www.upkarmarathi.com
COVID 19 a lesson for humans
नमस्कार मित्रांनो कोरोना काळामध्ये आपण अनेक अनुभव घेतले या अनुभवातून शिकूनच आता भविष्यासाठी तयार होणे अत्यंत गरजेचे आहे. हेच आपण आत्ताच्या या लेखांमध्ये जाणून घेऊया. काळातील अनुभव व त्यातील शिकवण या माहिती वजा निबंधातून आपण या विषयावर माहिती बघूया.|COVID 19 a lesson for humans essay in 500 words
COVID 19 a lesson for humans essay in 500 words |
COVID 19 a lesson for humans essay in 500 words
| कोरोनाने शिकवलेले धडे | कोरोना काळातील अनुभव
COVID 19 a lesson for humans,चीन मधल्या वुहान मधून निघालेला कोरोना व्हायरस कधी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला कळलेच नाही. कोरोना विषाणू कुठून आला याविषयी अजून जरी संभ्रम असले तरी देखील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासाठी मिळाल्या. हे मात्र नाकारता येणार नाही.
मानवाची दुर्बलता
जगात सर्वच दृष्टीने प्रगत म्हणवणाऱ्या अनेक देशांच्या आरोग्य विषयक दुर्बलतेचे दाखले सर्वांसमोर प्रस्तुत झाले. अमेरिका फ्रान्स इंग्लंड जर्मनी अशा अनेक प्रगत देशांमध्ये आरोग्य व्यवस्थित वर खूप मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. कोविड चे व्हॅक्सिनेशन आतापर्यंत अनेक देशांमध्ये चालू आहे.
योग्य नियोजनाची गरज
सुरुवातीच्या काळामध्ये कोणालाही या संकटाला तोंड देण्यासाठी काय करावे याविषयी निर्णय घेताना फार मोठ्या अडचणी येत होत्या. भारतात मात्र योग्य नियोजनामुळे काही प्रमाणात आत्ता स्थिरता येऊ लागली आहे.
नातेसंबंधांमध्ये प्रेम
कोरोना कालावधीमध्ये सर्वच व्यवसाय डबघाईला आले होते अनेक व्यवसाय बंद झाले. त्यामुळे लोकांच्या जीवनमानावर फारच दुरोगामी परिणाम झाले अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या तर बऱ्याच लोकांनी आपली जीवाभावाची माणसे देखील गमावलीत.
आपुलकीची आणि प्रेमाची गरज
हातावर पोट असणाऱ्या आणि मोलमजुरी करणाऱ्या लोकांचे अतोनात हाल या काळामध्ये झाले. पोटासाठी परराज्यातून आलेल्या लोकांना उपासमारीचा सामना करावा लागला. अनेकांनी आपल्या घरी परतत असताना प्राण गमावले. आपल्या प्रियजनांना डोळ्यासमोर मरताना बघून अनेकांचा जीव नकोसा झाला.
आरोग्याचे महत्त्व
कोविड-19 मात्र आरोग्याचा एक धडा अतिशय निर्दयीपणे शिकवून गेला. तुम्ही कितीही पैसे कमवा आणि श्रीमंत हा परंतु तुमचे आरोग्य चांगले नसेल तर तुमची सर्व संपत्ती मातीमोल ठरेल.
व्यक्तिमत्व विकास
आपले व्यक्तिमत्व सतत सुधारत राहावे कारण कोणाचे आयुष्य कधी संपून जाईल सांगता येत नाही , मग एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याच्याविषयी आपल्या मनात असणारे प्रेम किंवा इतर चांगल्या भावना त्याच्याकडे व्यक्त करायचे राहून जाते, आणि हे मनाला सतत टोचत राहते. त्यामुळे जे करायचे आहे ते आत्ता लगेच आणि त्वरित करायला हवे असा एक महत्त्वाचा धडा कोरोना शिकवून गेला.
वेळेचे महत्व
तुम्हाला आयुष्यात जे करायचे आहे ते करण्यासाठी लगेच सुरुवात करा कशाचीही वाट पाहू नका. मुहूर्त पाहण्यात वेळ घालवाल तर महत्त्वाच्या अनेक संधी आता तू निसटून जातील. इतिहासातील एक प्रसिद्ध वाक्य आठवते ,
कल करे सो आज कर
आज करे सो अब
आयुष्याच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी पैसा साठवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी योग्य आर्थिक नियोजन केलेच पाहिजे असा महत्त्वाचा संदेश देखील कोरोनाने दिला. जर योग्य आर्थिक नियोजन केले नाही तर आयुष्यामध्ये अचानकपणे येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी आपण असमर्थ ठरतो.
आरोग्यदायक जीवनशैलीचे महत्त्व
आहार- विहाराच्या योग्य सवयी शरीराला जाणीवपूर्वक लावून घेणे अत्यंत आवश्यक आहे. धावपळीच्या या युगामध्ये मनुष्याने स्वतःच्या आहार-विहार इत्यादी सवयींमध्ये खूप बदल केलेले आहेत त्यामुळे त्याचे आरोग्य दिवसेंदिवस खालवत आहे.
कोरोनाने शिकवलेले धडे (COVID 19 a lesson for humans)
- मानवाची दुर्बलता
- योग्य नियोजनाची गरज
- नातेसंबंधांमध्ये प्रेम
- आपुलकीची आणि प्रेमाची गरज
- आरोग्याचे महत्त्व
- व्यक्तिमत्व विकास
- वेळेचे महत्व
प्रिय वाचक मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आपण "कोरोना - एक शिकवण |COVID 19 a lesson for humans essay in 500 words " याविषयी थोडक्यात माहिती बघितली. तुम्हाला यावर अजून जास्त माहिती हवी असेल तर तसे कमेंट करून सांगा आम्ही आपल्याला अजून छान माहिती देण्याचा प्रयत्न करू. खूप धन्यवाद
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.