www.upkarmarathi.com
Write an essay of 150 words on COVID 19 |
essay of 150 words on COVID 19
good and bad experiences during lockdown,असे म्हटले जाते की, प्रत्येक दुःखाला एक सुखाची झालर असते आणि प्रत्येक सुखाला एक दुःखाची किनार असते. Covid-19 म्हणजेच कोरोनाचा काळ हा देखील असाच होता. या काळामध्ये अनेकांना आपले हरवलेले नाते गवसले तर अनेकांनी आपले नाते गमावले देखील.
Covid-19 च्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळामध्ये सर्वत्र लोकांमध्ये प्रचंड भीती होती. म्हणून या कालावधीत लोकांनी एकमेकांशी बोलणे देखील टाळले. गळ्यात गळे घालून फिरणारे मित्र एकमेकांपासून दुरावले. तर दुसरीकडे अनेक गरजवंतांना मदतीचे लाखो हात पुढे आले. अगदी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आणि त्यातून माणुसकीचे एक नवीन दर्शन देखील घडले.
|Write a essay of 150 words on COVID 19
आरोग्य विभागावर प्रचंड दबाव निर्माण झाला. तसेच भारतातील वैद्यकीय सुविधांचे अशक्तपण सर्वांसमोर आले परंतु त्यांना साथ दिली ती सर्वच शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी. शिक्षण क्षेत्रातील लोकांचा देखील फार मोलाचा सहभाग होता.
सर्वच क्षेत्रातील लोकांनी मुलाचा सहभाग दिला. तरी देखील मात्र विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी आणि आपल्या सर्वांना इंटरनेटची अविरत सेवा पुरवणारे कर्मचारी यांच्याकडे मात्र म्हणावे तेवढे लक्ष दिले गेले नाही. या सर्वांचे आपल्यावर प्रचंड उपकार आहेत.
अडचणीच्या वेळेमध्ये आपले आणि परके समजतात अशी एक म्हण आहे. covid-19 च्या काळामध्ये परक्यांमधील आपले देखील समजले. अडचणीच्या वेळी जे उपयोगी पडतात तेच खरे मित्र आणि आपले असतात. माणुसकीने ऊत प्रत भरलेले अनेक लोक आजही समाजामध्ये वावरत आहेत आणि त्यामुळे समाजातील एकात्मतेचा समतोल टिकलेला आहे.
मित्रांनो तुम्हाला हा कोविड-19 वर आधारित छोटासा निबंध कसा वाटला ? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे निबंध हवे असतील तर तेही आम्हाला सांगा. आम्ही तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.