www.upkarmarathi.com
ससा माहिती मराठी |rabbit information in Marathi
Rabbit information in Marathi |
rabbit information in Marathi, आपल्याला लहानपणापासून आपण सशाच्या अनेक गोष्टी ऐकत आलेलो असतो. एक लहान व अत्यंत सुंदर प्राणी म्हणजे ससा. विविध चित्रांमध्ये आणि कार्टून्स मध्ये गाजर खाणारा ससा आपल्याला बऱ्याच वेळा बघायला मिळतो. ससा वेगवेगळ्या रंगाचा असतो परंतु पांढ-या रंगाचा ससा फारच उठून दिसतो. टुणटुण उड्या मारणारे ससे अत्यंत चपळ असतात. सध्याच्या काळात ससे पालन एक व्यवसाय म्हणून केले जाते. आजच्या लेखामध्ये आपण , ससा माहिती मराठी (rabbit information in Marathi) याविषयी जाणून घेणार आहोत.
ससा माहिती मराठी (rabbit information in Marathi)
- ससा हा एक सस्तन प्राणी आहे.
- ससा लेपोरीडे या कुटुंबातील आहे.
- सशाला वैज्ञानिक भाषेमध्ये ऑरीकटोल्यागस क्यूनिक्युलस असे म्हटले जाते .
- सशाचे आयुर्मान साधारणपणे दहा ते बारा वर्षे असते.
- मनुष्य स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी सशासारख्या शानदार प्राण्याची शिकार करतात व त्यांचे मांस खातात.
- मादी ससा एका वर्षामध्ये कमीत कमी 4-7 पिल्लांना जन्म देते.
- सशाच्या सुमारे 13 जंगली प्रजाती आहेत.
- 305 प्रजातीचे ससे पृथ्वीवर पाळले जातात.
- सर्वसाधारणपणे सशाच्या तोंडामध्ये 28 दात असून ते जीवनभर वाढत असतात.
- सशाचे दात दर महिन्यात एक सेंटीमीटर पर्यंत वाढू शकतात.
सशाची माहिती मराठी,sashachi mahiti marathi
- लहानपणीच्या गोष्टींमध्ये ऐकलं प्रमाणेच ससा हा अत्यंत झोपाळू प्राणी आहे तो दिवसातून सुमारे अठरा वेळा डुलक्या घेतो.
- एखाद्या छोट्या जागेत आपण जाऊ शकू की नाही याचा अंदाज येण्यासाठी सशाच्या मिशा त्याच्या शरीराचा रुंदी एवढ्या मोठ्या असतात.
- एक गमतीदार गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला घाम येतो तसा सशांना नाहीयेत त्यांच्या शरीरातील उष्णता ते कानाद्वारे आणि त्वचेद्वारे बाहेर टाकतात.
- माणसासारखाच ससा देखील समूहाने राहणारा प्राणी आहे.
- विसावे शतक सुरू होण्यापूर्वी सशांचा फक्त कातडी मिळविण्यासाठी उपयोग केला जात असे, तसेच खाण्यासाठी देखिल पाहिले जात असत.
- टुणटुण उड्या मारण्यात ससा चांगलाच चपळ असतो, तो छत्तीस इंचापर्यंत उंच उडी मारू शकतो.
- आता लोक असे पाळत असले तरी देखील सगळेच ससे पाळण्या सारखे नसतात काही रानटी ससे आकाराने बरेच मोठे असतात.
- आकाराच्या बाबतीत जायन्ट जर्मन नावाचे सर्वात मोठे असतात.
- मादा ससा ज्यावेळी पिलांना जन्म देते त्यावेळी अगोदर बिळ बनवून त्यामध्ये गवत ,स्वतःचे केस वापरून बिछाना तयार करते.
- सस्तन प्राणी असल्याने ती पिलांना जन्म देते आणि पिले जन्माला आल्यावर त्यांचे डोळे उघडे नसतात.
- ससा गवत अत्यंत आवडीने खातो त्या बरोबरच शेतामधील भाजी, मुळे, गाजर हेदेखील त्याचे आवडते खाद्य पदार्थ आहेत.
- शाकाहारी असल्यामुळे ससा पाळणे सोपे आहे.
ससा काय काय खातो rabbit food in in Marathi
ससा अगदी साध्या सरळ राहणारा प्राणी आहे तो गवत खातो. शेतामध्ये उगवणाऱ्या सर्व प्रकारच्या भाज्या जसे की गाजर मुळा हे सर्व खातो.
सशाचा प्रजनन काळ किती असतो?(mating season and habits)
मादी सशाची गर्भावस्था 30 ते 35 दिवसांची असते त्यानंतर पिल्ले जन्माला येतात. जन्माला आल्यावर त्यांचे डोळे बंद असतात आठ ते दहा दिवसांनी डोळे उघडतात.
सशाच्या घराला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?
सशाच्या घराला इंग्लिश मध्ये वॉरन म्हणतात.
ससा प्राण्याबद्दल काही तथ्य, facts about rabbit
- सशांचे दात जन्मभर वाढत राहतात.
- जंगलात लागणाऱ्या आगीपासून संरक्षण व्हावे म्हणून ससे जमिनीत खोल बीळ तयार करतात.
- जन्माच्यावेळी सशाला केस नसतात.
- मास मिळवण्यासाठी चीन मध्ये सर्वात जास्त ससे मारले जातात.
- तीक्ष्ण नखांमुळे ससा जमिनीत बिल तयार करू शकतो.
- मास मिळवणे हाच मुख्यत्वेकरून ससे पालनाचा उद्देश आहे.
- सशांच्या तोंडामध्ये 17000 पेक्षा जास्त रुचिकलिका असतात म्हणजे ज्यामुळे चव कळते अशी अतिसूक्ष्म रचना.
- हे ही नक्की वाचा - सशाचे मनोगत
प्रिय वाचकहो वरील ससा प्राण्यांची माहिती वाचून तुम्हाला ससा याविषयी चांगलेच ज्ञान मिळेल. यात आम्हाला अजिबात शंका वाटत नाही तरीदेखील rabbit information in Marathi language या आजच्या लेखामध्ये काही त्रुटी असतील किंवा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तसे आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा तसेच तुमच्या मित्रपरिवारात देखील हि माहिती पोहचवा.
Information about rabbit in Marathi या लेखामध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा खूप खूप धन्यवाद.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.