www.upkarmarathi.com
Women's day information , in Marathi
महिला दिवस माहिती
मित्रांनो स्त्रिया वंदनीय असतात असे आपल्या ग्रंथांमध्ये अनेक वर्षांपासून लिहून ठेवलेले आहे. स्त्रियांची महती सांगताना असे म्हटले जाते की,
नारी की निंदा मत कर यार
नारी तो रतन की खाण है|
इसी नारी से जन्मे
राम कृष्ण हनुमान हे|
अशा या स्त्रियांचा हक्काचा दिवस म्हणजे महिला दिवस यालाच आपण महिलादिन असेही म्हणतो. आजच्या या लेखामध्ये आपण महिला दिनाविषयी भाषण, माहिती (women's day speech) आणि छान निबंध(essay) बघूया.
जागतिक महिला दिन भाषण |women's day speech in Marathi
इतिहास
दरवर्षी आठ मार्च रोजी जगभर जागतिक महिला दिन साजरा करतात. जागतिक महिला दिन साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे महिलांचा सन्मान आणि त्यांच्या अस्तित्वाला बळ देणे.
सोशालिस्ट पक्षाच्या सांगण्यावरून अमेरिकेत सर्वप्रथम 28 फेब्रुवारी 1909 रोजी महिला दिन साजरा करण्यात आला. नंतर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी महिला दिन साजरा करू लागले. आता मात्र आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो.
पूर्वी अनेक देशांमध्ये जवळपास विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत महिलांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता. स्त्रियांनाही मतदानाचा अधिकार मिळावा साठी 1910 साल आली सोशलिस्ट इंटरनॅशनल च्या कोपनहेगन याठिकाणी झालेल्या महिला दिनाला राष्ट्रीय दर्जा बहाल करण्यात आला.
रशिया या देशांमध्ये देखील अनेक स्त्रियांनी आंदोलन करून स्वतःला मतदानाचा अधिकार मिळवून घेतला.
नारी शक्तीचा सन्मान आणि उत्सव म्हणजेच जागतिक महिला दिन
महिलांमध्ये अपार शक्ती असते, असे म्हणण्यापेक्षा महिला या शक्तीचे स्वरूप आहेत असे म्हणणे जास्त सोयीस्कर ठरेल . हल्लीच्या काळात सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी आपली गुणवत्ता आणि योग्यता सिद्ध केली आहे .स्त्रियांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जागतिक पटलावर स्वतःची खास ओळख बनवली आहे.
लता मंगेशकर ,प्रतिभाताई पाटील, कल्पना चावला, सिंधुताई सपकाळ, उषा चव्हाण, अशा भोसले यांसारख्या अनेक कर्तबगार स्त्रियांनी विश्वावर आपल्या कार्याची छाप पाडलेली आहे. याबरोबरच घराघरात दररोज राहणारी स्त्री हीदेखील एक रणरागिनीच आहे. अशा सर्वच स्त्रियांच्या या महान कार्याला मानवंदना देण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो.
आपल्या देशाच्या सुरक्षा क्षेत्रात देखील महिला चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. टेसी थॉमस यांनी अग्नी-5 या मिसाईलचे परीक्षण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. या कारणामुळे त्यांना मिसाईल वूमन म्हणून देखील ओळखले जाते काही नेत्यांना अग्निपुत्री असे देखील संबोधले आहे.
टेसी थॉमस या मिसाईल चे प्रोजेक्ट पाळणा पहिल्या भारतीय महिला आहेत जीवनात अनेक अडचणींना सामोरे जाऊन त्यांनी हे यश संपादन केले आहे. पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या या संरक्षण क्षेत्रामध्ये डॉक्टर टेसी थॉमस यांनी हिमतीच्या जोरावर देखील उंच भरारी घेता येते हे सिद्ध करून दाखवले.
नुकत्याच अनंतात विलीन झालेल्या लता मंगेशकर म्हणजे साक्षात गानसरस्वती होय. त्यांच्या मुखातून स्वर हे अमरत्व घेऊनच बाहेर पडत असत. त्यांच्या आवाजातील हजारो गाणी आज देखील अनेक लोकांना आनंद देत आहेत आणि असाच आनंद देत राहतील.
आपल्या मन व मर्यादा पाळत देखील मोठ-मोठी कर्तव्य बजावताना येतात हेच प्रतिभाताई पाटील यांसारख्या स्त्रीने संपूर्ण जगाला दाखवून दिले.
डॉक्टर किरण बेदी या भारतीय पोलीस सेवेतील प्रथम वरिष्ठ महिला अधिकारी या पदावर होत्या. डॉक्टर किरण बेदी यांनी अनेक पदांवर आपल्या कार्य कुशलतेची छाप सोडली आहे. आपल्या कामातील निस्वार्थपणे आणि शौर्य यामुळे त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाला आले त्या कामाला जगभरातून प्रशंसा आणि मान्यता मिळाली. या कार्यामुळे त्या यांना रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार देखील मिळाला.
सुरक्षाक्षेत्र, संगीतक्षेत्र याबरोबरच खेळाच्या क्षेत्रात सुद्धा महिलांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे...
पी टी उषा
पी टी उषा 1979 पासून क्रीडा क्षेत्रामध्ये आपली छाप सोडत आहे.
भारतातील क्रीडापटू मध्ये त्यांना ना यंत्र मानाचे स्थान आहे.
1983 साली सीयुं याठिकाणी आणि झालेल्या दहाव्या आशियाई खेळांमध्ये धावण्याच्या स्पर्धेत पी .टी .उषा यांनी चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळवले.
khup chhan mahiti ahe sir.
उत्तर द्याहटवाMarathi Motivation
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.