www.upkarmarathi.com
पितामह दादाभाई नौरोजी |dadabhai naoroji information in Marathi
पितामह दादाभाई नौरोजी
dadabhai naoroji information in Marathi,भारताचे पितामह म्हणून दादाभाई नौरोजी सर्वांना परिचित आहेतच. खरोखर त्यांना पितामह म्हणावं असंच त्यांचं कार्य होतं. दादाभाई नौरोजी यांना 92 वर्षाच दीर्घायुष्य लाभल. त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचा अर्थशास्त्र आणि गणित विषयांचा व्यासंग ,त्या बरोबरच त्यांनी केलेली थोर देश सेवा आणि त्यांची महनीय कामगिरी बघितली तर ते खरोखरच भारताचे पितामह होते हे मनोमन पटते.
Grand old man of India |
पितामह दादाभाई नौरोजी
|dadabhai naoroji information in Marathi
बालपण (childhood)
दादाभाईंचा जन्म मुंबई येथे 4 सप्टेंबर 1825 रोजी झाला . दादाभाईचे आडनाव होतं दोरदी (दोर्डी). नवसारी जवळ धर्मपुर या गावी दोरदी कुटुंबाची शेतीवाडी होती. मुंबईला येण्यापूर्वी दादा भाईंचे आजोबा आणि वडील शेती करत होते. दादाभाईंच्या वडिलांचे नाव नवरोजी पालनजी दोरदी(दोर्डी) असे होते तर आईचे नाव माणकबाई होते. दादाभाई चार वर्षांचे होते तेव्हाच त्यांचे वडील वारले. वडिलांच्या मृत्यूनंतर आईनेच त्यांचे पालन पोषण केले त्यांना शिकवले .त्यांच्यावर अत्यंत उत्तम संस्कार केले. दादाभाई ज्यावेळी मोठे झाले तेव्हा ते अभिमानाने म्हणत,
"मी आज जो कोणी घडलो आहे तो माझ्या आईमुळेच!"
शिक्षण( education)
दादाभाईंनी एलफिन्स्टन इन्स्टिट्यूट या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतले. त्यांची बुद्धिमत्ता पाहून त्यांचे शिक्षक त्यांना भारताचे आशास्थान म्हणत त्यांचे हे शब्द दादाभाईंनी खरे करून दाखवले.शिक्षण पूर्ण केल्यानंतर दादाभाईंनी शिक्षकाचा पेशा स्वीकारला ते गणिताचे प्राध्यापक झाले याच सुमारास दादाभाई सार्वजनिक कार्यात भाग घेऊ लागले.दादाभाईंनी 1851मध्ये रास्त गोफ्तार नावाचे वृत्तपत्र काढले. या वृत्तपत्रांमधून त्यांनी लोकजागृतीचे काम केले.
पुढच्या वर्षी बॉम्बे असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेत दादाभाईंनी जगन्नाथ शंकर शेठ यांच्याबरोबर पुढाकार घेतला या संस्थेने ब्रिटिश पार्लमेंट कडे मागणी केली की इंग्रज सरकारने भारतीयांच्या मताची कदर केली पाहिजे आणि उच्च अधिकार पदांवर भारतीयांना स्थान दिले पाहिजे.
सामाजिक कार्य ( social work of Dadabhai Naoroji)
1855 साली एका व्यापारी कंपनीचे भागीदार म्हणून दादाभाई इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये वास्तव्यास असताना त्यांनी इंग्लंड आणि भारत यांच्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा सखोल अभ्यास केला .भारताच्या दुर्दशेची त्यांना तीव्र जाणीव झाली. शिक्षणासाठी इंग्लंडला गेलेले भारतीय तरुण हळूहळू त्यांच्याभोवती जमू लागले. त्यांच्या विचाराने प्रभावित होऊ लागले .दादाभाई हे त्यांच्या शांत, सुशील, निर्मळ स्वभावामुळे आणि बुद्धिमत्ते मुळे इंग्रज लोकांमध्येही प्रिय होते.
दादाभाईंनी इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली .या संस्थेच्या शाखा मुंबई, कलकत्ता,मद्रास या शहरांमध्येही सुरू केल्या. या संस्थेच्या सभांमधून भारताच्या विकासासाठी आवश्यक जिव्हाळ्याच्या विविध विषयांवर चर्चा होत असे. विविध निबंध वाचले जात .एका सभेमध्ये भारताविषयी इंग्रजांचे कर्तव्य या विषयावर दादाभाईंनी एक निबंध वाचला होता.
भारताची गरिबी घालवण्यासाठी इंग्रज सरकारने आणि भारतातील लोकांनी काय केले पाहिजे हे दादाभाईंनी अगदी परखडपणे सांगितले. या विषयासंबंधी त्यांनी अनेक भाषणे देखील दिलीत लेख लिहिले, पुस्तक लिहिले. राष्ट्राच्या विकासामध्ये आर्थिक आणि शैक्षणिक गोष्टींना अत्यंत महत्त्वाचे स्थान असते याकडे दादाभाईंनी लोकांचे लक्ष सर्वप्रथम वेधले.
Poverty and un-british rule in India हा दादाभाईंनी लिहिलेला ब्रिटिश राजवटीखालील भारताच्या दारिद्र्याचा ऊहापोह करणारा ग्रंथ त्या वेळी फारच गाजला होता.
ब्रिटिशांचे भारतात धोरण कसे आहे याचे वर्णन करण्यासाठी दादाभाईंनी "जेवढं लुबाडता येईल तेवढं लुबाडण " या शब्दात केला होता. त्यांनी ब्रिटिश सरकारला बजावलं की भारतालाच नव्हे तर इंग्लंडलाही हे धोरण घातक ठरणार आहे. करांच्या आणि कारभारावरील खर्चाच्या रूपान भारतातून कोट्यावधी रुपयांची लूट चालू आहे हे त्यांनी आकडेवारीने सिद्ध करून दाखवलं. मालक आणि गुलाम यांना सहानभुतीपेक्षा सहकार्याच्या व समानतेच्या भावनेने भारताकडे पाहण्याची सूचना त्यांनी ब्रिटिश सरकारला केली.
ब्रिटीश पार्लमेंट मध्ये निवड (the first Indian to get elected in the house of commons )
इंग्लंड मधल्या वास्तव्यात केलेल्या लोकसेवेमुळे दादाभाई ब्रिटिश पार्लमेंटमध्ये 1902 मध्ये निवडून गेले होते. पार्लमेंट मध्ये केलेल्या प्रभावी भाषणांमधून त्यांनी भारतासारख्या गरीब देशावर इंग्रजांनी आपल्या शासनाचं ओझ लादू नये आणि भारताची पिळवणूक करू नये ,असं स्पष्टपणे वारंवार सांगितलेलं होतं.
भारतीय राष्ट्रीय सभा (इंडियन नॅशनल काँग्रेस) स्थापन करण्यात दादाभाईंनी मोठा हातभार लावला होता. दादाभाईंनी केलेल्या अजोड देश सेवेमुळे त्यांना तीन वेळा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला होता.1906 साली दादाभाई भारतात परत आले .त्यावर्षी कलकत्त्याला भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी स्वराज्याची मागणी केली, आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले,
" तलवार, दडपशाही, लूट यांच्या जोरावर ब्रिटीश राज्यकर्ते भारतावर राज्य करू पाहत आहेत पण आम्ही ते होऊ देणार नाही . भारतीय लोकांना कणा आहे. अखेरपर्यंत हिम्मत धरण्याची ताकद आहे, हे सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आम्हाला ब्रिटिश सरकारची मेहरबानी नको . आम्हाला न्याय पाहिजे. आपलं स्वतःचं सरकार पाहिजे. इंग्लंडच्या जनतेला जे स्वातंत्र्य आहे ते आम्हाला हवं. केवळ चांगलं शासन हा स्वराज्याला पर्याय असू शकत नाही . स्वराज्यासाठी चळवळ करा. अखंड चळवळ करा .एकोप्याने रहा. चिकाटीने झगडा ,स्वराज्य संपादन करा .दारिद्र्यात खितपत पडलेल्या ,उपासमारीने मरणार्या कोट्यावधी गरीब देश बांधवांना या घोर आपत्तीतून वाचवा . स्वराज्यासाठी आपण बहिष्काराची चळवळ उभारली पाहिजे."
स्वराज्य ,स्वदेशी आणि बहिष्कार हा मंत्र काँग्रेसच्या व्यासपीठावरून दादाभाईंनी प्रथम उच्चारला आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीची योग्य दिशा देशाला दाखवली.दादाभाईंच कार्यक्षेत्र केवळ राजकारणा पुरते मर्यादित नव्हतं. ते एक समाजसधारक देखील होते. जातिबंधने त्यांना मान्य नव्हती. स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे. स्त्री-पुरुषांचा दर्जा समान असला पाहिजे, त्यांना समान हक्क दिले पाहिजेत या गोष्टीचा त्यांनी हिरिरीने पुरस्कार केला.
आपला देश स्वावलंबी व्हावा, यासाठी ते झटले. त्यांनी जमशेदजी टाटा यांना भारतात भांडवल उभारून पोलादाचा कारखाना उभारण्यासाठी उत्तेजन दिले.
कार्यरत असतानाच 30 जून 1917 रोजी दादाभाई यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहताना न्यायमूर्ती चंदावरकर म्हणाले की,
"दादाभाईंच्या रूपानं भारताच्या क्षितिजावर जो सूर्य उगवला तो आज जरी मावळला असला तरी पुन्हा नव्या भारताच्या रूपाने तो उदयास येणार आहे. या नव्या भारताच्या उभारणीसाठी ते जगले .पराकाष्ठेने झटले आणि त्यांनी आपलं जीवन कार्य निष्ठेने पार पाडलं."
Dadabhai naoroji presented which famous theory in his paper poverty and unbritish rule in India.
faqs
What religion was dadabhai naoroji?
Parsi
Why dadabhai is called grandfather of India?
Dadabhai is known as one of the few who gave birth to the the modern freedom movement in India. Mahatma Gandhi vansh wrote to dadabhai that Indians look at you just like children look at father"
आधुनिक भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा पाया घालणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये दादाभाईंचे नाव घेतले जाते. त्यांनी भारतीयांच्या मना मध्ये स्वाभिमान जागवण्यासाठी सतत प्रयत्न केले व इंग्रजांचे भारता विषयी असलेले धोरण कसे चुकीचे आहे हे देखील सतत दाखवून देण्याचा प्रयत्न केला. गांधीजींनी एकदा त्यांना लिहिले होते की ,"ज्या पद्धतीने मुल बापाकडे बघते, तसेच संपूर्ण देशातील जनता तुमच्याकडे बघते."
What was dadabhai naoroji theory
Drain of Wealth
What was the contribution of dadabhai naoroji? दादाभाई नौरोजी यांचे योगदान?
- दादाभाई नवरोजी यांनी धर्म मार्गदर्शन नावाचे मासिक सुरू केले.
- Vernacular press act ला त्यांनी विरोध केला.
- जमीनदाराकडून गरीब शेतकऱ्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध दादाभाईंनी चळवळ सुरू केली.
- इंग्रजांकडून कशा पद्धतीने भारताचे आर्थिक शोषण केले जात आहे, याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. याविषयीचे मत त्यांनी Poverty and unbritish rule in India ग्रंथात मांडले.
Was dadabhai naoroji a freedom fighter
What is the nickname of dadabhai naoroji
grand old man of India
Poverty and unbritish rule in India summary
दादाभाई नवरोजी यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले
दादाभाईंनी 1851मध्ये रास्त गोफ्तार नावाचे वृत्तपत्र काढले
Dadabhai Naoroji death
30 जून 1917 रोजी दादाभाई यांचे निधन झाले.
Who was known as the grand old man of India.
पितामह दादाभाई नौरोजी |dadabhai naoroji
Who was the first Indian to get elected in the house of commons
Dadabhai naoroji
Who wrote the biography of dadabhai naoroji?
Dinyar Patel wrote the biography of dadabhai naoroji.
हे वाचायला विसरू नका
- महात्मा ज्योतिबा फुले
- स्वामी दयानंद सरस्वती
- राजा राममोहन रॉय
- कर्मवीर भाऊराव पाटील-गरिबांच्या दारी शिक्षणाची गंगा नेणारा महर्षी
- संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
- शिवाजी महाराज माहिती|shivaji maharaj mahiti|
- महात्मा गांधी यांचे प्रेरक विचार | motivational thought of Mahatma Gandhi.
- बाळासाहेब पंतप्रतिनिधी , भवानराव श्रीनिवास पंतप्रतिनिधी | Balasaheb pantpratinidhi ,aundh sansthan
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.