www.upkarmarathi.com


स्वातंत्र्यवीर सावरकर|vinayak damodar savarkar


      |vinayak damodar savarkar information in Marathi "चार काटक्या जमवून घरटे बांधायची आणि पिलांसह जगायचे याला का संसार म्हणतात. असा संसार तर कावळे चिमण्याही करतात .आपल्याला संसार करायचा आहे तो आपल्या देशाचा .आपल्या संसाराची मोड-तोड होऊन जर पुढे हजारो देशबांधवांचे संसार सुखी होणार असतील तर आपल्या जीवनाचे सार्थक होईल."

  असे उद्गार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तुरुंगात भेटायला आलेल्या त्यांच्या पत्नी शी बोलताना काढले होते.


|vinayak damodar savarkar
 | विनायक दामोदर सावरकर |vinayak damodar savarkar



 
        विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. नाशिकला मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेऊन पुण्याच्या फर्गसन कॉलेजमध्ये दाखल झाले .

      पुण्यात येण्यापूर्वी त्यांनी अनेक देशभक्त तरुणांना एकत्र  करून  "मित्रमेळा" स्थापन केला होता. याच मित्रमेळाव्याचे पुढे अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेत रूपांतर झाले.

      छत्रपती शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक ही सावरकरांची दोन प्रेरणास्थान होती. त्यांच्या कार्यापासून स्फूर्ती घेऊन सावरकरांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली.

       सावरकर अतिशय बुद्धिमान आणि स्वाभिमानी विद्यार्थी होते. आपला देश स्वतंत्र नाही आणि पारतंत्र्यात खितपत पडला आहे. त्याचा त्यांना फारच राग येत असे. सावरकर देशभक्तीपर कविता करत, तेजस्वी लेख लिहीत आणि प्रभावी भाषण देत. आपल्या मित्रमंडळींना स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा देत.

       पुण्याला फर्ग्युसन कॉलेजात असताना सावरकरांनी स्वदेशी चा प्रचार केला. 1905 च्या  नवरात्रात त्यांनी एका सायंकाळी मित्रमंडळी जमवली. एका बैलगाडीत परदेशी कपड्यांचा मोठा ढीग रचून त्याची मिरवणूक काढली व शेवटी या परदेशी कपड्यांची होळी पेटवली. सावरकरांनी इंग्रज सत्तेविरुद्ध एक जळजळीत भाषण केलं.

   ही वार्ता कळल्यावर पुणे शहरात मोठी खळबळ उडाली. कॉलेजच्या प्राचार्यांनी सावरकरांवर शिस्तभंगाची कारवाई केली.


          देशाचं स्वातंत्र्य प्राप्त करण  ,त्यासाठी गुप्त संघटना बांधणे, शस्त्रास्त्र मिळवणे या गोष्टीचा  सावरकरांना अखंड ध्यास होता, पण हे जमाव कसं ? पण म्हणतात ना , इच्छा असली की मार्ग सापडतो. श्यामजी कृष्ण वर्मा या इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय क्रांतिकारकाने होतकरू देशभक्त तरुणांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती ठेवली होती. बी ए झाल्यावर ही शिष्यवृत्ती मिळवून सावरकर 1906 साली  उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेत असतानाच तेथील भारतीय विद्यार्थ्यांची संघटना करून सशस्त्र क्रांतीची तयारी करायची अशी त्यांची योजना होती.

          पाच वर्षे इंग्लंडमध्ये राहून सावरकर वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले पण त्यांना परीक्षेतील यशापेक्षा तळमळ होती भारताच्या स्वातंत्र्याची.. त्यासाठी त्यांनी इंग्लंडमध्ये गुप्त संघटना उभारली. शिवाजी उत्सव, गुरु गोविंद सिंह जयंती ,अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमराचा सुवर्ण महोत्सव असे प्रेरणादायी कार्यक्रम त्यांनी इंग्लंडमध्ये घडवून आणले. अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमचा इतिहास आणि इटलीचा स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी यांचे चरित्र त्यांनी लिहिले ,परंतु स्वातंत्र्य प्रेरणेला आवाहन करणारी ही दोन्ही पुस्तके सरकारने जप्त केली.

        महाराष्ट्र बॉम्ब बनवण्याची माहिती देणारी पुस्तिका आणि पिस्तुला मिळवून ती सावरकरांनी भारतातील क्रांतिकारकांना गुप्तपणे पाठवली. सावरकरांचा इंग्लंडमधील तरुण सहकारी मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायली या ब्रिटिश अधिकार्‍यावर गोळ्या झाडून त्यास ठार केले. याच सुमारास नाशिक येथे अनंत कान्हेरे याने सावरकरांनी पाठवलेल्या पिस्तुलाने कलेक्टर जॅक्सन याचा वध केला .या सर्व घटनांचे सूत्रधार सावरकर आहेत हे सरकारच्या लवकरच लक्षात आले .पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली सरकारच्या हाती सापडू नये म्हणून सावरकर काही काळ पॅरिसला जाऊन राहिले. 13 मार्च 1910 रोजी पॅरिस मधुन निघून लंडनला येताच पोलिसांनी त्यांना अटक केली.त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून खटला भरण्यासाठी त्यांची एका बोटीने कडक बंदोबस्तात भारताकडे रवानगी केली.

         बोट फ्रान्समधील मार्सेय बंदराजवळ असताना सावरकर आगबोटीच्या स्वच्छतागृहातून उडी टाकून जवळच असलेल्या किनाऱ्याकडे झपाट्याने पोहोचत गेले परंतु पोलिसांना चुकवणे त्यांना शक्य झाले नाही. ब्रिटिश पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व भारतात परत आणले. भारतात खास न्यायालयापुढे त्यांच्यावर दोन खटले चालवण्यात आले व त्यांना एकूण पन्नास वर्षांची जन्मठेपेची शिक्षा झाली .या शिक्षणासंबंधी सावरकर म्हणाले की पन्नास वर्षे इंग्रजांचे राज्य तरी हिंदुस्थानात टिकणार आहे काय?

     जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी सावरकरांना अंदमानला नेण्यात आले. तेथील तुरुंगाच्या एका कोठडीत त्यांना डांबले. सावरकर तिथे दहा वर्ष होते. या काळात त्यांचा अनन्वित छळ झाला .माझी जन्मठेप या आत्मचरित्रात सावरकरांनी अंदमानातील त्या भयंकर दिवसांचे थरारक शब्दचित्र रेखाटले आहे .अंदमानातून 1921 साली सावरकरांना येरवड्याच्या तुरुंगात हलविण्यात आले .पुढे सरकारने त्यांना रत्नागिरीस नेऊन स्थानबद्ध केले . रत्नागिरी सोडून त्यांनी कोठेही जायचे नाही. राजकारणात भाग घ्यायचा नाही .अशी बंधने त्यांच्यावर घालण्यात आली. पुढे 1937 साली प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या. मुंबई प्रांतात राष्ट्रीय सभेचे सरकार अधिकारांवर आले .त्याच वर्षी सावरकरांची बिनशर्त मुक्तता करण्यात आली.

    रत्नागिरीतील त्यांच्या स्थानबद्धतेच्या  काळातही सावरकर स्वस्थ बसले नव्हते. या काळात त्यांनी तिथे समाजसुधारणेचे बरेच काम केले .जातीभेद निर्मुलन ,अस्पृश्यता निवारण, सहभोजन ,भाषाशुद्धी अशा अनेक सामाजिक चळवळी केल्या. शेकडो लेख लिहिले ,कविता केल्या. नाटकं लिहिली .भाषणे दिली व समाजाला जागं केलं. अंधश्रद्धेला त्यांचा विरोध होता .विज्ञानावर त्यांची अपार निष्ठा होती. विज्ञान हे अखिल मानवाच्या समृद्धीसाठी व विकासासाठी आहे अशी त्यांची धारणा होती.
   
      सावरकर हे उत्तम लेखक होते. त्यांच्या साहित्य सेवेचा गौरव म्हणून त्यांना 1938 मध्ये मुंबई येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले. स्वातंत्र्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि त्यासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या या स्वातंत्र्यसैनिकांना स्वतंत्र भारत पाहण्याचे आणि जगण्याचे भाग्य लाभले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर  २६ फेब्रुवारी १९६६ रोजी सावरकरांचे निधन झाले.

FAQs

|vinayak damodar savarkar books सावरकरांनी लिहिलेली पुस्तके.

  1. गांधी आणि गोंधळ
  2. विविध लेख 
  3. हिंदुत्व
  4. संगीत उ:शाप 
  5. हिंदुराष्ट्र दर्शन 
  6. ऐतिहासिक निवेदने
  7. स्फुट लेख
  8. क्रांतिघोष 
  9. अखंड सावधान असावे
  10. शत्रूच्या शिबिरात 
  11. गरमागरम चिवडा
  12. तेजस्वी तारे 
  13. माझ्या आठवणी- भगूर
  14. सावरकरांची पत्रे 
  15. माझ्या आठवणी -पूर्वपिठिका 
  16. जात्यूच्छेदक निबंध
  17. महाकाव्य कमला
  18.  माझ्या आठवणीत नाशिक
  19.  अंदमानच्या अंधेरतून 
  20. संन्यस्त खडग आणि बोधिवृक्ष
  21. हिंदुपदपादशाही
  22.  जोसेफ मॅझिनी
  23.  क्ष-किरणे 
  24. करणसिंग 
  25. भाषाशुद्धी 
  26. सावरकरांच्या कविता
  27.  संगीत उत्तरक्रिया
  28.  हिंदुत्वाचे पंचप्राण
  29.  प्राचीन अर्वाचीन महिला
  30.  लंडनची बातमीपत्रे
  31.  मोपल्यांचे बंड
  32. महाकाव्य गोमांतक
  33.  विविध भाषणे 
  34. अंधश्रद्धा भाग एक
  35.  अंधश्रद्धा भाग दोन
  36.  विज्ञाननिष्ठ निबंध
  37.  काळेपाणी 
  38. भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
  39.  अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर 
  40. माझी जन्मठेप 
  41. रणदुंदुभी 

|Vinayak Damodar Savarkar jayantiविनायक दामोदर सावरकर यांची जयंती

28मे (1883)

When did Veer Savarkar died? सावरकरांचा मृत्यू कधी झाला?


सावरकरांचा मृत्यू 26 फेब्रुवारी 1966 रोजी झाला.

Was Savarkar married? सावरकरांचा विवाह कुणाबरोबर झाला?

सावरकरांचा विवाह यमुनाबाई यांच्याबरोबर झाला.

Where was Savarkar born? सावरकरांचा  जन्म कुठे झाला?

सावरकरांचा जन्म नाशिक मधील भगूर या गावी झाला.

|Vinayak Damodar Savarkar quotes सावरकर विचार मराठी


  • हे मातृभूमि तुझ्यासाठी मरणे हेच खरे जगणे आणि तुझ्या विना जगणे हे म्हणजे मरण.
  • समाजाची आणि राष्ट्राची इमारत धर्म ग्रंथांच्या पायावर नव्हे तर विज्ञान ग्रंथांच्या प्रबल पायावर उभी केली पाहिजे.
  •  जिस दिन हिंदू संघटित हो जायेंगे काँग्रेसी कोट के ऊपर जनेऊ पहनेंग.
  • उदात्त आणि महान ध्येयासाठी केलेले कोणतेही बलिदान वाया जात नाही.
  • जेव्हा सूर्य काजव्यांची मनधरणी करू लागतो तेव्हा सौरमंडल सुद्धा त्याच्या बाजूने उभे असत नाही.

निष्कर्ष:


  प्रिय वाचक मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Swatantrya Veer Vinayak Damodar Savarkar) यांच्या विषयी माहिती बघितली. तुम्हाला जर अजून कोणती माहिती हवी असेल तर तसे कमेंट करून नक्की सांगा.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने