www.upkarmarathi.com


माझ्या स्वप्नातील भारत मराठी निबंध



माझ्या स्वप्नातील भारत मराठी निबंध 
|mazya swapnatil Bharat essay  in Marathi

         आपल्या भारत देशात अनेक वर्षापासून विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने व प्रेमाने राहत आहेत. मधुमालती च्या वेलीवर ज्याप्रमाणे अनेक रंगाची फुले एकत्र असतात अगदी त्याच पद्धतीने अनेक जाती धर्म या भारत देशामध्ये एकत्र नांदत आहेत.
   सध्या मात्र सर्वत्र अराजकता निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. माझ्या स्वप्नातील भारतात मात्र अशी अराजकता नसेल. माझ्या स्वप्नातील भारत कसा असेल हे आपण आता 
| mazya swapnatil Bharat या निबंधामध्ये बघूया.


माझ्या स्वप्नातील भारत मराठी निबंध
|Majhya swapnatil Bharat Marathi nibandh


विविधेतून एक्याचा दे ,
       जगा नवा संदेश|
 असा आगळा जगावेगळा,
        माझा भारत देश|

   या काव्यपंक्तीतून आपल्याला सहज समजेल की विविध रंगांनी आणि विविध  परंपरांनी नटलेला आपला भारत देश जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. अत्यंत समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आपला देश अगदी पुरातन काळापासून संपूर्ण जगाला प्रेरणास्त्रोत ठरलेला आहे.

            या भारतातील लोकांमध्ये भावंडांप्रमाणे प्रेम व स्नेह सतत राहू दे. हे देवा, असा मला आशीर्वाद दे. सर्व
पंथांमध्ये व संप्रदायांमध्ये एकता दिसू दे, त्यांच्या विचारांत फरक नसू दे. (सर्वजण एका विचाराने कार्यकरू दे.)सर्व हिंदू, ख्रिश्चन, मुस्लीम बांधव मग त्यांतील गरीब आणि श्रीमंत एकजुटीने आनंदात राहोत. यासर्वांमध्ये स्वातंत्र्याचा मनमुक्त आनंद वसू दे, असा वर मला दे. सगळ्यांना माणुसकी व राष्ट्रप्रेम कळू दे. सर्व प्रार्थनास्थळांवर एकत्र प्रार्थना होऊ दे.
 या देशातील कष्टाळू, पराक्रमी तरुण चारित्र्यसंपन्न दिसू दे, असा आशीर्वाद मला लाभू दे. परस्परांतील जातिभेद विसरून आमच्यात एकजूट होऊ दे. या जगातून मुळासकट अस्पृश्यता नाहीशी होऊ दे. जे दुर्जन व निंदक आहेत, त्यांच्या मनातही सत्याची चाड वसू दे, असा वर मला मिळावा 

        प्रत्येक घरात सौंदर्य व स्वर्गीय सुख रमू दे. बाहेरील परकी भीती आणि संकट नष्ट होऊ दे. , हा
 असा आशीर्वाद मला दया .



माझ्या स्वप्नातील भारत मराठी निबंध 
|Majhya swapnatil Bharat Marathi nibandh


             |Majhya swapnatil Bharat Marathi nibandh, माझ्या स्वप्नातील भारत हा चारित्र्यसंपन्न आणि नीतिमत्ता असलेल्या निष्ठावंतांचा आणि सच्चा देशभक्तांचा देश असेल. ज्या राष्ट्राचे चारित्र्य श्रेष्ठ असते ते राष्ट्र श्रीमंत असते. जिथे सचोटी प्रामाणिकपणा ठाई ठाई असतो तो देश जगात नंबर वन असतो. असाच असेल माझ्या स्वप्नातील भारत, गुणवंतांचा सच्चा देशभक्तांचा . 

        आज आपल्या भारताची अवस्था फार वाईट आहे. सांप्रदायिकता आणि जातीवाद असलेल्या भारताच्या अवस्था ही संपूर्ण जगात भारताचे बदनामी करत आहे. पण माझ्या स्वप्नातील भारतात मानवता हाच खरा धर्म असेल आणि हिंदू ,मुस्लिम, शीख ,ईसाई यांच्यात रक्ताचे नाते नसले तरी देखील हृदयाचे काळजाचे नाते असेल.


<>|Majhya swapnatil Bharat Marathi bhashan 

     माझ्या स्वप्नातील भारतात कोणतीही नाजूक कळी गर्भात खुडली जाणार नाही .कोणत्याही स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची किंवा तिच्यावर अत्याचार करण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही. याउलट कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडी चोळी देऊन तिचा मानपान करणाऱ्या छत्रपती शिवरायांनी म्हटलेले,
 अशीच आमची आई असती सुंदर रूपवती 
आम्हीही सुंदर झाले असतो बोलले शिवछत्रपती
              हे शब्द सर्वांचे आदर्श ठरतील असा माझ्या स्वप्नातील भारत असेल.
 हेच माझे स्वप्न आहे. 

              2020 मध्ये भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न बघणारे आपल्या भारताचे राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे शब्द मार्गदर्शक समजून ,माझा भारत देश सदैव पुढेच वाटचाल करत राहील. याच वाक्याचा धागा पकडून माझ्या भारत देशाने आरोग्य ,कृषी ,अर्थ या सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करावी असे माझे स्वप्न आहे. माझ्या स्वप्नातील भारतामध्ये माहिती तंत्रज्ञान विकसित असावे.

          दुर्दम्य   इच्छाशक्ती आणि प्रबळ आशावाद असणाऱ्या भारतीय नागरिकांचा समावेश असावा असे माझे स्वप्न आहे आणि माझ्या स्वप्नातील भारताला साकारण्यासाठी मी तुम्हाला आवाहन देत आहे की,
 तुमच्या मनगटात ताकद आहे
 सिंहाला कवेत घेण्याची
 तुमच्या नजरेत जरब आहे
 मृत्यूलाही घाबरवण्याची 
अरे पुन्हा एकदा आभाळाला लोळवण्याचे आवाहन द्या 
आणि पुन्हा एकदा तुमच्या, माझ्या आणि सर्वांच्या भारत देशामध्ये सोन्याचा धूर निघू द्या.

 एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने