकाची व्याख्या आपल्याला खालील प्रकारे करता येऊ शकते इलेक्ट्रॉनिक उपकरण ज्यामध्ये माहिती संघटित करता येते त्या माहितीवर प्रक्रिया करून आपल्याला अपेक्षित निकाल मिळवता येतो असे यंत्र होय.
|संगणकाची कार्यक्षमता
संगणकातील RAM व ROM अपग्रेड करून संगणकाची कार्यक्षमता वाढवता येते .
कृपया लक्ष द्या
संगणका विषयी माहिती तुमच्याकडे जर असेल तर आम्हाला कमेंट मध्ये जरूर सांग आता तुम्ही दिलेली माहिती आवडल्यास या लेखात आपण ती अपडेट करूया घाबरू नका मला कोणाचे फुकट क्रेडिट नको तुमच्या नावासह आपण यामध्ये बदल करूया.
महत्वाचे
तुम्ही दिलेल्या प्रेरणादायी कमेंट्स आमच्यासाठी शक्तीचे कार्य करतात त्यामुळे तुम्हाला कम्प्यूटर ची संपूर्ण माहिती computer information in Marathi खाल्लेत जर आवडला असेल तर फेसबूक इंस्टाग्राम इत्यादी वर शेअर करायला अजिबात विसरू नका आणि उपकार मराठी चे फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका.
निष्कर्ष
प्रिय वाचक मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण संगणका विषयी माहिती मराठीमध्ये जाणून घेतली(computer information in Marathi). ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा आणि तुमच्या मित्रांना पण ही माहिती शेअर करा.
संगणकाविषयी लोक खालीलप्रमाणेही माहिती शोधतात .
|Computer information in Marathi pdf
|Computer information in Marathi video
|Computer science in Marathi
|Computer engineering information in Marathi
|Computer basic information in Marathi
|Computer keyboard information in Marathi.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.