www.upkarmarathi.com
एकावेळी एकच संबोध शिकवावा.
1)कमी जास्त
काय जास्त
काय कमी
एकास एक संगती
2)लांब आखूड
विविध वस्तूंच्या साह्याने मुलांना कृती समजून द्यावी.
3)1ते5संख्या
मुलांच्या हातात काड्या देऊन मोजायला सांगणे.
विद्यार्थ्यांनी काड्या मोजल्यानंतर त्यांना जितक्या काड्या असतील त्या अंकाचे अंक कार्ड दाखवणे.
(टीप -विद्यार्थ्यांचा गट असेल तर त्यांना एक ते पाच काड्या देऊन सराव घ्यावा. शिक्षक यावर आधारित आपल्या विद्यार्थ्यांनुसार विविध प्रकारच्या कृती स्वयंपर्यरणेने घेऊ शकतात.)
4)शून्याची (०) ओळख
(टीप - विद्यार्थ्यांना एक ते पाच संख्यांचे ज्ञान झालेले आहे असे गृहीत धरून मग पुढे शिकवावे.)
एक ते पाच पर्यंतच्या अंकांच्या मदतीनेच शून्य शिकवावा काड्या कमी करत जाणे व शेवटी काहीच उरत नाही याचा अर्थ शून्य हा संबोध सांगावा.
*१) १ ते ५ अंक शिकवल्या नंतरच 0 (शून्याची ) ओळख का करून. घेतली?*
*एक च्या आगोदर किंवा नऊ नंतर का नाही ?*
*तर जेव्हा 1 ते 5 अंक शिकवून झाल्या नंतर 0 याच्यासाठी ओळख करून द्यायची आहे.. कारण तिथे 1 ते 5 या अंकामध्ये वजाबाकी शिकवायची आहे..
उदा. 2-1=2
3-3 =0
त्यासाठी 0 ची ओळख तिथे महत्त्वाची आहे.
आणि पुढे 10 पर्यंत संख्या ओळख होईल, तेव्हा बेरीज.
पण बेरीज करतांना
बेरीज 2 ते 10 आली पाहिजे .. ही काळजी तेवढी घ्यायची आहे.
5) ६ ते ९ ची ओळख.
या कृती करताना विद्यार्थ्यांना विविध काड्या किंवा साहित्य देणे व त्यानंतर त्या अंकाचे अंक कार्ड दाखवून अंकांची ओळख करून देणे.
6) दशकाची ओळख करून देणे.
• विद्यार्थ्यांसमोर साहित्य टाकून त्यांना एक ते नऊ पर्यंत मोजायला सांगावे.
• नव मोजल्यानंतर त्यात अजून एक वस्तू मिळवायला सांगायची.
• त्यानंतर मुलांना तो दहा म्हणायला सांगायचा.
• विविध वस्तू देऊन मुलांना स्वतः दहा दहा चे गट बनवू द्यावेत.
• विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनानुसार त्यांना विविध वस्तूंचे गट करू द्या.
• बऱ्याच वेळा गट करून दहाचा सराव झाल्यानंतर मग त्यांना दोऱ्याने किंवा रबरच्या साह्याने गठ्ठे तयार करू द्या.
• विद्यार्थ्यांना त्यांच्या समाजाप्रमाणे साहित्य बनवून आणू द्यावे त्यामुळे त्यांना त्या साहित्याविषयी आत्मीयता वाटते होते अत्यंत काळजीपूर्वक साहित्य वापरतात.
7)11ते19 पर्यंत संख्या
• एक ते नऊ पर्यंतच्या अंकांना स्वतःचे अस्तित्व आहे परंतु त्यानंतरचे अंक या एक ते नऊ पर्यंतच्या अंकांच्या मदतीनेच तयार केले जातात.
• त्यामुळे पुढच्या संख्या म्हणजेच 11 ते 19 पर्यंतच्या संख्या त्यांना दशक आणि एकक या स्वरूपात शिकवाव्या .
• विद्यार्थ्यांना गाड्या देऊन त्यांना प्रथम दहा चे गट्टे तयार करावे लावावे व त्यावरून उरलेले एकक आणि नंतर मग संख्या अशा पद्धतीने शिकवावे.
एकच संख्या विविध स्वरूपात मांडण्याचा सराव द्यावा.
उदाहरणार्थ 53 ही संख्या
• 5 दशक तीन एकक
• 4 दशक 13 एकक
• 3 दशक 23 एकक
• 2 दशक 33 एकक
• 1 दशक 43 एकक
• आणि 53 एकक
म्हणजेच विद्यार्थ्यांना संख्येचे बंद रूप आणि खुले रूप याविषयी व्यवस्थित माहिती समजून सांगावी.
मनी माळेवर विद्यार्थ्यांकडून सर्व संख्या एक दोन, तीन ,चार, पाच.... 100 पर्यंत क्रमाने दररोज म्हणून घेणे.
मुलांना जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत गठ्ठे हा शब्द वापरावा आणि एकदा संबोध क्लिअर झाला की त्यानंतर दशक हा शब्द वापरावा.
विद्यार्थ्यांचा लर्निंग लॉस भरून काढणे हे मुख्य उद्देश आहे परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की प्रत्येक विद्यार्थ्यांचा लर्निंग लॉस हा त्याच्या सामाजिक किंवा आर्थिक परिस्थितीनुसार वेगवेगळा देखील असू शकतो
8) बेरीज शाब्दिक उदाहरणे
• विद्यार्थ्यांना स्वतंत्र अंक घेऊन बेरीज वगैरे इत्यादी काहीही शिकवणे नाही. त्यांच्या अनुभव विश्वातील उदाहरणानुसार फक्त चर्चा करायची आहे.
• मुलांना स्वतः शिकण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करावा.
• व्यवहारातील लहान संख्यांच्या उदाहरणाने सुरुवात करावी.
• एका समूहात वाढ होणे किंवा दोन समूह एकत्र करणे, एकूण यासारखे शब्द वापरावे.
शाब्दिक उदाहरणे वजाबाकी
वजाबाकीच्या व्यवहारातील लहान संख्यांच्या उदाहरणाने सुरुवात करावी.
एका समूहात काही घटक कमी करणे किंवा दोन समूह व राशीतील फरक अशा प्रकारचे उदाहरणे घ्यावेत.
मनीमाळ वरच बेरजेच वगैरेचा सराव अधिकाधिक करून घ्यायचा..
खूप छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.