www.upkarmarathi.com

|Yoga history and benefits


योगशास्त्राचा इतिहास |yoga history in Marathi
Benefits of yoga for men ,women and students



      योगशास्त्र नेमके कसे सुरु झाले किंवा त्याचे मूळ कोणते हे निश्चितपणे सांगता येत नाही परंतु शिव हेच योगशास्त्राचे जनक आहेत असे मानण्यात येते.

    इसवी सन पूर्व 600 मध्ये भारतात जे दोन महाग्रंथ रामायण व महाभारत निर्मित झाले त्यामध्ये महाभारतात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीते द्वारे योगाचे उत्कृष्ट धडे शिकवले.
     
     पतंजली ऋषींचे योगशास्त्र आज सर्वोत्कृष्ट मानण्यात येते पतंजली ऋषींनी आपल्या बुद्धी सामर्थ्यामुळे भारतातील अनेक ऋषींमध्ये स्वतःचे आगळे वेगळे अढळ स्थान  निर्माण केले. 

      पतंजली ऋषींचा जन्म एका सूर्य पासून गणिता नावाच्या स्त्रीच्या पोटी झाला असे समजण्यात येते. जेव्हा ते पाण्यामध्ये सूर्याची उपासना करत होती तेव्हा हे ऋषी अलगत तिच्या ओंजळीमध्ये पडले म्हणून त्यांचे नाव पातंजली असे ठेवण्यात आले. पतंजली ऋषींनीच विविध श्वसनाचे व्यायाम आणि आसने यांचे सुंदर वर्णन केलेले आहे .त्याच्या आधारावरच आत्ताचा आधुनिक योग शिकवला जातो.

|योगाचे चार प्रकार |types of yoga

१. कर्मयोग


योगाचा हा मार्ग म्हणजे ज्या व्यक्ती व्यावहारिक आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या असतात. तसेच कोणत्याही फळांची वा बक्षिसांची अपेक्षा न करता निःस्वार्थ बुद्धीने स्वतःला परमेश्वराच्या स्वाधीन करतात.

२. भक्तीयोग


योगाचा हा मार्ग म्हणजे ज्या व्यक्ती स्वभावतःच भावूक असतात.हा मार्ग म्हणजे त्यागाचे आणि परमेश्वरावरील अलोट प्रेमाचे प्रतीक असते. यामध्ये योगी पूर्णपण स्वतःला परमेश्वराच्या स्वाधीन करतो.

३. ज्ञानयोग


योगाचा हा मार्ग म्हणजे ज्या व्यक्ती बुद्धिवादी असतात आणि उत्कृष्ट बौद्धिक पातळीच्या साहाय्याने आत्मज्ञान शोधण्याचा प्रयत्न
करतात.

४. राजयोग


योगाचा हा मार्ग सर्वांसाठी असतो. विज्ञानाच्या शारीरिक आणि मानसिक नियंत्रणाशी संबंधित असतो. यामध्ये शारीरिक आणि मानसिक शक्ती, आत्मिक शक्तीमध्ये परिवर्तित होते.

योगाचे आठ नियम|power of yoga


1.यम (सामाजिक शिस्त)


     या नियमामुळे व्यक्तीला समाजामध्ये मानाचे स्थान प्राप्त होते यामध्ये खालील बाबींचा समावेश केला जातो.
   सत्य बोलणे ,चोरी न करणे ,अहिंसा, अस्तेय, अहंकार न ठेवणे.

2. नियम (वैयक्तिक  शिस्त)

     यामध्ये खालील बाबींचे पालन करावे लागते.
    सदैव ईश्वराचे अस्तित्व मान्य करणे ,धर्मग्रंथांचे वाचन करणे, समाधानी राहणे ,आस्तिकता ठेवणे शरीर व मनाची शुद्धी करणे.  

३. आसने 

निरोगी शरीर, व्याधीमुक्ती, निसर्गाचा शारीरिक
अवयवांवर होणारा परिणाम, दीर्घायुष्य आणि चांगल्या प्रकारचे गुणधर्म ही असनांची फलसिद्धी आहे.

४. प्राणायाम


 नियमीत आणि स्वास्थ्य प्रदान करणाऱ्या
श्वसनास प्राणायाम म्हणतात. यामध्ये लयबद्ध श्वसन आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडून ऑक्सीजन आतमध्ये घेतात.

५. प्रत्याहार -


    यामध्ये बाह्य जगताशी संबंध तोडून अंतर्मनाने
मनःशांती मिळविण्याच्या क्रियेस प्रत्याहार म्हणतात.

६. धारणा


     यामध्ये भूमध्य (चक्रामध्ये) आपले सर्व लक्ष
क्रेंद्रित करावे लागते.

७. ध्यान -

     या नियमाध्ये विचलित न होता पूर्णपणे मन एकाग्रकरून बराच वेळ त्याच स्थितीमध्ये रहावे लागते. यामध्ये आपण आत्म्याशी संवाद करून एकाग्र करून बराच वेळ त्याच स्थितीत रहावे
लागते. यामध्ये आपण आत्म्याशी संवाद करून सत्याची प्रचिती अनुभवतो.

८. समाधी -


    ही योगाची शेवटची स्थिती आहे. परमात्म्याशी
एकरूप होता येते.

बह्ययोग |bahyayog

     वर सांगितलेल्या आठ नियमांपैकी पहिल्या पाच
नियमांना बाह्य योग तर शेवटच्या तीन नियमांना अंतः र्योग म्हणतात.

     बाह्य योगांचा जर नियमाने अभ्यास केला तर मनुष्य खरे बोलणारा,धार्मिक, सत्चरित्र, सुदृढ, मानसिकरीत्या उत्तम होऊन त्याचा आत्मा जागृत होतो.

अंतर्योग

अंतर्योगामध्ये उच्च आणि थोडेसे अवघड असे नियम आहेत.परंतु जर यांचा काळजीपूर्वक नियमाने अभ्यास केला तर व्यक्ती जगातील दुष्ट आणि वाईट गोष्टींपासून दूर राहू शकतो.


योगशास्त्राचे विशिष्ट गुणधर्म खालील प्रकारे आहेत.|benefits of yoga for women,men and students 



१) योग हे इतर व्यायामापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण योगाने शरीराचाआतून तसेच बाहेरून व्यायाम होतो.

२) यासाठी लहान जागा व अभ्यासासाठी लागणाऱ्या थोड्याशा गोष्टीही पुरेशा होतात.

३) इतर कोणाच्या मदतीशिवायही योगाचा अभ्यास करता येतो.

४) यामुळे वैयक्तिक शिस्त वाढून व्यक्तिमत्त्व विकसित होते.

५)यामध्ये खाण्यासाठी फक्त नैसर्गिक गोष्टी लागतात.

६)यामध्ये रक्ताभिसरण सुरळित होऊन रक्त शुद्ध होते.

७)यामुळे पचनसंस्था व उत्सर्जन संस्था व्यवस्थित होऊन व्याधीक्षमत्व वाढते.

|Importance of yoga

८)यामुळे श्वसनवह संस्थेचे कार्यसुरळित होऊन रक्त शुद्ध होऊन शरीराचे व्याधीपासून संरक्षण होते.

९)योगाभ्यासामुळे व्यक्ती चिरतरुण राहूल दिर्घायू उपभोगतो.

१०)'योग' शरीराचे मलबद्धता? उदरविकार, रक्तदाब, हार्निया, त्वचारोग यापासून रक्षण करतो.

११)योगामुळे उच्च प्रतीचे गुणधर्म व सुखायू योग्यास प्राप्त होते.

१२. योगामुळे अभ्यासकाच्या व्यक्तीत्वाचा विकास होऊन शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम राहते.

१३.योगामुळे अभ्यासकाचे स्वतःचे नियंत्रण वाढून त्याची शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढून सकारात्मक कार्य करण्यास उद्युक्तहोतो.

    

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने