www.upkarmarathi.com
      
       लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बागेमध्ये फिरायला आवडते. बागेतील हिरवीगार झाडे व रंगीबेरंगी फुले बघून मन आनंदित होऊन जाते. आजच्या या लेखांमध्ये आपण बागेविषयी ( |garden essay in Marathi )अनेक निबंध बघणार आहोत. यामध्ये बागेचे मनोगत, बागेचे वर्णन या सर्व मुद्द्यांचा आपण अभ्यास करूया.





Autobiography of a garden in Marathi

|बागेचे मनोगत मराठी निबंध 

     दीपावलीच्या सुट्टी मधली गोष्ट आहे .मी आणि आमच्या घरातील सर्व मंडळी बागेमध्ये फिरण्यासाठी आमच्या गावातल्या बागेमध्ये गेलो होतो. बाग फारच सुंदर होती बरेच दिवस बागेमध्ये जाण्याचा प्रसंग आलेला नव्हता म्हणून मनात विशेष आनंद होता.

    घरून निघालो आणि बागेच्या संरक्षक भिंतीतून प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो ,तर वाटले की बाग जणू आमच्या स्वागतासाठीच तयार आहे. बागेच्या प्रवेशद्वारावर काढलेल्या मोरांच्या चित्रांची हालचाल होत असल्याचा भास मला झाला.

    प्रवेशद्वारातून आत गेल्याबरोबर आवाज आला  बऱ्याच दिवसांनी माझी आठवण झाली. मी इकडे तिकडे बघू लागलो तितक्यात पुन्हा आवाज आला इकडे तिकडे बघून माझा शोध घेऊ नको. मी बाग बोलते आहे. त्यामुळे माझा आवाज सगळीकडून येणार ,कारण माझ्यातील सर्व झाडे ,पक्षी , फुले, पाने तुझ्याशी बोलण्यासाठी आतुर झालेले आहेत.

    आज जसा बऱ्याच दिवसांनी तू मला भेटण्यासाठी आला, तसेच बरेच जण आज खूप दिवसांनी आलेले आहेत ,तर काही नेहमीच मला भेटण्यासाठी येतात .मी सर्वांचे त्याचप्रमाणे स्वागत करते.

        अनेक कामांमध्ये आणि जबाबदाऱ्यांमधून काही आनंदाचे आणि मोकळे क्षण मिळवण्यासाठी लोक इथे माझ्याकडे येतात. या गोष्टीचा मला फारच आनंद होतो की मी कुणासाठी तरी उपयोगी आहे. माझ्यामध्ये फुललेले सुंदर सुंदर फुले बघून मनामध्ये आनंद निर्माण होतो व ताण-तणाव दूर होतो. माझ्यामुळे अनेकांना रोजगार देखील मिळालेले आहेत. आईस्क्रीमवाले, कुल्फीवाले, ज्यूसवाले या सर्वांना उदरनिर्वाहाचे साधन माझ्यामुळे मिळाले आहे.

      आरोग्य मिळवण्यासाठी अनेक स्त्रिया आणि माणसे या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी येतात. माझी झाडे त्यांना सकाळी शुद्ध हवेचा पुरवठा करून त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. जाताना त्याच स्त्रिया मात्र माझ्या बागेतील सुंदर सुंदर फुले तोडून घेऊन जातात. त्यातील काही फुले देवपूजेसाठी तर काही स्त्रियांची शोभा वाढवण्यासाठी उपयोगी पडतात.

      लहान मुलांच्या गमतीजमती बघून तर मला फारच आनंद वाटतो. माझ्या अंगणात ठेवलेल्या खेळण्यांवर मुले जेव्हा मनापासून खेळतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो.

    त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सतत असाच असावा अशी मी देवाकडे प्रार्थना करते आणि माझं बोलणं थांबवते. आता तू ही माझा चांगला आनंद घे आणि भरपूर खेळ.


मी पाहिलेली बाग मराठी निबंध

Garden essay in Marathi language 


      Garden essay in Marathi language ,सुट्टीचा दिवस होता त्यामुळे आई बाबांबरोबर मी एका बागेमध्ये गेलो होतो. त्या बागेचे नाव सरस्वती बाग असे होते. बागेचा परिसर खूपच मोठा होता. बागेच्या चौथे छान अशी गुलमोहराची झाडे लावलेली होती. गुलमोहर आला लाल लाल रंगाचे फुले लागलेली असल्यामुळे फारच सुंदर दिसत होते. बागेमधून चालण्यासाठी छोटे छोटे सुंदर रस्ते बनवलेले होते.

       ठिकठिकाणी विविध प्राण्यांचे पुतळे देखील होते. वडाचे एक झाड फारच मोठे होते तसेच इतरही मोठी अनेक झाडे होती प्रत्येक झाडाखाली बसण्यासाठी छान बाक ठेवलेले होते.

       बागेच्या दर्शनी भागामध्ये सुंदर फुल झाडे लावलेले होते त्यामध्ये गुलाब जाई जुई मोगरा यासारख्या सुगंधित फुलांचा समावेश होता. झाडांना नियमितपणे पाणी देण्यासाठी माळी काकाही होते.

         लहान मुलांसाठी बागेमध्ये घसरगुंडी सिसा झोपाळे असे अनेक प्रकारचे खेळणे ही होते त्यावर बसून खेळायला फार मज्जा आली. झोक्यावर बसून मी खूप उंच झोके घेतले.

      लोकांना चालण्यासाठी सिमेंटचा सुंदर रस्ता बांधलेला असून त्यावर छान रंगीत फरशाही लावलेल्या होत्या. त्यामुळे बागेत रंगीत सादर अंथरलेली आहे असे वाटत होते. बागेच्या मध्यभागी असलेल्या छोट्याशा तळ्यामध्ये काही विविध रंगांचे मासे होते. मी मासे पाण्यात कसे पोहतात याचे निरीक्षण करत होतो.
  
     भरपूर मजा केल्यानंतर बाहेर उभे असलेल्या आईस्क्रीमचा आनंद घेतला आणि मग घराकडे परत आलो.


या निबंधाची खालील प्रमाणेही नावे असू शकतात
  1. |बागेतील एक दिवस निबंध 
  2. मी पाहिलेली बाग मराठी निबंध
  3.  बागेचे वर्णन
  4.  बगीचा निबंध मराठी
  5.  बागेची माहिती मराठी
  6.  बागेत एक संध्याकाळ निबंध

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने