www.upkarmarathi.com

    प्रिय मित्रांनो ,आज आपण या ठिकाणी 15 ऑगस्ट निमित्त एक सुंदर भाषण बघूया हे भाषण तुम्ही शाळेच्या ध्वजारोहणाच्या दिवशी अत्यंत सहजपणे पाठ करून सांगू शकता चला तर बघूया 15 ऑगस्ट निमित्त मराठी भाषण.

15 ऑगस्ट भाषण मराठी| स्वतंत्रता दिन भाषण|15 August bhashan Marathi|swatantrata din bhashan Marathi 




15 ऑगस्टचे भाषण तुम्ही डाऊनलोड करून पाहू शकता.

  या रुबाबात फडकणाऱ्या आपल्या तिरंग्याला वंदन. सर्व उपस्थित मान्यवरांना अभिवादन करून मी भाषणाला सुरुवात करतो.
      वरी केशरी
     मध्ये पांढरा 
    खाली हिरवा रंग 
   अशोक चक्र शोभतो
    निळसर रंग 
    आज आपल्या लाडक्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण जमलो आहोत. आज ज्या स्वातंत्र्याचा आपण अगदी मनसोक्त आनंद घेत आहोत ते सहज मिळालेलं नाही. देशभक्तांनी आपल्या रक्ताचे पाणी करून स्वातंत्र्याचे बीज रोवून ते रोप वाढवले .

     आपल्या हाडामासाचा नैवेद्य अर्पण करून देशभक्त नरवीरांनी स्वातंत्र्य देवतेला प्रसन्न करून घेतले.

    टिळक, गोखले, फुले, रानडे, गांधीजी या विभूतींनी स्वातंत्रता संग्रामात मोलाची योगदान दिले .

    राजगुरू ,सुखदेव, भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांसारख्या तरुण क्रांतिकारकांनी तरुणांमध्ये जोश भरला.

    देशभक्तांना आठवण्याचा हा दिवस आज आपण ध्वजारोहण करून अभिमानाने साजरा करत आहोत.

     या माझ्या महान तिरंग्याला वंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो व माझे भाषण संपवतो.
  || जय हिंद जय भारत||

मित्रांनो 15 ऑगस्ट निमित्त तुम्हाला हे भाषण कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा.

    खालील व्हिडिओ नक्की बघा.





Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने