|santulit aahar che mahatva Marathi| संतुलित आहाराचे महत्त्व 

    |santulit aahar in Marathi,  हे एक निर्विवाद सत्य आहे की, शरीराला तर आहाराची गरजआहेच पण त्याशिवाय मनालाही आहाराची गरज आहे.

|aahar mhanje kay |santulit aahar
आहार म्हणजे काय? आहाराचे प्रकार|आहार आणि त्याचे परिणाम |aahar mhanje kay |santulit aahar 


        एक प्रसिद्ध म्हण आहे. We are what we eat ,याचाच अर्थ अन्नाचा गंध मनाला तयार करतो. शुद्ध आहार हा ताज्या, हलक्या आणि पोषक तत्त्वांचा बनलेला असतो. उदा. फळे, भाज्या, अन्नधान्य इत्यादी असा आहार जरी शरीर सुडौल आणि सडसडीत ठेवतो .तरी मनाला तल्लख आणि स्वच्छ ठेवतो. योगासनांच्या सोबतीलाच शुद्ध आणि संतुलित आहार आदर्श शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकविण्याची खात्री देतो आणि संतुलित आहार शरीर व मनाला शक्ती देणारा सुरेख संगम आहे.

 
आपण योगिक मार्गाने आहार घेण्याचा अभ्यास करू.|santulit aahar che mahatva Marathi 


फळे, भाजीपाला, अन्नधान्य, कडधान्ये उत्पन्न करणारा सूर्य, वारा आणि पाणी यांची नितांत आवश्यकता असते हे कोणाला माहीत नाही ? भूमातेपासून आपल्याला ज्या काही प्राथमिक गोष्टी मिळतात त्यासर्वोत्तम असतात.
 मनुष्याचे दात आणि आतडे हे मांसाहारी प्राण्यापेक्षा वेगळे असतात. शरीरक्रियेच्या दृष्टीने शाकाहारी जीव हे मनुष्याशी साधर्म्य राखून असतात. याशिवाय मांसामध्ये विषारी घटकांचे प्रमाण जास्त असल्यामुळे मांसाहारी लोकामध्ये विषमतेचे प्रमाण ८०% एवढे असते.मटणामध्ये शरीराला अत्यावश्यक असणारे जीवनसत्व Vitamins आणि खनिज (Minerals) यांची कमतरता असते.परंतु प्रथिने अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे चांगल्या आरोग्याच्या दृष्टीने मांसाहार अनैसर्गिक आहे.

 यावर ही एक निर्विवाद सत्य आहे की, कोणीच चांगल्यारीतीने मांसाहार पचवू शकत नाही. कमीत कमी त्यांच्या मनात एकदा तरी विचार येतो की, आपण कोणाची तरी हिंसा करून आहार घेत आहोत.

आहाराचे प्रकार आणि परिणाम


   आपल्या शरीराला ऊर्जा देणे हे आहाराचे मुख्य कार्य आहे. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या प्रत्येक सजीव किंवा निर्जीव गोष्टींमध्ये ऊर्जा असते म्हणजेच पर्यायने आपण जे अन्न खातो त्यामध्ये ऊर्जा असते. यावरूनच आहाराचे जे प्रकार आहेत ते त्या आहारातील उर्जेवर अवलंबून आहेत.

आहाराचे खालील तीन प्रकार पडतात.|types of food


१)| सात्विक आहार(शुद्ध आहार)
२)| राजस आहार(तीव्र आणि क्रियाशील आहार)
३) |तामसिक आहार(अंध:कारमय आहार)


|शुद्ध - (सात्त्विक आहार)


            या आहारामध्ये प्रामुख्याने अन्नधान्ये, संपूर्ण आहार, ताजी फळे,भाज्या, दूध ,लोणी, चीज, शेंगा, मध, बिया, गवती चहा यांचा समावेश होतो. 

याचे शरीरावर प्रामुख्याने खालील प्रकारे परिणाम होतात.

१.हा सर्वात शुद्ध आहार आहे.
२.हा आहार योगाभ्यास करणाऱ्यांसाठी योग्य आहे.
३. हा आहार शरीराचे योग्य प्रमाणात पोषण करतो.
४.हा शांत आणि मनाला शुद्ध करणारा आहार आहे.
५.हा शरीर आणि मनाला ऊर्जेच्या प्रवाहाचा योग्य समतोल ठेवतो.

|राजसिक आहार-

  1. आहाराच्या या प्रकारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चविष्ट पदार्थाचा
  2. समावेश असतो. खूप गरम, आंबट, खारट, तुरट इत्यादी सहसा
  3. राजकीय आहार हा तळकट, तीक्ष्ण, मसालेदार भाज्या, चहा, कॉफीसारखी
  4. उत्तेजक द्रव्ये, मासे, अंडे, लोणचे, सॉस इत्यादी प्रकारांनी युक्त असतो.
  5. या आहाराचे प्रमुख परिणाम खालीलप्रकारे आहेत.
  6. हा आहार शरीर आणि मनातील संतुलन नष्ट करतो.
  7. तो मनाच्या ऐवजी फक्त शरीराला खाऊ घालतो.
  8. चवीला जास्त महत्त्व देतो.
  9. हा आहार तीव्र मनोविकारांना उत्तेजित करून मानसिक संतुलन बिघडवतो आणि मन बचैन करतो.

|तामसिक आहार


     या प्रकारात आहार मन किंवा शरीर या दोघांमध्ये कोणालाच फायदेशी ठरणारा नसतो. यामध्ये मध, तंबाखू, कांदा, लसूण, आंबवलेले पदार्थ, शिळे अन्न, जास्त. शिजलेले अन्न आणि तंद्री वाढविणाऱ्या पदार्थांचा समावेश असतो. जास्ती खाणे हे सुद्धा तामसी स्वभावाचे समजले जाते.

 या आहाराचे खालील प्रकारे परिणाम होतात.

  1. हा आहार ऊर्जेचा नाश करून आळशीपणा वाढवितो.
  2. शरीराचे व्याधीक्षमत्व कमी करतो.
  3. हा आहार मनामध्ये वाईट भावना, क्रोध, अहंकार आणि गर्व
  4. यांना उत्पन्न करतो.
  5. हा आहार शरीराला बेढब आणि कुरूप बनवितो.
  6. हा आहार घेणाऱ्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढवतो.
  7. हा आहार सेवन करणारा मनुष्य उत्तम गुणधर्मापासून दुरावला जातो.

निष्कर्ष: |aahar mhanje kay |santulit aahar 
   प्रिय मित्रांनो आता तुम्हाला कळले असेल की ,आहार म्हणजे काय, आहाराचे प्रकार कोणते ,आहार आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम. हा लेख वाचून तुमचे मनोगत नक्की व्यक्त करा.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने