www.upkarmarathi.com

   The earth information, सूर्यमालेतील अत्यंत सुंदर आणि आकर्षक ग्रह म्हणून पृथ्वीकडे बघितले जाते. शालेय जीवनापासून तर संपूर्ण जीवनकालात पृथ्वी विषयी विविध प्रकारची माहिती आपल्याला मिळतच राहते. आजच्या या लेखांमध्ये आपण पृथ्वीविषयी मराठीतून माहिती (the earth information in Marathi) बघूया

|The earth information
आपल्या पृथ्वीविषयी माहिती |The earth information



     आपल्या पृथ्वीविषयी माहिती 
|The earth information


  1. पृथ्वी हा आपल्या सूर्यमालेतील तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे.
  2. पृथ्वीचा एकूण भागापैकी 71 % भाग पाण्याने आणि 29% भाग जमिनीने व्यापलेला आहे.
  3. पृथ्वी हा सूर्यमालेतील एकमेव ग्रह आहे ज्यावर जीवसृष्टी आहे.
  4. संपूर्ण पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे.
  5. पृथ्वीभोवती असलेल्या या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात.
  6. वातावरण म्हणजे अनेक वायूंचे मिश्रण आहे.
  7. वातावरणामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी राहू शकते.
  8. पृथ्वी स्वतःभोवती सतत फिरत असते.
  9. पृथ्वी फक्त स्वतःभोवतीच फिरत नाही तर स्वतःभोवती फिरताना ती एका विशिष्ट मार्गाने सूर्याभोवती सुद्धा फिरत असते.
  10. पृथ्वी सूर्याभोवती ज्या विशिष्ट मार्गाने फिरते तिलाच पृथ्वीची कक्षा असे म्हणतात.
  11. स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला पृथ्वीला सुमारे 24 तास लागतात. यालाच आपण एक दिवस असे म्हणतो.
  12. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला पृथ्वीला 365 दिवस लागतात यालाच एक वर्ष असे म्हणतात.
  13. पृथ्वी सूर्याभोवती ताशी 67000 मैल (1,07,826किमी) प्रति तास इतक्या वेगाने फिरते.
  14. पृथ्वीच्या गर्भामध्ये निखिल आणि लोह यांच्या वेगवान हालचालींमुळे पृथ्वीभोवती चुंबकीय आवरण तयार झालेले आहे या आवरणामुळे पृथ्वीचे सौर वाऱ्यांपासून संरक्षण होते.
  15. पृथ्वीवर असलेल्या एकूण पाण्यापैकी बहुतांश पाणी हे अंटार्क्टिका खंडावर आहे.
  16. भूगर्भामध्ये सतत हालचाली होत असतात या हालचालींमुळे भूकंप होतो.
  17. जगातील सगळ्यात मोठा भूकंप चिली येथे झाला.
  18. ज्वालामुखी आणि पाण्याच्या वाफेसह वायू बाहेर पडल्यामुळे पृथ्वीवरील वातावरण आणि समुद्र तयार झाले आहेत.
  19. पृथ्वीवर वर्ष जेवढे मोठे असते त्यापेक्षा बुध आणि शुक्र या ग्रहांवरचे एक वर्ष लहान असते.
  20. सूर्यापासून जास्त दूर अंतरावर असणाऱ्या ग्रहावर वर्षांचा कालावधी मोठा -मोठा होत जातो.
  21. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना किंचित कलते तिच्या या वाकण्यामुळेच पृथ्वीवर आपल्याला वेगवेगळे ऋतू अनुभवता येतात.

What is Earth day and why is it celebrated?




Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने