www.upkarmarathi.com

       Essay on if barakhadi is not in existence How will we talk in Marathi ,भाषा म्हणजे माणसाला व्यक्त होण्यासाठी असलेले एक माध्यम होय. भाषेमुळे मनुष्य आपल्या भावभावना व्यक्त करू शकतो . आपल्या डोक्यातील छान कल्पना इतरांसमोर सादर करू शकतो. संपूर्ण जगामध्ये विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात . प्रत्येक प्रकारच्या भाषेची स्वतःची अशी ठेवण आहे एक लहेजा आहे.
     भाषा ही लिखित स्वरूपात नंतर आली आधी मनुष्य बोलायला शिकला आणि मग नंतर लिहायला शिकला. आपण जी भाषा बोलतो त्या भाषेचे लिखित स्वरूप म्हणजेच सर्व प्रकारच्या स्वर चिन्हांचा वापर करून एकत्रित मांडणी होय.

   जशी मराठी भाषेमध्ये बाराखडी आहे तसेच प्रत्येक भाषेमध्ये त्या भाषेचे अवयव तर असणारच ना. इतर भाषांचा जाऊद्या आता आपण मराठी भाषेविषयी विचार करूया समजा मराठी भाषेमधील बाराखडी राहिली नसती तर आपण कसे बोललो असतो याविषयी एक छान निबंध आपण बघूया. (Essay on if barakhadi is not in existence How will we talk in Marathi)

     या जगामध्ये प्रत्येक गोष्टीला पर्याय असतोच आणि ज्या गोष्टींना पर्याय नसतो त्या गोष्टींसाठी सजीव किंवा निसर्ग सतत नवीन पर्याय शोधत असतो. मग बाराखडी राहिली नसती तर माणसाने वेगळ्या प्रकारची भाषा बोलण्याची कला अवगत करून घेतली असती किंवा एखादी नवीन भाषाच निर्माण केली असती. प्राणी पक्षी हे कुठे बाराखडी बोलतात त्यांची तर स्वतंत्र  भाषा आहेच ना !


     काही माणसे जन्मताच मुकी असतात. अशी माणसेही जगताना हात वाऱ्यांची भाषा किंवा खुणांची भाषा वापरून आयुष्य जगत असतातच. त्यामुळे जरी बाराखडी राहिली नसती तरीदेखील माणसाच्या संवाद कौशल्यावर फारसा फरक पडला नसता असे मला वाटते.
    एक गोष्ट मात्र घडले असती की प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा साहित्य प्रकारांमध्ये आनंद घेण्याची पद्धत मात्र वेगवेगळे राहिली असती. उदाहरण द्यायचे झाले तर समजा विविध प्रकारचे विनोद किंवा कविता समजून घेताना त्यातील भावना आपल्यापर्यंत कशा पोहोचल्या असत्या. म्हणजे बघा ना कोलंबसाचे गर्वगीत आणि त्यातील वाक्य,,
अनंत आमची ध्येयासक्ती
 अनंत आमच्या आशा
 किनारा तुला पामराला

    या वाक्यांमधून कोलंबसाने समुद्राला केलेले आवाहन समजण्यासाठी आपल्याला फारच कष्ट पडले असते. बाराखडी जर राहिली नसती तर अशा प्रकारच्या अनेक समस्या निर्माण झाल्या असत्या.
|Essay on if barakhadi is not in existence How will we talk in Marathi.

    
     

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने