www.upkarmarathi.com

 गोपाळ कृष्ण गोखले  यांची  माहिती

namdar Gopal Krishna Gokhale information
namdar Gopal Krishna Gokhale information

नामदार गोपाळ कृष्ण गोखले माहिती 

namdar Gopal Krishna Gokhale information in Marathi


     गोपाळ कृष्ण गोखले एक महान देशभक्त होते .देशाच्या सेवेत त्यांनी आपले आयुष्य अर्पण केलं .गांधीजी स्वतःला अभिमानाने गोखले यांचा शिष्य म्हणत.

     गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म 9 मे 1866 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील कोथळूक या छोट्याशा खेड्यात झाला. त्यांचे वडील कृष्णराव .ते कागल येथे नोकरीस होते. गोपाळरावांच्या आईचे नाव सत्यभामाबाई कृष्ण गोखले असे होते. गोपाळरावांचे प्राथमिक शिक्षण कागलच्या ग्रामीण परिसरात झालं. गोपाळराव केवळ 13 वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. गोपाळरावांचे थोरले बंधू गोविंदराव यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गोपाळरावांचे शिक्षण पुढे चालू ठेवले.

गोपाळ कृष्ण गोखले
namdar Gopal Krishna Gokhale information


      1881 साली गोपाळराव मॅट्रिकची परीक्षा पास झाले .त्यांनी पुढचे शिक्षण राजाराम कॉलेज कोल्हापूर डेक्कन कॉलेज पुणे आणि एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई येथे घेतले . 1884 साली गणित विषय घेऊन ते पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले.

       कॉलेजमध्ये असताना हरी नारायण आपटे यांचे निकटचे मित्र होते .आपण पुढे कोण होणार हे सांगताना आपटे मी कादंबरीकार होणार असे म्हणायचे, तर गोखले देशाची सेवा करण्यासाठी मी झटणार अशी आपली महत्त्वाकांक्षा सांगत असत.

namdar Gopal Krishna Gokhale  mahiti in Marathi

    पदवी घेतल्यानंतर गोपाळरावांनी मनात आणलं असतं तर त्यांना मोठी सरकारी नोकरी सहज मिळवता आली असती परंतु पूर्ण विचाराअंती त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाचा पेशा पत्करला. ही शाळा चिपळूणकर, टिळक,आगरकर यांसारख्या थोर देशभक्तांनी स्थापन केली होती. लोकजागृतीसाठी त्यांना या शाळेतून आधुनिक शिक्षणाचा प्रसार करायचा होता.

   गोखले यांनी अल्पावधीत एक उत्तम शिक्षक म्हणून नाव कमावलं. त्यांनी गणिताचं एक सुप्रसिद्ध पुस्तकही लिहिलं. पुढे फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांची प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. गोखले हे एक निष्णात प्राध्यापक होते .ते आपल्या विषयाचा सखोल अभ्यास करून व्याख्याने देत असत .त्यामुळे विद्यार्थी वर्गांमध्येही त्यांच्याविषयी आवड होती .1904 साली गोखले स्वेच्छेने नोकरीतून निवृत्त झाले. त्यांनी स्वतःला देश कार्याला वाहून घेतलं.

namdar Gopal Krishna Gokhale information

    त्यावेळी देश कल्याणाच्या भावनेने प्रेरित होऊन महाराष्ट्रात अनेक सुधारणावादी चळवळी चालू होत्या. भारतातील आधुनिकतेचे एक शिल्पकार न्यायमूर्ती रानडे हे या सर्व चळवळींचे सूत्रधार होते . न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रेरणेने व प्रोत्साहनाने गोखले यांनी सार्वजनिक जीवनात भाग घेण्यास सुरुवात केली . प्रथम पुणे सार्वजनिक सभा ,नंतर डेक्कन सभा आणि त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अशा क्रमाने ते देश कार्यामध्ये उतरले . गोखले न्यायमूर्ती रानडे यांना आपले गुरू मानत असत.

    पुणे सार्वजनिक सभा ही लोककल्याणासाठी  1870 साली स्थापन झाली होती. गोखले त्या सभेचे चिटणीस झाले . न्यायमूर्ती रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ते या सभेच्या त्रैमासिकाचे संपादन करत. सार्वजनिक सभेच्या लोकांची स्थिती सुधारण्यासाठी ब्रिटिश सरकारकडे अनेक विनंती अर्ज पाठवले.
        
                 'सरकारला तर लोकांची परवाच नाही मग ही विज्ञापने कशासाठी? असा प्रश्न गोखलेंनी एकदा रानडे यांना विचारला.

               न्यायमूर्ती रानडे हसले आणि म्हणाले, या देशाच्या इतिहासात आपले काय स्थान आहे तुम्हाला ठाऊक नाही, ही विज्ञापने सरकारच्या नावाने लिहिली असली तरी वास्तविक ती  लोकांसाठीच आहेत. त्यांनीही याबाबत विचार करायला शिकले पाहिजे, नाही का ?

               आपल्या गुरुंना काय म्हणायचं आहे ? ते गोखल्यांनी नेमकं ओळखलं. लोकांना शहाण करून सोडण्याचा त्यांनी निश्चय केला. लोकांचे प्रश्न लोकांना समजावून सांगून त्या प्रश्नांसाठी लढा देण्यास तयार करायचे अशी त्यांची भूमिका होती.
             १८८८ मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी 'सुधारक'हे साप्ताहिक सुरु केले. लोकांना सामाजिक व राजकीय प्रश्नांची ओळख करून देण्याचे काम सुधारक एक ने हाती घेतलं होतं या प्रागतिक पत्राच्या इंग्रजी आवृत्तीचे संपादन नामदार गोपाळ कृष्ण गोखले करत असत.
   
   1889 पासून गोखले काँग्रेसच्या अधिवेशनांना नियमितपणे उपस्थित राहू लागले. थोड्याच अवधीत ते काँग्रेसचे एक प्रमुख नेते म्हणून ओळखले जाऊ लागले .दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता यांसारख्या थोर देशभक्त आन कडून गोखल्यांना खूप काही शिकायला मिळाले 1905 मध्ये बनारस येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे गोखले अध्यक्ष झाले.

     आज आपण आदर्श म्हणून स्वीकारलेल्या मानवतावादी लोकशाही धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे गोखले खंदे पुरस्कर्ते होते कोणत्याही जाती धर्माविषयी किंवा पंथाविषयी त्यांच्या मनात दुजाभाव नव्हता. शांततापूर्ण व सनदशीर मार्गाने भारत स्वतंत्र व्हावा अशी गोखले यांची इच्छा होती.
सनदशीर मार्ग म्हणजे काय

     सनदशीर मार्ग म्हणजे केवळ सरकारकडे विनंती अर्ज किंवा विज्ञापन पाठवणे एवढेच गोखल्यांना अभिप्रेत नव्हतं. न्याय्य मागणीसाठी हिंसा बंडखोरी किंवा परकीयांशी हात मिळवणी न करता शांततामय प्रतिकार किंवा कर वसुलीला विरोध या मार्गाने आंदोलन करण्यास त्यांची हरकत नव्हती म्हणूनच दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी जी सत्याग्रहाची चळवळ सुरू केली होती तिला गोखल्यांनी पाठिंबा दिला होता.

     भारतातील अन्याय ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी गोखले  अनेक वेळा इंग्लंडला गेले. भारतातील स्वातंत्र्यलढ्याच्या बाजूने इंग्लंडमध्ये लोकमत तयार करणे हा त्यांच्या इंग्लंड भेटीचा मुख्य हेतू होता.
  
    भारताच्या आर्थिक कारभाराच्या चौकशीसाठी वेलबी कमिशन नेमण्यात आले होते या कमिशनसमोर साक्ष देण्यासाठी 1897 साली   गोखल्यांना खास पाचारण करण्यात आलं.ब्रिटिश सरकार भारताच आर्थिक शोषण करून स्वतःची तुंबडी कशी भरत आहे. हे गोखल्यांनी कमिशन समोर सप्रमाण दाखवून दिलं.

    गोखले मुंबई कायदेमंडळात आणि पुढे केंद्रीय कायदे मंडळात निवडून गेले होते. कायदेमंडळात त्यांनी भारतीयांच्या हक्कांचा सतत पुरस्कार केला आणि ब्रिटिश सरकार करत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली. भारताच्या आर्थिक प्रश्नावरील त्यांची भाषणे अत्यंत अभ्यासपूर्ण आणि उद्बोधक असत.

     लोकशिक्षण हा गोखल्यांचा अत्यंत आस्थेचा विषय होता .ब्रिटिश सरकार भारतीय जनतेच्या शिक्षणावर अत्यंत कमी खर्च करते हे त्यांनी सरकारला स्पष्ट सांगितले. मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी त्यांची सतत मागणी होती.

     भारतातील ग्रामीण जनतेचे भयावह दारिद्र गोखल्यांना रात्रंदिवस बेचैन करत असे. सरकारच्या डोईजड कर आकारणीवर त्यांनी सतत टीका केली. मीठ ही माणसाची प्राथमिक गरज आहे आणि मोकळ्या हवे इतकच ते त्याला मोफत मिळाले पाहिजे. असा त्यांचा आग्रह होता. मिठावरील कर कमी व्हावा म्हणून ते प्रयत्नशील होते.

पुढे गांधीजींनी केलेला दांडी सत्याग्रह ही गोखले यांच्या विचारांची परिणती होती.

राष्ट्र उद्धारासाठी निस्वार्थ समर्पित वृत्तीने पूर्णवेळ काम करणारे कार्यकर्ते हवेत. आरामखुर्चीत लोळणारे राजकारणी नकोत हे गोखल्यांनी ओळखलं होतं .असे सेवाभावी कार्यकर्ते तयार करण्यासाठी त्यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली आणि ते स्वतः त्या संस्थेचे पहिले सदस्य झाले. जातीय एकता, दलीतोधार, स्त्रीशिक्षण, दीनदुबळ्यांची सेवा आणि आपदाग्रस्तांना सहाय्य हे भारत सेवक समाजाचे उद्दिष्ट होते. दलित वर्गाविषयी गोखल्यांना अपार सहानुभूती. होती गुलामीचाच एक प्रकार असलेल्या वेठबिगारी विरुद्ध त्यांनी लढा दिला.

    सुप्रसिद्ध राष्ट्रवादी नेते श्रीनिवास शास्त्री आणि विख्यात कामगार पुढारी ना.म. जोशी असे अनेक जण भारत सेवक  समाजचे कार्यकर्ते झाले.

         1914 साली  पहिलं महायुद्ध सुरू झालं या युद्धात इंग्लंडचा पराभव झाला तर भारत आणखी कोणाच्यातरी जोखडाखाली जाईल असं काहींचं मत होतं पण गोखल्यांना हा विचार मान्य नव्हता. भारत स्वसामर्थ्यावर राज्य करू शकतो असा त्यांचा ठाम विश्वास होता. ब्रिटिश सरकार भारतावर 25 वर्षांहून अधिक काळ राज्य करू शकणार नाही अशी त्यांची धारणा होती.

         या आदर्श भारत सेवकाने 19 फेब्रुवारी 1915 रोजी या जगाचा निरोप घेतला... लोकमान्य टिळकांनी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विषयी केसरीत लिहिले की,, विद्यार्थीदशेपासूनच उदात्त ध्येय डोळ्यांसमोर ठेवले तर कर्तबगार माणूस कुठवर जाऊन पोचतो याचा धडा गोपाळरावांच्या जीवनावरून मिळतो. आमच्या तरुण पिढीने हाच पाठ गिरवावा आणि तो ते मनापासून गिरवतील असा आम्हास विश्वास वाटतो.

faq 

गोपाळ कृष्ण गोखले यांची उपाधी

प्रोफेसर टू ऑर्डर,नामदार  

गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म कोठे झाला?

 9 मे 1866 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील कोथळूक या छोट्याशा खेड्यात

गोपाळ कृष्ण गोखले यांचा मृत्यू कधी झाला?

19 फेब्रुवारी 1915

तुम्हाला खालील लेख  वाचायला नक्की आवडतील 
  1. महात्मा गांधी यांचे प्रेरक विचार | motivational thought of Mahatma Gandhi.
  2. स्वातंत्र्य सैनिकाचे मनोगत मराठी निबंध | sainikache manogat marathi nibandh
  3. बाळासाहेब पंतप्रतिनिधी , भवानराव श्रीनिवास पंतप्रतिनिधी | Balasaheb pantpratinidhi ,aundh sansthan
  4. महिला सक्षमीकरण काळाची गरज निबंध मराठी | women empowerment essay in Marathi
  5. महाराजा सयाजीराव गायकवाड | Maharaja sayajirao gaekwad information 
  6. डॉ. ए. पी. अब्दुल कलाम वर मराठी भाषण|speech on Abdul Kalam in Marathi 
  7. बालिका दिन ,3 जानेवारी, सावित्रीबाई फुले , Balika din information in Marathi

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने