www.upkarmarathi.com
मोबाईल पाहण्याचे आणि वापरण्याचे दुष्परिणाम |स्क्रीनटाईम चे दुष्परिणाम |Side effects of watching and using mobile | Side effects of screen time
या जगात प्रत्येक गोष्टीचा काही ना काही उपयोग होत असतो, तसाच तिच्यापासून काही तोटे देखील असतात .मग ती कोणतीही वस्तू असू द्या .उदाहरणार्थ- सांगायचे झाले तर प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात वापरली जाणारी सुरी. हिचा चांगला वापर केला तर तिच्यापासून छान छान भाज्या आपल्याला कापता येतात आणि स्वादिष्ट पदार्थ तयार करता येतात परंतु तीच सुरी जर एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या माणसाच्या हातात गेली ,तर ती कुणाचा जीव घेण्यासही मागे पुढे बघत नाही.
![]() |
मोबाईल वापरण्याचे दुष्परिणाम |mobile che dushparinam |
सध्याच्या काळात तर अशा अनेक वस्तूंची भरमार आहे .अगदी आपला लाडका मोबाईलच याचं एक जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे. हल्ली आपण जिकडे बघावं तिकडे प्रत्येक जण आपल्याकडच्या मोबाईल मध्ये डोकं खूपसून बसलेला दिसतो. आपल्या घराशेजारच्या माणसाशीदेखील समोर आल्यानंतर न बोलणारा व्यक्ती मोबाईलवर बराच वेळ आज दुसऱ्याशी चॅट करत बसतो.
|मोबाईल आणि नातेसंबंधातील दुरावा ||Mobile and distance in relationships
मोबाईलमुळे माणसांमधील नात्यांमध्ये दुरावा वाढत चालला आहे. एकाच घरात राहणारे लोकसुद्धा एकमेकांशी बोलण्याऐवजी आपापल्या मोबाईलमध्ये व्यस्त असतात. मोबाईल ज्ञान मिळवण्यासाठी तसेच संपर्कात राहण्यासाठी एक अत्यंत उपयुक्त साधन आहे , पण त्याचा अतिवापर झाल्यास तो एक व्यसन बनून जातो आणि मानसिक, शारीरिक आरोग्यावरही फार वाईट परिणाम करतो.
मोबाईलमुळे शैक्षणिक, सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच गोष्टी साध्य करता येतात, पण जर त्याचा वापर योग्य पद्धतीने झाला नाही तर तो वेळेचा अपव्यय, एकाग्रतेचा अभाव, आणि आळस वाढवणारे साधन ठरतो . म्हणूनच प्रत्येक वस्तूचा उपयोग कसा आणि कुठे करायचा हे आपण ठरवतो. वस्तू चांगली की वाईट हे तिच्या स्वरूपावरून नव्हे, तर तिचा उपयोग कसा केला जातो यावर अवलंबून असते.
म्हणूनच आपण सर्वांनी ही जबाबदारी स्वीकारून, मोबाईलसारख्या अत्याधुनिक साधनांचा योग्य प्रकारे, संतुलित वापर करावा, जेणेकरून त्याचे फायदे आपल्याला आणि समाजाला मिळतील आणि त्याचे दुष्परिणाम टाळता येतील.
प्रिय वाचक मित्रांनो जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्हाला, मोबाईल वापरण्याचे दुष्परिणाम, मोबाईलचे तोटे, मोबाईलचे वाईट परिणाम ,मोबाईलचा अतिवापर, मोबाईल व्यसन, मोबाईलचा वापर आणि परिणाम, मोबाईल मुळे होणारे नुकसान यावर आधारित जर काही लिहायचे असेल किंवा भाषणांमध्ये वापरायचे असेल तर तुम्हाला हा लेख अत्यंत उपयोगी ठरेल.
|मोबाईलचा आरोग्यावर परिणाम |मोबाईल आणि मानसिक आरोग्य |झोपेवर मोबाईलचा परिणाम |मोबाईलचे शारीरिक नुकसान
|मोबाईलचा मेंदूवर परिणाम |Effect of mobile on the brain
सध्या मोबाईलचा वापर अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण सतत करीत असतात. पण मोबाईलच्या अतिवापरामुळे मेंदूवर गंभीर परिणाम होऊ शकतात. सतत मोबाईल कडे पाहिल्यामुळे मेंदूवर ताण येतो त्याबरोबरच एकाग्रता कमी होते. विशेषतः लहान मुलांमध्ये ज्यावेळी मेंदूचा विकास होत असतो त्या काळात मोबाईलचा अतिवापर केला तर त्यांच्या स्मरणशक्तीवर आणि विचारशक्तीवर त्याबरोबरच निर्णय क्षमतेवरही वाईट परिणाम होऊ शकतात. मोबाईलचा वापर करताना सतत स्क्रीनवर बघावे लागते .त्यामुळे मेंदूला विश्रांती मिळत नाही आणि झोप सुद्धा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे शारीरिक तसेच मानसिक थकवा जाणवतो. मोबाईलवर शेतात गेम्स किंवा सोशल मीडिया वापरल्यामुळे मेंदू शतक अति उत्तेजित अवस्थेमध्ये असतो त्यामुळे चिडचिडेपणा नैराश्य किंवा तणाव देखील वाढू शकतो. त्यामुळे मोबाईलचा योग्य आणि मर्यादित वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.
|लहान मुलांमध्ये मोबाईलचा वापर |Mobile phone use among young children
सध्याच्या डिजिटल युगामध्ये लहान मुले देखील मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. मुलांना शांत ठेवण्यासाठी बऱ्याचदा पालकच त्यांना मोबाईल देतात. मोबाईल दिल्यामुळे मुलांचे रडणे देखील थांबते व पालकांना मुलांना सांभाळणे सोपे जाते असे वाटते परंतु सुरुवातीला हे सहज वाटत असले तरी देखील त्याचे दुष्परिणाम पुढच्या काळामध्ये गंभीर ठरू शकतात. मोबाईल मध्ये गुंतून बसल्यामुळे मुलांच्या शारीरिक हालचाली कमी होतात ते खेळाकडे दुर्लक्ष करतात म्हणून शारीरिक विकास होण्यामध्ये अडचणी होतात व त्यामुळे बौद्धिक विकासात देखील अडथळे निर्माण होतात. मोबाईल मधील आभासी आनंदामुळे त्यांना खऱ्या जगातील आनंद कळत नाही.
|विद्यार्थ्यांनी मोबाईल कसा वापरावा |स्क्रीन वेळ नियंत्रित कशी करावी |How should students use mobile phones |How to control screen time
- मोबाईल वापरताना विद्यार्थ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि शिस्तबद्ध पद्धतीने वापरणे आवश्यक आहे. मोबाईलचा उपयोग केवळ शिक्षणासाठी, माहिती मिळवण्यासाठी ,ऑनलाईन वर्ग तसेच शैक्षणिक ॲप्स आणि अभ्यास विषयक माहिती मिळवण्यासाठी करावा.
- आपला मौल्यवान वेळ सोशल मीडिया गेम्स किंवा आवश्यक ॲप्स मध्ये वाया घालवणे टाळावे.
- मोबाईलचा अतिवापर केल्यावर आरोग्यावर एकाग्रतेवर तसेच अभ्यासावर देखील वाईट परिणाम होतात. त्यामुळे मोबाईल वापरण्याचा एक ठराविक वेळ आणि कालावधी ठरवून घेणे गरजेचे ठरते.
- बऱ्याचदा पालकांच्या मार्गदर्शनाखालीच मोबाईल वापरणे हेच योग्य असते'
- एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की मोबाईल हे एक साधन आहे साध्य नाही.
|मोबाईल मुळे डोळ्यांचे नुकसान|मोबाईलचा रेडिएशन प्रभाव |Eye damage due to mobile |Radiation effects of mobile
- मोबाईल मधील अतिनील किरणामुळे डोळ्यांना नुकसान होऊ शकते.
- सतत स्क्रीन कडे बघितल्याने डोळे कोरडे होतात त्यामुळे डोळ्यांमध्ये आग होते.
- डोळ्याच्या नसांवर दबाव येतो आणि डोळे दुखू लागतात.
- डोकेदेखील दुखू शकते .
|मोबाईलचा वापर कसा कमी करावा |मोबाईल पासून सुटका|How to reduce mobile usage |Get rid of mobile
जर तुम्हाला मोबाईलच्या अतिवापरावर नियंत्रण मिळवायचे असेल तर तुमच्यासाठी खाली उपाय देत आहे.
- निश्चित वेळ ठरवा- दररोज मोबाईल किती वेळ वापरायचा हे एकदाचे ठरवून टाका त्यापेक्षा जास्त वेळ मोबाईल वापरायचा नाही.
- गरजेचे एप्स ठेवा- आवश्यकता असेल तेच ॲप्स मोबाईल मध्ये ठेवा गरज नाही किंवा तुमच्या उपयोगात ते ॲप येत नाहीत असे ॲप तात्काळ काढून टाका.
- नोटिफिकेशन्स बंद करा- बऱ्याचदा मोबाईलवर अनेक नोटिफिकेशन्स येतात आणि आपण ते बघत असतो त्यामुळे बराचसा वेळ वाया जातो. त्यासाठी आपल्यासाठी जे ॲप्स महत्त्वाचे आहेत फक्त त्यांचेच नोटिफिकेशन्स येतील अशी सेटिंग करून घ्या.
- ज्यावेळी तुम्ही अभ्यास करत असतात किंवा झोपण्याची वेळ असते त्यावेळी मोबाईल स्वतः जवळ ठेवू नका मोबाईल तुमच्याजवळ लगेच हाताला लागणार नाही इतक्या दूर ठेवा किंवा दुसऱ्या खोलीत ठेवा.
|डिजिटल डिटॉक्स
दररोज किंवा आठवड्यातून एक दिवस किंवा काही तास तरी मोबाईल पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा यालाच डिजिटल डिटॉक्स असे म्हणतात.
|सोशल मीडियामुळे मानसिक तणाव|मोबाईल आणि ताणतणाव|Mental stress due to social media |Mobile and stress
सोशल मीडियावर जास्त वेळ ऍक्टिव्ह राहिल्याने मनामध्ये सतत कोणते ना कोणते विचार चालू असतात. त्यातच एखाद्या ठिकाणी आपल्या मनासारखे न घडल्यास आपण आपले संतुलन गमावतो. म्हणून सोशल मीडियाचा कमीत कमी वापर करावा व मानसिक धक्क्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.
|मोबाईल मुळे सामाजिक एकांतता |Social isolation due to mobile
सध्याच्या काळात मोबाईलचा वापर अनेक सामाजिक समस्यांना जन्म देत आहे त्यामधीलच एक महत्त्वाचे संकट म्हणजे सामाजिक एकांतता. पूर्वीचे लोक घरातील सदस्यांबरोबर आपल्या मित्र परिवाराबरोबर अधिकाधिक वेळ घालवत असत परंतु आता मोबाईल मुळे लोक आपल्या परिवारातील सदस्यांपासून मित्रांपासून तसेच समाजांपासून दूर जाऊ लागले आहेत त्यांच्यातील संवाद संपला. संवाद संपल्यामुळे माणसाच्या मनामध्ये मानसिक तणाव निर्माण होत आहे.
|मोबाईल आणि मेंदूचा विकास
|मोबाईल मुळे मानदुखी
हे वाचायला विसरू नका.
- मी मासा बोलतोय
- मी शेतकरी बोलतोय
- झाडे आपले मित्र
- पैंजण कथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
- उपकार कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
अजून असे खालील कल्पनाविस्तार वाचायला विसरू नका .
- बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले
- क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
- थंडीतील सकाळ निबंध मराठी , थंडीचे दिवस
- अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक
- सत्यमेव जयते कल्पनाविस्तार मराठी निबंध
- एका पुतळ्याचे मनोगत eka putlyache manogat marathi nibandh
- वाचाल तर वाचाल Marathi nibandh vachal tar vachal
- भेदाभेद भ्रम अमंगळ मराठी कल्पनाविस्तार bhedabhed bhram amangal Marathi essay
या ब्लॉगवरील अजून काही वाचा
- शालेय जीवनात खेळाचे महत्व
- या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
- मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
- मी कचरा बोलतोय मराठी निबंध
- प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
- संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
- माझे घर मराठी निबंध / Marathi essay on my home in Marathi
- माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
- माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
- बालपण /रम्य ते बालपण
- माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay
- माझी आई - माझा छोटासा निबंध
- स्वामी दयानंद सरस्वती यांच्याविषयी माहिती वाचा .
- राजा राममोहन रॉय यांच्याविषयी माहिती वाचा .
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.