www.upkarmarathi.com
कोरोना काळातील माझी शाळा | corona Kalatil Majhi Shala
corona Kalatil Majhi Shala |
कोरोना काळामध्ये जी परिस्थिती संपूर्ण देशाने आणि जगाने अनुभवली अशी परिस्थिती येईल असा कुणीही अंदाज केलेला नव्हता. सर्व जगातील सर्वच क्षेत्र या कोरोना महामारी मुळे प्रभावित झाले होते. शिक्षणक्षेत्र देखील यापासून वाचलेले नाही.
या कोरोना महामारी च्या काळामध्ये आमच्या शाळेत शिक्षण कसे चालू राहिले याविषयी मी आपल्यासमोर थोडे मत व्यक्त करणार आहे.
सुरुवातीचे काही दिवस तर कुणालाच काही उमगत नव्हते प्रशासनाला ही नाही आणि शासनालाही नाही त्यामुळे काय करावे याचा निर्णय होत नव्हता. प्रत्येक क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकारी गोंधळलेल्या अवस्थेत होते. सामान्य जनताही तशाच संभ्रमित अवस्थेत होती.
जून महिन्यात ज्या वेळेस शाळा सुरू होतात त्या काळामध्ये आमच्या शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे चुकल्यासारखं वाटत होतं परंतु शालेय प्रशासनाने आमच्या अभ्यासाची काळजी घेतली सोशल डिस्टंसिंग चे पालन करून शिक्षक आम्हाला शिकवण्यासाठी घरी येऊ लागले. विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही व कोरोनाविषाणूचा शिरकाव होणार नाही याची शाळेच्या प्रशासनामार्फत देखील कठोर काळजी घेतली गेली.
कधीतरी बंद शाळेत समोरून जात असताना आमचे मन हेलावून जात होते . सुरुवातीच्या काळात शाळा बंद,,, सुट्ट्या मिळणार,,,, त्यामुळे आम्हाला आनंद होत होता. परंतु काही कालावधीनंतर शाळेशिवाय आम्हाला करमेनासे झाले.
घरी असताना एकांतात बसून शाळेत केलेली मजा मस्ती सतत आठवत होती .शिक्षकांचे शिकवणे, आमच्या चुकांवर कधी तरी रागवणे, आम्हाला समजावून सांगणे या सर्व गोष्टींच चित्र मनासमोर तरळत होते. शाळेच्या बाकांवर बसून शिक्षकांची शिकवणे बघणे. तासावर कोणतेही शिक्षक नसताना बाकावर कान टेकून हळू आवाजात बोटांनी त्यावर संगीत वाजवणे. शेजारी बसलेल्या मित्राची टिंगल करणे त्याची खोडी करणे या सर्व गोष्टी आठवत होत्या.
माझी शाळा तर माझ्या स्वप्नात देखील येत होती. एक दिवस शाळा स्वप्नात येऊन मला सांगू लागली," अरे बाळांनो, मला तुमची खूप आठवण येते .कधी पुन्हा शाळा सुरू होतात असे झाले आहे .तुमची किलबिल ऐकून मला खूप दिवस झाले .आता अगदी नकोनकोसे झाले आहे. तुम्ही शाळेत असताना तुमच्या गोंगाटाचा मला त्रास होतो परंतु आता मात्र तुम्ही नसताना त्या गोंगाटाचे महत्व मला जाणवते आहे.
अजून काही दिवस हा विरह मी सहन करेन. परंतु या महाभारी च्या काळामध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या. शासन आणि प्रशासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा म्हणजे लवकरच आपण पुन्हा भेटू.
स्वप्नात माझ्याशी बोललेली शाळा माझ्या डोळ्यांच्या पापण्या कधी ओल्या करून गेली समजलेही नाही.
निबंध क्रमांक 2
*शाळा बंद पण शिक्षण चालू*
*आज शाळेला आलो.दरवाजा उघडताच आसपासची13-14 मुले जमा झाली.एकच गलका करून सर आम्हाला शाळेत येऊ द्या ,वर्गात घ्या ना ,असा ओरडा सुरू केला.त्यांच्याशी जवळ जवळ 2-3 तास संवाद झाला .संवाद करत असताना नेहमी प्रमाणे मुलं ओरडली."सर,कुरकुरे* *खावाना.""सर कुरकुरे खावाना."*
*माझ्याकडे 100 रूपयाची नोट होती. चौथीला गेलेल्या प्रेमला मुले मोजायची सांगितली.व प्रश्न केला, "सर्व मुलांना 5-5 रूपयाचे कुरकुरे घेतले तर मला तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील?" प्रेम ला काही सांगता आले नाही.आकडा मात्र 14 असा अचूक सांगितला, लॉकडाऊन इफेक्ट स्पष्टपणे जाणवत होता.तसे मी 3री-4थीतल्या प्रत्येक मुलाला विचारले कुणालाच काहीच सांगता आले नाही.त्यात दिनेशनेच सोपी युक्ती सांगितली, "सर या पैशाचे 10 -10 रूपये मी सुटे करून आणतो अन प्रत्येकाची जोडी करून 10-10 रूपये देऊन टाका."ठीक आहे म्हणंत मी ,"किती जोड्या कराव्या लागतील?"असे विचारले. तेवढ्या वेळात सर्वांनी जोड्या पण करून घेतल्या ."सात जोड्या झाल्या सर." प्रेम ओरडला."आता किती पैसे द्यावे लागतील?" मी विचारले. दिनेश बोलला सर 70 रूपये द्या.त्याने बरोबर हिशेब केला* *होता.त्याच्याकडूनच शेजारच्या दुकानातून मी 100 चे सुटे आणून घेतले.त्याने ते बरोबर आणले.व जोडीप्रमाणे 10-10 रूपये सर्वांनी खर्च केले .पण फक्त चौथीच्या कोमलने खर्च केले नाही.सर्वजन आपापला खाऊ वर्गाच्या पडवीत खात होते.माझे लक्ष कोमलकडे गेले.तिला विचारलं ,"तू का काही घेतलं नाहीस ?" ती म्हणाली, "या पैशाचा मी मास्क घेणार आहे.कुठे बाहेर जायचं असलं कि माझ्याकडे मास्क नसतो.मास्कसाठी आप्पापण (वडील) पैसे देत नाहीत.म्हणून मी मास्कसाठी पैसे साठवतेय.*
*मला तिचे आश्चर्य वाटले वाटलं खाऊचा मोह टाळून ही चिमुरडी कोरोनापासून स्वतःचा तसेच इतरांचा बचाव व्हावा याचा विचार करतेय.त्यासाठी पोटाला चिमटा घेतेय.मला ती ख-या अर्थाने कोरोना योद्धा वाटली.एवढ्या लहान वयात तिची समज तिचे विचार खूप मोठे होते.नंतर तिला मी तिच्या प्रयत्नांना आधार म्हणून मास्कसाठी पैसे देऊ केले ;पण ती म्हणाली," पैसे नकोत सर , मास्कएवढे पैसे साठलेत माझे."*
*कोमलचा असा स्वाभिमानी स्वभाव पाहून मला ती माझी विद्यार्थीनी आहे याचा अभिमान वाटला.*
*लेखकः उपेंद्रराज देवढे *जि.प.शा.औरंगपूर ता.शहादा*
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
प्रिय मित्रांनो अजून जसा वेळ मिळेल तसा हा निबंध वाढवण्याचा प्रयत्न करेल. तसेच याच विषयावर अजून वेगवेगळे निबंध लिहिण्याचा प्रयत्न करेन .तोपर्यंत तुम्हाला काही मुद्दे सुचत असतील तर तेही मला कमेंट करून सांगा .आपण मिळून निबंध पूर्ण करूया. धन्यवाद.
या निबंधाचा लोक खालील प्रमाणे शोध घेतात,
|कोरोना काळातील मुलांचे शिक्षण.
|कोरोना महामारी व शिक्षण.
|कोरोना काळातील माझी शाळा.
|Corona Kalatil maji school
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.