www.upkarmarathi.com
Book summary in Marathi | the alchemist book summary , in marathi
Book summary in Marathi- the Alchemist |
प्रस्तावना
द अल्केमिस्ट हे वैश्विक पातळीवर गाजलेले एक बहुचर्चित पुस्तक आहे . वाचकांना केवळ भावनावश करणे किंवा अंतर्मुख करणे. एवढ्यापुरतेच हे पुस्तक मर्यादित नाही तर वाचकाचे संपूर्ण जीवनच बदलून टाकणारे हे पुस्तक आहे.
जगभरात या पुस्तकाची काही कोटी प्रतींची विक्री झाली आहे. अल्केमिस्ट ही कथा आपल्याला आपल्या आंतरिक आवाजाची जाणीव करून देते. प्रतिके आणि शकुन लक्षात घेऊन स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील कसे राहावे ? याचे मार्गदर्शन करणारी ही एक रंजक अशी बोधपूर्ण कथा आहे.
हे पुस्तक का वाचावे ?
बऱ्याचदा आपल्या आयुष्यात आपल्याला नक्की काय साध्य करायचे आहे ? याविषयी स्पष्टपणे खात्री नसते. आणि कधी खात्री पटली तरी आपल्या स्वप्नांवर आपला विश्वास नसतो. आपल्या मनात आपल्या स्वप्नांविषयी सतत संशय असतो ,पण असा संशय का येतो ?अशा कोणत्या गोष्टी असतात ज्या आपला विश्वास कमी करतात? हेच आपल्याला समजत नाही. कारण काहीही असो जर आपल्या आयुष्यात असेच संभ्रम निर्माण करणारे प्रसंग निर्माण झाले तर काय करायचे? कुणावर विश्वास ठेवायचा? याविषयी तुम्हाला कळत नसेल तर हे पुस्तक नक्की वाचा. या पुस्तकातून प्रेरणा आणि जीवन जगण्याची नवी दिशा नक्की मिळेल . जीवनात येणाऱ्या कठीण परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा ? हे तुम्हाला या पुस्तकातून नक्की शिकायला मिळू शकेल. हे पुस्तक आपल्यात एक नवी आशा निर्माण करून आपल्यासाठी प्रेरणा स्त्रोताचे काम करते. प्रेम म्हणजे काय? ध्येय म्हणजे काय ? व ध्येयप्राप्तीचा प्रवास कसा करायचा? हे आपण या पुस्तकातून शिकणार आहोत.
Book summary in Marath ,The alchemist
स्पेन मधील एक शहर अंडलूसिया. येथे राहणारा एक तरुण सॅंटियागो नावाचा. त्याला जग बघायची व जाणून घ्यायची खूप इच्छा असते. त्याचे वडील त्याला एक दिवस सांगतात जर जग बघायचं असेल तर एक मेंढपाळ म्हणजे मेंढ्याचा करण्याचं काम करणे इतका भारी काम कोणतच नाही. वडिलांचे ऐकून तो मेंढपाळ बनून जातो. तो मेंढपाळ झाल्यामुळे त्याला दोन फायदे झाले .मेंढ्यांना चारण्यासाठी त्याला वेगवेगळ्या गावांना जावे लागत असे.. त्यामुळे त्याची फिरण्याची हौस पूर्ण होत असे .आणि मेंढ्यांची लोकर विकून त्याला पैसे देखील मिळायचे.
काही दिवसांपूर्वी त्याने एका व्यापाऱ्याच्या मुलीला लोकर विकली होती. त्याला तिची खूप आठवण येत असे. आज तो पुन्हा त्याच व्यापाऱ्याला लोकर विकण्यासाठी जात होता. तिथे गेल्यावर पुन्हा त्याला ती मुलगी भेटेल या विचाराने तो खूप आनंदी झालेला असतो .जाता जाता त्याला रस्त्यात अंधार होतो .मग तिथेच एका चर्चमध्ये तो मेंढ्या ठेवतो आणि स्वतः एका झाडाखाली झोपतो .थकल्यामुळे त्याला लगेच झोप लागते.
झोपल्यावर त्याला नेहमी पडणारे स्वप्न पुन्हा पडते .ते स्वप्न असे असते, की त्याला एक अनोळखी व्यक्ती भेटतो. तो व्यक्ती त्याला इजिप्तच्या पिरॅमिड्स जवळ घेऊन जातो व एका ठिकाणी तुझ्यासाठी खूप धन आहे असे सांगतो. सॅंटियागो त्याठिकाणी जाऊन बघणार असतो तितक्यात त्याची झोप मोडते. असंच नेहमी घडतं .हे स्वप्न बघून तो नेहमी खूप अस्वस्थ होत असे, कारण त्याचं ते स्वप्न कधीच पूर्ण होत नसे. त्या स्वप्नाचा विचार करत असतानाच त्याला चर्चमध्ये एक म्हातारी भेटते. ती म्हातारी स्वप्नांचा अर्थ सांगण्यासाठी प्रसिद्ध असते. ती म्हातारी सॅंटियागोला चर्चमध्ये घेऊन जाते.
चर्चमध्ये गेल्यावर तो देवाची प्रार्थना करतो .म्हातारी त्याच्याजवळ येते आणि त्याचे हात बघायला लागते. सॅंटियागो थोडा घाबरतो .लगेच म्हातारी म्हणते तुला तुझ्या स्वप्नांचा अर्थ जाणून घ्यायचा आहे वाटतं .म्हातारीचे बोलणे ऐकून सॅंटियागोला आश्चर्य वाटते..मग तो म्हातारीला त्याच्या नेहमी अपूर्ण राहणाऱ्या स्वप्नाविषयी सांगतो. म्हातारी त्याला सांगते, मी तुला तुझ्या स्वप्नातील खजिन्याविषयी सांगेल, पण मला त्याच्या बदल्यात त्या खजिन्यातील दहावा हिस्सा द्यावा लागेल. हे ऐकून त्याला खूप आनंद होतो. तो म्हातारीची अट मान्य करतो आणि म्हातारी त्याला सांगते की, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये जावे लागेल. तिथे त्याला इतकी संपत्ती मिळेल की तो एक अति श्रीमंत व्यक्ती बनून जाईल. हे एकूण आनंदाने तो म्हातारीला विचारतो, मी इजिप्तला कसा जाऊ शकेल ? त्यावर म्हातारी सांगते, ते मला माहित नाही. मी फक्त स्वप्नांचा अर्थ सांगते. ते पूर्ण कसे करायचे ते माहीत नाही. हे ऐकून सॅंटियागो खूप दुखी होतो आणि म्हातारीला सांगतो, जर मी इजिप्तला पोहोचू शकलो नाही तर काय? मग म्हातारी सांगते, जर तू नाही पोहोचू शकला असता तर मला दहावा हिस्सा ही देऊ नकोस . दुःखातच सॅंटियागो चर्चमधून निघतो व बाजारात जातो आणि एक पुस्तक विकत घेऊन वाचत बसतो.
सॅंटियागो पुस्तक वाचत असतो .तेव्हा एक म्हातारा त्याच्याजवळ येतो. तो म्हातारा जवळ आलेला सॅंटियागो ला अजिबात आवडत नाही पण तो शांतपणे पुस्तक वाचत असतो .म्हातारा त्याला विचारतो की तो कोणतं पुस्तक वाचत आहे? याचा सॅंटियागो ला खूप राग येतो आणि तो काही उत्तर न देताच तिथून उठून दुसरीकडे जाऊन पुस्तक वाचायला लागतो. तितक्यात त्याला त्याच्या वडिलांनी दिलेली शिकवण आठवते की, कधीही कोणाचा अपमान करू नये. म्हणून तो पुन्हा त्या म्हाताऱ्या जवळ जातो व कोणते पुस्तक वाचत आहे त्याविषयी सांगतो. ्ह म्हातारा सांगतो की, हे पुस्तक मी वाचलेलं आहे. त्यावर सॅंटियागो म्हातार्याला विचारतो, की तुम्ही हे पुस्तक वाचले आहे तर मला सांगा की या पुस्तकात काय सांगितले आहे. मग तो म्हातारा सांगू लागतो की या पुस्तकात असे सांगितले आहे कशा पद्धतीने व्यक्ती स्वतःचे नशीब स्वतः निवडतो. स्वतःचे नशीब घडवणे आणि बिघडवणे यासाठी कसा व्यक्ती स्वतः जबाबदार असतो आणि पुस्तकाच्या शेवटी जगातील सगळ्यात खोटी कल्पना कोणती याविषयी सांगितले आहे. हे ऐकताच सॅंटियागो विचारतो कृपया मला सांगा, की जगातील सर्वात मोठं असत्य काय आहे ेव्हा तो म्हातारा बोलू लागतो या जगात जगत असताना एक वेळ अशी येते की त्या वेळी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर आपले नियंत्रण राहत नाही मग जिथे आपल्याला आपलं नशीब घेऊन जातं तिकडे आपण चालत राहतो आणि नशिबाच्या आधारावर जगत राहणं हेच ते जगातील सर्वात मोठे असत्य आहे म्हातार्याच्या या गप्पा सेंटीअगोला आवडू लागतात व तो अजूनच त्या म्हातार्या शी गप्पा मारू लागतो बऱ्याच गप्पा झाल्या नंतर तो म्हातारा सॅंटियागो ला म्हणतो की मी तुला श्रीमंत बनवू शकतो आणि तुला खजिना पर्यंतही पोहोचवू शकतो म्हाताऱ्याचं बोलणं एकटाच सॅंटियागो ला वाटतं की म्हातारीने त्या म्हातार्याला सगळं सांगितलं नाही तर याला ते कसे माहित असेल सॅंटियागो त्या म्हाताऱ्याला त्याचे नाव विचारतो तू म्हातारा स्वतःचे नाव मेलचिझेदेक तो आणि मी सालींचा राजा आहे मला ही फिरण्याची खूप आवड आहे जर तू मला तुझ्या मेंढ्यांचा दहावा हिस्सा देशील तर मी तुला खजिना विषयी सांगू शकतो म्हाताऱ्याचं बोलणं येताच सॅंटियागो म्हणतो एक राजा एका मेंढपाळाची का बोलतोय त्यावर राजा म्हणतो याचे बरेचसे कारणे आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तू इथं तुझं नशीब शोधायला आला आहेस जे म्हणतात की तुला तुझा खजीना मिळणार आहे हे ऐकून मला प्रश्न पडतो की एखाद्याचे नशीब म्हणजे नेमकं असतं तरी काय तेव्हा राजा सांगतो जेव्हा आपण तरूण असतो तेव्हा आपल्याला माहित असतं की आपली इच्छा काय आहे आपण ती पूर्ण करण्यासाठी अजिबात घाबरत नाही आणि आपली पूर्ण शक्ती लावून देतो.
मग हळू हळू एक नैसर्गिक शक्ती आपल्याला सांगू लागते की तुम्ही बघत असलेले स्वप्न सत्य होणार ज्यावेळी तुम्ही तुमच्या स्वप्नावर पूर्ण विश्वास ठेवता आणि तुमची सगळी शक्ती लावून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात तेव्हा हा संपूर्ण निसर्ग आणि निसर्गातील प्रत्येक वस्तू आणि व्यक्ती तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करत असतात.
मग ते स्वप्न कोणतेही असो एखाद्या व्यापाऱ्याच्या मुलीला भेटणे असो खजिन्याचा शोध घेणे असो किंवा संपूर्ण जग फिरणे असो स्वप्न पूर्ण होतातच.
राजाचे हे बोलणे ऐकून सॅंटियागोच्या मनात येते की, तो खजिना शोधण्यासाठी जर निघाला तर त्याच्या मेंढ्या त्याच्याशिवाय कशा राहणार मग तो राजाला सांगतो की मेंढ्यांच्या ऐवजी, मला मला जो खजिना मिळेल त्या खजिन्यातील दहावा हिस्सा मी तुला देईन तेव्हा राजा म्हणतो की ज्यावेळी आपण आपल्याला न मिळालेली गोष्ट दुसऱ्याला देण्याचे वचन देतो त्यावेळी ती वस्तू मिळवण्याची आपली इच्छा देखील नष्ट होऊन जाते. राजा चे बोलणे ऐकून सेंटर विचार करतो की ज्या पद्धतीने माझे आई-वडील माझ्याशिवाय राहणे शिकून गेले तसेच माझ्या मेंढ्या देखील माझ्या शिवाय राहणे शिकून जातील. मग सॅंटियागो त्याच्या मेंढ्या मधील दहावा हिस्सा त्या राजाला देतो आणि उरलेल्या मेंढ्या विकून त्यांचे आलेले पैसे तो स्वतः जवळ घेतो.
त्यानंतर सॅंटियागो राजाला विचारतो की मला तो खजिना कुठे मिळेल मग राजा सांगतो की खजिना मिळवण्यासाठी तुला इजिप्तच्या पिर्यामिड जवळ जावे लागेल.
राजाचे हे बोलणे ऐकून लगेच त्याला चर्चमधल्या म्हातारीचे बोलणे आठवते तिने देखील हेच सांगितले होते दोन वेगवेगळ्या वस्तू व व्यक्तींनी एकच गोष्ट सांगितल्यामुळे सॅंटियागो ला आता विश्वास होतो की त्याला नक्की खजिना मिळणार आणि त्याचे स्वप्न नक्की खरे होणार.
मेंढ्या विकून आलेल्या पैशांनी सॅंटियागो आफ्रिकेला जाण्यासाठी तिकीट विकत घेतो व तो जहाजात बसतो त्यावेळी राजा त्याला सांगतो की भगवंताने प्रत्येकासाठी रस्ता बनवलेला असतो फक्त आपण संपूर्ण विश्वासाने त्या रस्त्यावर चालत राहणे गरजेचे असते या रस्त्यावरून जात असताना तुझ्याबरोबर ज्या ज्या घटना घडतील त्यांच्यावर विश्वास ठेवून सतत पुढे जात राहा त्यांचे असे बोलणे चालू असतानाच दोघांमधून एक फुलपाखरू उडत जाते. फुलपाखरू बघून सॅंटियागो ला लगेच आठवते की फुलपाखरू उडत जाणे हा शुभशकुन आहे आणि तसे तो राजाला सांगतो राजा लगेचच सॅंटियागो ला सांगतो की हो अगदी खरेच तुझे सगळे स्वप्न पूर्ण होणार असे सांगून राजा सॅंटियागो ला दोन दगड दे त एक दगड काळा असतो आणि दुसरा पांढरा असतो. ते दगड सॅंटियागो ला देताना राजा सांगतो कि हा काळा दगड हो असे सांगतो तर पांढरा दगड नाही यासाठी आहे रंतु आयुष्यात जेव्हा तुला एखादा निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा बर्याचदा तू या दगडांचा उपयोग करण्याऐवजी तुझ्या स्वतःचा निर्णय घे.
सॅंटियागो ते दगड स्वतःजवळ घेतो तेव्हा राजा पुन्हा सांगतो की तुला तुझ्या स्वप्नांवर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल आणि जोपर्यंत ते स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत तुला चालत राहावे लागेल म्हणजेच प्रयत्न करत राहावे लागेल. असे सांगून राजा मेंढ्या घेऊन निघून जातो . येतो पर्यंतच्या गोष्टीतून आपल्याला असा सार कळतो की ,
तुम्ही तुमचे स्वप्न तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत तुम्ही ते पूर्ण करून घेत नाही भलेही रस्त्यात कितीही अडचणी आल्या तरी देखील आपल्या स्वप्नांवर चा विश्वास आपण कमी होऊ द्यायचा नाही. या विचारातच तो जहाजात बसतो.
जहाजात बसून संपूर्ण प्रवासात तो आफ्रिके विषयी विचार करत असतो की अफ्रीका कसा असणार तेथील लोक कसे असतात तेथील चालीरीती कशा असणार आणि एकदाचा तो आफ्रिकेमध्ये टांजीयर या शहरांमध्ये पोहोचतो. आणि राजाने सांगितलेल्या चांगल्या घटनांविषयी तो विचार करत असतो तितक्यात त्याच्या मागून एक माणूस येतो आणि त्याला विचारतो तू कोण आहेस सॅंटियागो त्या माणसाला स्वतः विषयी सगळी माहिती सांगतो आणि तो का आलेला आहे हे देखील सांगतो त्यावर तो माणूस सेंटी आहे तुला सांगतो की मी तुला यामध्ये मार्गदर्शन करू शकतो आणि मी तुझा गाईड बनु शकतो.
हा माणूस सुद्धा राजाने सांगितल्याप्रमाणे राजाने सांगितल्याप्रमाणे चांगल्या घटनेमध्ये लाच एक घटना असेल . आणि त्याच्या मदतीला ब्रम्हांड च्या आत्म्याने या माणसाला पाठवले आहे असे .मग तो त्या माणसाला विचारतो की तुझ्याकडे खजिना पर्यंत पोहोचण्याचा काही मार्ग आहे का? मग तो माणूस सांगतो की खजिना पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला संपूर्ण वाळवंट पार करावे लागेल व त्यासाठी आपल्याला पैसेही लागतील तेव्हा त्याच्या जवळचे पैसे त्या माणसाला दाखवतो. मग तिथले चोर सॅंटियागोला लुबाडून त्याचे पैसे घेऊन जातात.
सॅंटियागो ला खूप वाईट वाटते तो रडू लागतो आणि त्याला वाटते की चांगल्या घटना आणि स्वप्नांवर विश्वास वगैरे या सर्व गोष्टी खोट्या आहेत. त्यापेक्षा मि माझ्या मेंढ्या बरोबरच आनंदात होतो. लगेच त्याला राजाने सांगितलेली एक गोष्ट आठवते की जेव्हा तुम्ही खरोखर एखाद्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असतात तेव्हा संपूर्ण सृष्टी त्याच्या प्राप्तीसाठी तुमच्या मदतीसाठी काहीतरी षडयंत्र रचत असते आणि हे षड्यंत्र परीक्षेची घटना असते यावेळी आपण आपला संयम आणि धैर्य गमावता कामा नये.
मग सॅंटियागो त्याला राजाने दिलेले दोन दगड नोट त्याला आठवतात आणि मग तो मनात प्रश्न करतो की मला खजिना मिळेल की नाही आणि मग ते कपडे काढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या हातात काळा दगड येतो परंतु तो ते बघणार तितक्यात त्याच्या हातातील ते दोन्हीकडे खाली पडतात आणि त्याला नेमके कळत नाही की कोणता दगड आला होता अर्थात काळा दगड आलेला असतो याचा अर्थ होय परंतु ते त्याला समजत नाही मग तो विचार करतो की पुन्हा दगडांचा वापर करण्याऐवजी राजाने आपल्याला सांगितले होते की स्वतःचा निर्णय शक्यतो तू स्वतः घे.
तेव्हा तो मनाशी निर्धार करतो की आता इथून पुढे सर्व निर्णय तो स्वतः घेणार पुढील प्रवासात तो अनेक लोकांना मदत करतो आणि त्यालाही अनेक लोक मदत करत असतात या संपूर्ण प्रवासात त्याला सतत असे जाणवत राहते की कोणतीतरी अलौकिक शक्ती सतत त्याच्या बरोबर आहे आम्ही त्याला मदत करत आहे याबरोबरच त्याला असे वाटत राहते की तो अनेक नवनवीन गोष्टी शिकत आहे.
असाच विचार करत करत तो पुढे जात असताना एका बाजारात येऊन पोहोचतो त्या बाजारामध्ये काचेची भांडी विकण्याचे एक दुकान असते. त्या दुकानदाराला दुकान स्वच्छ ठेवण्यासाठी एका माणसाची गरज असते हे सॅंटियागो ओळखतो.सॅंटियागो दुकानदाराकडे जातो आणि त्याला सांगतो की मी तुमच्या दुकानाची स्वच्छता करून देतो काचेची भांडी स्वच्छ केल्यामुळे तुमची विक्री देखील वाढेल आणि तुम्हाला नफा होईल याच्या बदल्यात मला फक्त खाण्यासाठी काहीतरी द्या. हे ऐकून दुकानदार काही तरी विचार करत असतो तितक्यात सॅंटियागो विचार करतो कि निसर्ग मला स्वतःलाच निर्णय घेण्यासाठी प्रेरित करत आहे त्यामुळे दुकानदार काही बोलण्याच्या आतच सॅंटियागो दुकानातील भांडी स्वच्छ करायला लागतो भांडी स्वच्छ झाल्यानंतर थोड्यावेळातच दुकानदार सॅंटियागो घेऊन बाजारात येतो. दुकानदार सांगतो की तुला खरोखरच कामाची गरज आहे असे मला वाटते आणि मला देखील एका माणसाची गरज आहे तर तू माझ्याकडे काम करशील का त्यावर सॅंटियागो म्हणतो की मला फक्त आजच्या दिवसचं थांबता येईल मी आज संपूर्ण रात्रभर जागून सर्व दुकान स्वच्छ करून देतो त्या बदल्यात मला तुम्ही इजिप्तला जाणे इतके पैसे द्या हे ऐकून दुकानदार हसू लागतो आणि बायकोला सांगतो की तू वर्षभर जरी या दुकानात काम केले तरीदेखील तुला तितके पैसे कमावता येणार नाहीत. हे ऐकून सॅंटियागो विचार करू लागतो की किमान दुकानावर काम करून तो त्याच्या मेंढ्या पुन्हा विकत घेऊ शकेल इतके पैसे तरी कमवू शकतो आणि मग तो दुकानावर काम करू लागतो.
त्या व्यापाऱ्याचे दुकान एका उंच डोंगरावर असते त्यामुळे त्याच्या दुकानापर्यंत गिर्हाईक येताना फारच थकून जात असत. इतके थकून आल्यानंतर दुकानावर काही खाण्यासाठी देखील व्यवस्था नव्हती हे निरीक्षण केल्यानंतर सॅंटियागो दुकानदाराला सांगतो की आपण इथे डोंगरावरती या काचेच्या भांड्यांमध्ये लोकांना चहा विकू . त्यामुळे आपला धंदाही चांगला होईल आणि आपली भांडे देखील मोठ्या प्रमाणात विकली जातील त्या व्यापाऱ्याला सॅंटियागो ची युक्ती आवडते आणि ते त्या कामाला सुरुवात करतात. सॅंटियागो एका विशेष प्रकारचा चहा विकू लागतो आणि त्यामुळे त्या व्यापाऱ्याची विक्री फारच वाढते. व्यापारी आणि सॅंटियागो दोघेही भरपूर श्रीमंत होतात एका वर्षाच्या आतच इतके पैसे गोळा करून घेतो की तो पुन्हा परत जाऊन त्याच्या मेंढ्या विकत घेऊ शकेल. मग तो पुन्हा आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतो. परंतु त्याच वेळी सॅंटियागो ला राजाची एक गोष्ट आठवते की आपले स्वप्न कधीही अपूर्ण सोडले नाही पाहिजे. मग तो पुन्हा एकदा एकदा स्वतःचे नशीब आजमावत तो आणि इजिप्त ला जाणाऱ्या मोठ्या प्रवाशांच्या झुंडी मध्ये सामील होऊन जातो. या प्रवासामध्ये सॅंटियागो ला एक इंग्रजी व्यक्ती भेटते तो व्यक्ती एका प्रसिद्ध जातो बनवणाऱ्या व्यक्तीच्या शोधात निघालेला असतो तो व्यक्ती असा असतो की जो कोणत्याही धातूला वितळवून त्याच्या पासून सोने बनवू शकतो. वाळवंटातून प्रवास करत करत पुढे जात असताना तो इंग्रजी मनुष्य सॅंटियागोला अनेक रहस्य सांगतो. या प्रवासात तो इंग्रज व्यक्ती सॅंटियागो चे पुस्तक वाचतो आणि त्याच्या जवळ असलेले ते दोन दगड ही बघून घेतो ज्या दगडांना सॅंटियागो जादूचे दगड समजत असतो.
तो इंग्रज व्यक्ती सॅंटियागोकडे ते दगड मागतो परंतु सॅंटियागो सांगतो की हे जादूचे दगड आहेत आणि ते मला एका राजाने दिलेले आहेत त्यावर तो इंग्रज व्यक्ती सांगतो की हे जादूचे दगड नाहीत असे लाखो दगड पडलेले आहेत. सॅंटियागो सांगतो की हे दगड मला राजाने दिलेले आहेत आणि त्यांनी मला सांगितले होते की जेव्हाही तुला एखादा निर्णय घ्यायचा असेल तर येईल दगडांच्या साहाय्याने तू तुझा निर्णय घेऊ शकतोस. हे ऐकून तो इंग्रज व्यक्तीदेखील आणि वाईट गोष्टींविषयी गप्पा मारू लागतो जशा गप्पा त्या राजाने सॅंटियागोला सांगितलेल्या असतात. त्या इंग्रज व्यक्तीच्या तोंडून ह्या गप्पा ऐकून तो आश्चर्यचकित होतो आणि त्याला विचारतो कि तुला ह्या गोष्टी कोणी सांगितल्या त्यावर इंग्रज सांगतो की यात सांगण्यासारखं काय आहे हे तर अगदी साधा आहे आपल्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी घडतात ते म्हणजे आपले चांगले अनुभव आहेत आणि ज्या वाईट गोष्टी घडतात त्या गोष्टी म्हणजे आपल्यासाठी एक शिकवण आहे त्यातून आपण शिकायचं आणि सतत पुढे पुढे जात राहायचं. ही निसर्गाची अशी भाषा आहे की ती सगळ्यांना माहीत असते परंतु याचे अवलोकन मात्र फार थोडेच लोक करतात. इंग्रजी व्यक्तीबरोबर गप्पा मारत मारत पुढे जात असताना प्रवासामध्ये चे अलफायुम या गावामध्ये पोहोचतात. त्याच वेळी प्रवास करणाऱ्या दोन झुंडीमध्ये युद्ध चालू होते. या युद्धामुळे इजिप्तचा प्रवास करता येत नाही परंतु तो त्या इंग्रजी व्यक्तीला त्या अल्केमिस्ट चे घर शोधण्यासाठी मदत करू लागतो. अल्केमिस्ट ला शोधत असतानाच त्याच गावातील एका विहिरीजवळ ते पोहोचतात तिथे सॅंटियागो फातिमा नावाच्या एका सुंदर मुलीला भेटतो. फातिमाला बघताच सान्तियागो तिच्या प्रेमात पडतो. त्याला आता इजिप्तला जावेसे वाटत नाही तो दररोज फातिमाला त्या विहिरीजवळ येऊन भेटू लागतो. तर दुसरीकडे तो इंग्रजी व्यक्ती अल्केमिस्ट ला भेटतो. अलकेमिस्ट त्या इंग्रजी व्यक्तीला विचारतो की तू गेल्या दहा वर्षापासून मला शोधतो आहेस परंतु या दहा वर्षांमध्ये तू कधी धातू पासून सोने बनवण्याचा प्रयत्न केलास का? यावर इंग्रज म्हणतो की मी कधीही प्रयत्न केला नाही मग अल्केमिस्ट त्याला सांगतो की मग आता जा आणि स्वतः प्रयत्न कर कोणत्याही नवीन आविष्कारासाठी स्वतः प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे असते प्रयत्न केला असता तर तू स्वतःच सोने तयार करायचे शिकून गेला असता. तुला माझ्याकडे येण्याची गरजच राहिली नसती.
एके दिवशी आकाशामध्ये दोन गरुडाना भांडण करताना सॅंटियागो बघतो आणि त्याला आभास होतो की की या गावावर एक सेना आक्रमण करणार आहे व गावावर संकट येणार आहे. तू लगेचच्या गावच्या सरदाराला ही गोष्ट सांगण्यासाठी जातो. सरदार सॅंटियागो ची गोष्ट खरी म्हणून आपल्या सेनेला युद्धासाठी तयार करतो. आणि सॅंटियागो ला सांगतो की जर तुझा आभास किंवा तू सांगितलेले जर खोटी निघाले तर मी तुझा शिरच्छेद करून देईल आणि तुला ठार करेल. काही दिवसातच त्या गावावर एक सेना आक्रमण करते परंतु राजा पूर्ण पणे तयार असल्यामुळे राजाचा विजय होतो. त्यानंतर राजा सॅंटियागो वर खूपच खुश होतो आणि त्याला आपल्या गावाचा सल्लागार म्हणून नेमतो तसेच 50 सोन्याच्या मोहरा ही देतो.
सॅंटियागो च्या मनात विचार येतो की आता या सोन्याच्या मोहरा घेऊन फातिमा सोबतच अलफायुम या गावात राहायचे. मग तो फातिमा ला जाऊन भेटतो आणि सर्व हकीकत सांगतो यावर फातिमा त्याला सांगते की तू तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे जा खरे प्रेम कधीही आपल्या जोडीदाराला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखत नाही मी तुझी या गावांमध्ये वाट बघत राहील परंतु तू तुझे स्वप्न अर्ध्या मध्ये सोडू नकोस तुझे स्वप्न पूर्ण करून तू पुन्हा इकडे ये. त्यानंतर अल्केमिस्ट सॅंटियागो ला सांगतो की मी तुला तुझ्या खजिना पर्यंत घेऊन जाईल आणि दोघेही शोधासाठी पुढे निघून जातात. पुढे इजिप्तचे पिरॅमिड जवळ पोहोचल्यानंतर तेथील काही जमाती या दोघांनाही पकडून घेतात आणि तुम्ही गुप्तहेर आहात असे समजून त्यांना बंदी बनवतात. अलकेमिस्ट त्या जमातीतील लोकांना सांगतो की त्याला आणि मला काहीही माहित नाही ते फक्त शिकारीसाठी आलेले आहेत. अलकेमिस्ट त्या आदिवासी लोकांना सांगतो की सॅंटियागो हा एक अत्यंत मोठा जादूगार आहे. जो स्वतःला हवेमध्ये रूपांतरित करू शकतो. हे ऐकल्यानंतर ते आदिवासी अल्केमिस्ट ला सांगतात की जर सॅंटियागो आम्हाला अशी जादू करून दाखवेल तर आम्ही तुम्हाला सोडून देऊ. पण समस्या अशी असते की सॅंटियागो ला माहीत नसते की जादू कशी करावी. तो अल्केमिस्ट ला सांगतो की तू तर मला फसवले आता आपण दोघेही मारले जाऊ.तेव्हा अल्केमिस्ट सॅंटियागो ला सांगतो की तू आता मृत्यू आणि आपण हारून जाऊ या गोष्टींवर लक्ष देऊ नको. तर संपूर्णपणे एकचित्ताने या वाळवंटावर लक्ष केंद्रित कर. तू जर तुझ्या संपूर्ण एकाग्रतेने वाळवंटावर लक्ष केंद्रित केले तर तू गायब होऊ शकतोस.
हे ऐकून सॅंटियागो च्या मनात थोडसा आशेचा किरण जागा होतो. तू त्याचे सगळे लक्ष वाळवंटावर केंद्रित करतो आणि जणू त्या वाळवंटाशी त्या हवेशी आणि सूर्याशी संवाद साधू लागतो. तो स्वतःच्याच मनातील अंतरीय शक्तीला सांगू लागतो, काय तो खरंच स्वतःला अदृश्य करू शकतो? असा विचार करत असतानाच एक प्रचंड वादळ उठते सगळीकडे वाळूच वाळू पासून लागते आणि सॅंटियागो दिसेनासा होऊन जातो तेव्हा तो आणि अल्केमिस्त तिथून वाळवंटाच्या दुसऱ्या बाजूला जातात व पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात. पुढे प्रवास करत असताना चे एका संन्याशाला भेटतात संन्याशाला भेटल्यानंतर अलकेमिस्ट तांब्याच्या धातू पासून सोने तयार करून दाखवतो त्या सोन्याचे चार भाग करतो एक भाग सॅंटियागो ला देतो एक भाग अलकेमिस्ट स्वतःकडे ठेवतो आणि दोन भाग त्या संन्याशाला देतो संन्याशाला दिलेल्या दोन भागांपैकी एक भाग संन्याशाला आणि एक भाग पुन्हा सॅंटियागोला ज्या वेळी तो खजिना शोधून परत येईल तेव्हा मिळेल असे सांगतो आणि अलकेमिस्ट परत निघून जातो.
सॅंटियागो प्रवास करत करत पिरॅमिड्स जवळ येऊन पोहोचतो शोधण्यासाठी जमीन खणू लागतो. तेव्हा त्या ठिकाणी काही दरोडेखोर येतात आणि सॅंटियागो जवळचा सोन्याचा तुकडा हिसकावून घेतात.
त्या दरोडेखोरांना वाटते की सॅंटियागोला हे सोने इथे खोदता नाच मिळालेले आहे मग त्या चोरांचा सरदार सॅंटियागो ला सांगतो की आम्हाला तुझा सगळा खजिना दे. त्यावेळी सॅंटियागो त्याच्या स्वप्नाविषयी त्या दरोडेखोरांना सांगतो सॅंटियागो चे स्वप्न ऐकून त्या दरोडेखोरांना मधील एक दरोडेखोर जोरजोरात हसू लागतो आणि सांगतो की मला ही असे स्वप्न पडले होते. ज्यामध्ये मी असे पाहिले की स्पेनमध्ये एका चर्चमध्ये झाड आहे ज्या ठिकाणी गोरे चालणारे आपल्या मेंढ्यांना बरोबर झोपलेले आहेत ज्याच्या खाली खजिना गाडलेला आहे. असे म्हणून ते दरोडेखोर सॅंटियागो ला वेडा समजून तिथून निघून जातात. परंतु सॅंटियागो फारच खुश होतो आणि मोठमोठ्याने हसू लागतो . त्याला समजते की तो खजीना तर तिथेच होता ज्या चर्चजवळ च्या झाडा खाली झोपून त्याला हे स्वप्न पडले होते. त्यानंतर तो स्वतःच्या गावी परत येतो. आणि त्या चर्च जवळ जातो जिथे सायकोमोर चे झाड असते. ज्या झाडाखाली तो झोपलेला होता कारण की सायको मोर चे झाड हे इजिप्तचे प्रतीक आहे. त्यामुळेच त्याने स्वप्नामध्ये ईजिप्त बघितले होत. तो त्या झाडा जवळून तो खजिना काढतो आणि त्याला आठवते की आपण चर्चमधल्या त्या महिलेला वचन दिले होते खजिन्यातील दहावा हिस्सा देण्याचे. मग तो ठरवतो की खजिन्यातील दहावा हिस्सा त्या महिलेला देऊन तो त्या वाळवंटात पुन्हा जाईल आणि फातिमा सोबत लग्न करेल. फातिमा ला भेटल्यानंतर तो तिच्याशी लग्न करतो आणि ते आनंदाने राहू लागतात.
या गोष्टींमधून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात त्यातील
पहिली गोष्ट म्हणजे
जेव्हा आपण एखादी गोष्ट अगदी मनापासून मिळवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा आपण एका अनोख्या विश्वासाच्या अगदी जवळ असतो आणि ही शक्ती नेहमी सकारात्मक असते जसे की अनेक लोकांनी नाही म्हटल्यावर देखील आणि अनेक अडचणी आल्यावर देखील सान्तियागो ने खजिना मिळवण्याची इच्छा बदलली नाही.
दुसरी महत्त्वाची गोष्ट
सह्योग नावाची कोणतीही गोष्ट नसते विचार करा जर सॅंटियागो ने असा विचार केला असता की खजिना स्वतःच सॅंटियागो जवळ येईल तर तो कधीही श्रीमंत बनवू शकला नसता. त्यामुळे नशीब किंवा डेस्टिनी असे काहीही नसते. सतत तुम्हाला सतत प्रयत्न करत राहणे अत्यंत गरजेचे आहे.
तिसरी महत्त्वाची गोष्ट
आपले स्वप्न खरे होण्याची शक्यता आपले आयुष्य अगदी मनोरंजक बनवून देते. सॅंटियागो बरोबर असेल तेव्हा घडले जेव्हा त्याला वाटले की आता खजिना त्याच्यापासून फार दूर नाही. जर सगळे लोक एकाच ठिकाणाचा पत्ता सांगत आहेत तर ती गोष्ट माझ्यासाठी नक्कीच चांगली असली पाहिजे. आणि नक्की माझ्यासाठी कोणतातरी खजिना नक्कीच असला पाहिजे.
चौथी महत्त्वाची गोष्ट
प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील स्वप्न कधीही पूर्ण करण्यासाठी सक्षम असतात. त्यासाठी कोणतेही वयाचे बंधन नसते. जर सॅंटियागो एक लहानसा मुलगा असून देखील त्याचे स्वप्न साकार करू शकतो तर कोणीही आणि कोणत्याही वयात स्वतःचे स्वप्न साकार करू शकतो.
पाचवी महत्त्वाची गोष्ट
भूतकाळातही नाही आणि भविष्यकाळातही नाही तर वर्तमानात जगणे अत्यंत गरजेचे आहे.
जर तुम्ही नेहमी वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करू शकता तर तुम्ही सतत आनंदी राहणार यात शंका नाही. तुमचं आयुष्य तुमच्यासाठी एक पर्वणीच ठरेल यात शंका नाही. कारण खरे आयुष्य त्याचं क्षणात आहे जो क्षण आपण आत्ता जगत आहोत.
सहावी महत्त्वाची गोष्ट
फक्त एकच गोष्ट अशी असते की जी आपल्याला स्वप्न साकार करण्यापासून रोखते आणि ती म्हणजे अयशस्वी होण्याची भीती.
सातवी महत्त्वाची गोष्ट -
जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हा आपण सतत चांगले होत राहण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या वेळी आपण चांगले होत राहतो त्यावळी आपल्या आजूबाजूची परिस्थिती देखील चांगली होत जाजात. जसे आपण चांगले होत जातो तशी आपल्या आजूबाजूच्या घटनांकडे बघण्याची आपली दृष्टी देखील बदलत जाते.
आठवी महत्त्वाची गोष्ट
आपल्या मनाला सतत समजावत राहा की प्रत्यक्ष त्रास आपेक्षा त्रास होईल अशी भीती जास्त कष्टदायक असते.
नववी गोष्ट
कोणतीही गोष्ट शिकण्याचा सगळ्यात उपयुक्त मार्ग म्हणजे आपले कर्म. म्हणजेच कृती.
दहावी गोष्ट
प्रत्येक सामान्य गोष्ट ही असामान्य असते फक्त बुद्धिमान व्यक्तीच ते समजू शकतो. हेच तुम्ही असेही म्हणू शकता की सामान्य गोष्टी नही जो व्यक्ती असामान्य कार्य करून देतो तोच व्यक्ती खरा बुद्धिमान. जसे की या गोष्टीमध्ये सालेमच्या राजाने अत्यंत साधी गोष्ट अत्यंत आकर्षकपणे सॅंटियागो ला समजावून दिली होती.
अकरावी महत्त्वाची गोष्ट
प्रत्येक व्यक्तीकडे दुसऱ्याने जीवन कसे जगावे या विषयी चांगले अनुमान असतात परंतु स्वतः कसे जगावे याविषयी त्याने कधीही निरीक्षण केलेले नसत त्यामुळे जर प्रत्येक व्यक्ती स्वतःचे आयुष्य उत्तम करण्यावर प्रयत्न करत राहील. तर त्याचे जीवन अत्यंत आनंदमय होऊन जाईल.
बारावी महत्त्वाची गोष्ट
सुखी जीवनाचे रहस्य वर्तमानातील याच लक्षणांमध्ये आहे जर आपण वर्तमानातील प्रत्येक क्षण योग्य रीतीने कृती करत राहिलो तर आपोआपच आपले भविष्य देखील आनंददायी आणि यशस्वी होईल यात शंका नाही.
प्रिय मित्रांनो मला नक्की खात्री आहे की तुम्हाला द अल्केमिस्ट या पुस्तकाची समरी नक्की आवडेल.
तुमचा अभिप्राय नक्की कळवा.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.