www.upkarmarathi.com
नऊ रस माहिती
|RAS KE PRAKAR
|9 रस |9 RAS
नऊ रस माहिती |RAS KE PRAKAR |9 रस |
नाट्यविषय, अभिनय, नेपथ्य व इतर अंगे यांमधून भावनेचा जो परिपोष होतो (आणि आस्वाद्य होतो) त्याला रस असे म्हणतात. अशा रीतीने परिपुष्ट होणाऱ्या मुख्य अशा नऊ भावनांना नवरस असे म्हटलेले आहे:
हे नऊ रस खालील प्रमाणे आहेत.
(१) शृंगार, (२) हास्य, (३) करुण, (४) भीती,
(५) वीर, (६) रौद्र, (७) अद्भुत, (८) बीभत्स, (९) शांत.
(१) शृंगार:
स्त्री-पुरुषांच्या प्रेमाचा परिपोष झाला की शृंगार रस होतो.साजशृंगार करून आलेली कोणत्याही व्यक्तीकडून ओठावर स्मितहास्य, लाजरे डोळे, लाडिकपणा, बोलण्यात मृदुता (नाजुकता) असा अभिनय जेव्हा केला जातो तेव्हा त्यातून प्रेम ही भावना व्यक्त होते. तिला शृंगार रस असे म्हणतात.
स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्तनातून शृंगार रस प्रगट होतो.
(२) हास्य रस :
विनोदी प्रसंग घडतो आणि हसू येते. अशा प्रकारच्या भावनेचा परिपोष होतो त्याला हास्यरस असे म्हणतात.
विडंबन, चेष्टा- मस्करी ,विसंगती ,असंबद्ध भाषण अशा प्रकारच्या वर्णनातून हास्यरस प्रगट होतो.
(३) करुण रस:
शोककारक म्हणजेच दुःखकारक भावनांचा परिपोष होतो त्यातून करुण रसाची निर्मिती होते.
संकट ,दुःख ,वियोग अशा प्रकारच्या वर्णनातून करून रस प्रगट होतो.
(४) भीती रस:
भीतीदायक घटनांमुळे प्रेक्षकांच्या मनात निर्माण होणाऱ्या भावनेचा परिपोष म्हणजेच भीती रस होय.
खून ,मृत्यू, युद्ध ,राक्षस, सूड ,स्मशान अशा प्रकारच्या वर्णनांमध्ये भय रस प्रगट होतो.
(५) वीर रस:
उत्साहवर्धक भावनेच्या परिपोषाला वीर रस असे म्हणतात.
पराक्रम ,शौर्य ,धीर दाखवण्याचे प्रसंग अशा वर्णना मधून वीर रस आढळतो.
(६) रौद्र रसः
क्रोध ही भावना घटना, प्रसंग, अभिनय इत्यादींमधून परिपुष्ट करीतनेली असता तिच्यातून रौद्र रसाची निर्मिती होते. जेव्हा व्यक्ती आपल्या भावना प्रत्येक शब्दावर जोर देऊन, रागाने लाल होऊन, वरच्या आवाजात बोलते त्या वेळी तिचे डोळे
विस्फारलेले असतात, रागाने अंगाचा थरकाप होतो, भुवया वर चढलेल्या असतात. ही सगळी लक्षणे रौद्र रसाची आहेत.
क्रोध चीड किंवा रागाचे वर्णन जिथे असते त्यातून रौद्ररस प्रगट होतो.
(७) अद्भुत रस :
आश्चर्याने आपण थक्क होतो त्या वेळी मनाला वाटणाऱ्या भावनेला विस्मय असे नाव आहे. या भावनेचा अभिनयादी अंगांनी परिपोष केला जातो,
तेव्हा अद्भुत रस निष्पन्न होतो.
ज्या ठिकाणी आश्चर्यकारक गोष्टींचे वर्णन केलेले असते अशा वर्णनामधून अद्भुत रस प्रगट होतो.
(८) बीभत्स रस :
एखाद्या गोष्टीची किळस येणे, घाण वाटणे या भावनेसाठी जुगुप्सा असा शब्द आहे. या जुगुप्सेचा अभिनयादी अंगांनी परिपोष झाला, की बीभत्स
रस निर्माण होतो.
तितकारा वीट किळस अशा प्रकारच्या वर्णनांमधून बीभत्स रस प्रगट होतो.
(९) शांत रस:
जीवनाबद्दल अरुची वाटू लागते तेव्हा त्या भावनेला निवेद किंवा शम असा शब्द वापरला जातो. या भावनेचा अभिनयादी अंगांनी परिपोष होतो तेव्हा शांत रसाची निर्मिती होते.
ज्या ठिकाणी भक्ती, शांतता ,भाव अशा बाबींचे वर्णन केलेले असते त्या ठिकाणी शांत रस प्रगट होतो.
FAQs
1) नवरस म्हणजे काय?
साहित्यामधून मुख्यत्वे नऊ प्रकारच्या भावना
प्रकट होतात, असे मानले जाते. यालाच नवरस असे म्हणतात.
शृंगार रस, वीर रस, हास्य रस , करुण रस , रुद्र रस ,अद्भुत रस , भय रस आणि शांत रस हे नवरस आहेत.
2) मराठी भाषेत एकूण किती रस प्रकार आहेत?
मराठी भाषेत एकूण नऊ रस प्रकार आहेत.
3) कोणता रस सर्व रसांचा राजा म्हणून ओळखला जातो आणि का?
शृंगार रस सर्व रसांचा राजा म्हणून ओळखला जातो. हा सौंदर्य ,कला ,प्रेम व अध्यात्मिक भक्तीचा रस आहे .अनेक कला प्रकारांमध्ये हा रस सर्वाधिक चित्रण केलेला आढळतो म्हणून त्याला सर्व रसांचा राजा म्हणतात.
प्रिय वाचक मित्रांनो आज आपण नवरस म्हणजे काय नवरस कोणते?|RAS KE PRAKAR याविषयी माहिती बघितली. तुम्हाला माहिती नक्कीच उपयोगी पडेल. अजून माहिती हवी असल्यास आम्हाला नक्की सांगा .आम्ही आपल्याला नक्की मदत करू.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.