www.upkarmarathi.com
प्रिय मित्रांनो ,आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. यावर्षीचा स्वातंत्र्य दिन आपण आनंदाने साजरा करूया. या स्वतंत्रता दिनानिमित्त भाषण करण्यासाठी या ठिकाणी 15 ऑगस्ट चे मराठी भाषण आपल्यासाठी अत्यंत साध्या व सोप्या शब्दात देत आहोत .हे 15 ऑगस्ट चे भाषण तुम्ही नक्की पाठ करा . चला तर बघूया एक सुंदर मराठी भाषण.
15 ऑगस्ट भाषण मराठी |15 August speech in Marathi| |
15 ऑगस्ट भाषण मराठी |15 August speech in Marathi|
आदरणीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती.
या रुबाबात फडकणाऱ्या आपल्या तिरंग्याकडे बघून मला काही काव्यपंक्ती आठवतात.
वरी केशरी मध्ये पांढरा
खाली हिरवा रंग
अशोक चक्रा शोभतो
निळसर रंग दिव्य
भारती जनता आमची
जाती जातीचा मेळ रे
झेंडा तिरंगी निशान आमुचे
खेळे प्रीतीचा खेळ रे
हिंद भूमीला पुजावयाला
मन हे झाले दंग अशोक चक्रा
शोभतो निळसर रंग
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. "इन्कीलाब जिंदाबाद! इन्कीलाब जिंदाबाद!" म्हणत भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हसत हसत फासावर गेले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ! अशी सिंहगर्जना करून टिळकांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.
"तुम मुझे खून दो ,,मैं तुम्हे आजादी दूंगा !" असे म्हणून सुभाष चंद्र बोस यांनी तरुणांमध्ये जोश भरला.
भारतीय स्वातंत्र्य लढ्याची सर्व सूत्रे गांधीजींनी आपल्या हातात घेतले. अगदी साधा वेश परिधान करून गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारला. अहिंसा व सत्याग्रह यांच्या सहाय्याने त्यांनी स्वातंत्र्यलढा तीव्र केला. सावरकर ,लाला लजपतराय ,नेहरू ,सरदार पटेल यांचीही त्यांना साथ लाभली. गांधीजींविषयी मला एक गाणे गावेसे वाटते,
दे दी हमे आजादी
बिना खडग बिना ढाल
साबरमती के संत तुने
कर दिया कमाल
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्यासमोर अनेक समस्या आल्या होत्या ,पण समस्या बघून घाबरणाऱ्याला भारत थोडीच आहे .त्या सर्व समस्या पार करत भारत सतत पुढे जाऊ लागला .आपल्या आपल्या भारत देशाचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सदस्यांनी मिळून तयार केले आपला भारत देश लोकशाही देश म्हणून वाटचाल करू लागला लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य होय लोकांद्वारे आज भारतात सर्वांना समान न्याय व अधिकार मिळत आहे अशा या माझ्या महान भारत देशासाठी मला एक गाणे गावेसे वाटते.
विविधतेतून ऐक्याचा दे
जगा नवा संदेश
असा आगळा जगा वेगळा
माझा भारत देश
आज या ठिकाणी आपण जमलेल्या सर्वांनी प्रतिज्ञा करूया की माझ्या भारत देशाचा अपमान होईल असे कोणतेही कृत्य माझ्या हातून होणार नाही. सरते शेवटी ज्यांनी आपल्या हाडामासांचा नैवेद्य अर्पण करून स्वातंत्र्य देवतेला प्रसन्न करून घेतले. त्या सर्व स्वातंत्र्यसेनानींना व भारत देशाला आणि तिरंग्याला वंदन करतो व तिरंग्यासाठी एक गाणे गातो
हिंद देश के निवासी
सभी जन एक है
रंग रूप वेश भाषा
चाहे अनेक हे
एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.
जय हिंद जय भारत
|15 ऑगस्ट मराठी छोटे सोपे भाषण #bhashan #swatantradin #marathi
हे भाषण लोक खालील प्रमाणे सर्च करतात.
15 ऑगस्ट मराठी छोटे सोपे भाषण #bhashan #swatantradin #marathi
15 august speech in marathi
|15 august speech in
marathi 2023
|15 august speech in
marathi for child
|15 august speech in
marathi pdf
|15 august speech in
marathi for 2nd standard
|15 august speech in
marathi shayari
|15 august speech in
marathi 2021
|15 August ...
||15 August ...
15 august speech in
marathi for students
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.