www.upkarmarathi.com
झाडे बोलू लागले तर (zade bolu lagli tar nibandh marathi)
प्रिय वाचक मित्रांनो तुम्हाला आरोग्यमय आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. या निबंधाचे किंवा विषयाचे टायटल बघून तुम्ही या ठिकाणी वाचनासाठी आलेला आहात तर तुमचं या ठिकाणी येणे वाया जाणार नाही .तुम्हाला वाचनाची एक सुंदर पर्वणी या ठिकाणी मिळणार आहे.
लहानपणापासून आपण सगळेच मामाच्या गावाला जाऊन झाडावर चढणे ,झाडावरील फळ तोडणे अशा प्रकारची मजा केलेलीच असेल. काहींच्या नशिबात ते सुख आलं नसेल ,परंतु झाड आपले खरेच मित्र आहेत हे तर आपल्याला मान्यच कराव लागेल.
हेच आपल्याला खूप आनंद देणारे झाडे जर बोलू लागली तर किती मजा येईल ना! झाडे त्यांचे दुःख, आनंद आपल्याला सहज सांगू शकतील तसेच आपल्या चुका सुद्धा आपल्याला समजावून सांगू शकतील.. तेच आपण आज जाणून घेऊया झाडे बोलू लागली तर |jhade bolu lagli tar Marathi nibandh या निबंधामध्ये..
झाड बोलू लागले तर |jhade bolu lagli tar Marathi nibandh
माणसाप्रमाणेच झाडे बोलू लागले तर फारच मजा येईल. झाडे त्यांच्या मनातील भावभावना, इच्छा, अपेक्षा आपल्यासमोर व्यक्त करू शकतील. काही झाडे हजारो वर्षांची देखील असतात .त्यांच्याकडे तर इतिहासाचे भरपूर दाखले आणि उदाहरणे देण्यासाठी ज्ञान असेल आणि ते ज्ञान आपल्याला सहज मिळू शकेल, झाडे बोलू लागले तर..
इतर सजीव जसे लहानाचे मोठे होतात आणि हळूहळू भाषा शिकतात त्याप्रमाणेच झाडांची रोपे देखील हळूहळू भाषा शिकतील. आधी ते बोबडे बोलतील. त्यांचे बोबडे बोलणे ऐकायला फार मजा येईल. झाडे बोलायला लागली तर मी त्यांच्याशी खूप गप्पा मारेन. त्यांना छान छान गाणे शिकवेन, गोष्टी शिकवेन.
आमच्या शाळेत जशा बाई आम्हाला अ आ इ ई अशी मुळाक्षरे शिकवतात तशीच मी देखील या लहान लहान झाडांना छान छान मुळाक्षरे शिकवीन आणि त्यांना बोलायला सांगेन. झाडांना बोलताना बघणे किती छान अनुभव असेल. झाडांना बोलताना बघून मला तर खूप आनंद होईल मग मी त्यांना जास्तीत जास्त शिकवेन आणि खूप हुशार बनवेल.
झाडे बोलू लागली तर माणूस व झाडे एकमेकांशी बोलू शकते आणि एकमेकांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. माणसांचे काय चुकते ते देखील झाडे सांगू शकतील. झाडे मानवाला कशा पद्धतीने मदत करतात हे झाडे बोलू लागले तर स्वतः माणसांना अधिक चांगल्या पद्धतीने समजून सांगतील.
झाडे बोलू लागले तर झाडांमध्ये विविध प्रकारे तर्क क्षमता देखील विकसित होईल आणि स्वरक्षणाची भावना जागृत होईल. स्वतःच्या रक्षणासाठी देखील झाडे एखादी विशिष्ट शरीर रचना तयार करू शकतील.
झाडे बोलू लागले तर ते देखील माणसांप्रमाणे संघटना तयार करतील. आणि त्यांच्या समस्या एकमेकांमध्ये चर्चा करून त्यावर उपाय सुचवतील. फळे कोणाला द्यायची आणि कुणाला नाही याविषयी स्वतःचे मत मांडू शकतील.
झाडे बोलू लागली तर वनस्पती आणि मनुष्य यांच्यातील नाते एका वेगळ्या स्तरावर जाईल. प्रगतीचा आणि विकासाचा एक नवीन आदर्श निर्माण होईल. झाडा झुडपाचे निसर्गाविषयी असलेले ज्ञान आणि मानवाची बुद्धिमत्ता यांच्या एकत्रितपणे मिलनाने प्रगतीचे नवीन क्षितीज दृष्टीपथास येईल.
हे वाचक मित्रांनो तुम्हाला झाडे बोलू लागले तर (zade bolu lagli tar nibandh marathi)हा मराठी निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.