About us


About us
About us





   नमस्ते. 
       माझे नाव विजय . मी एक शिक्षक आहे. मला आजूबाजूच्या घटनांचे, परिस्थितीचे आणि निसर्गाचे निरीक्षण करायला खूप आवडते. निरीक्षणानंतर त्या अनुषंगाने काहीतरी लिखाण करणे हा आवडीचा छंद आहे. तसेच लोकांशी भरपूर गप्पा मारणे , त्यांच्या गप्पा शांततेने ऐकून घेणे, त्यांच्या अनुभवांमधून आणि प्रसंगांवरून लिखाणासाठी काही सामग्री मिळते की नाही याचा सतत शोध घेणे मला आवडते , व व्यक्तीने विचारलेल्या काही अडचणी व समस्या यांच्यावर मार्ग सुचवणे यात मला विशेष आवड आहे.
     आज पर्यंतच्या माझ्या आयुष्यात मी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि विविध बक्षिसे देखील मिळवलीत. याचा उपयोग विद्यार्थ्यांना देखील झाला पाहिजे असे मनापासून नेहमी वाटत होते.
    वाचनाचा व्यासंग असल्यामुळे अनेक पुस्तकेही वाचलीत स्वतः शिक्षक असल्यामुळे पुस्तकांचे महत्त्व हे मुळताच अंगात भिनलेले होते.
  जे जे आपणासी ठावे
 ते ते इतरांसी द्यावे 
शहाणे करून सोडावे सकळ जन

या उक्तीप्रमाणे आपल्या ज्ञानाचा इतरांना फायदा व्हावा या उद्देशाने या ब्लॉगची निर्मिती केली आहे.

* ब्लॉग निर्मितीची उद्दिष्टे *
  1. लेखन कलेचा विकास साधणे.
  2. निबंध लेखनासाठी  मार्गदर्शन उपलब्ध करून देणे.
  3. विविध प्रकारच्या निबंधांचे नमुने उपलब्ध करून देणे.
  4. वाचनीय मराठी कथा, बोधकथा ,बालसाहित्य मराठी भाषेमध्ये इंटरनेट वर उपलब्ध करून देणे.
  5. इंटरनेटवर मराठी भाषेतील माहितीचे प्रमाण वाढवणे. व विविध प्रकारची माहिती मराठीत उपलब्ध करून देणे.


             My name is Vijay. I am a teacher. I love to observe the surrounding events, conditions and nature. It is my hobby to write something after observation. I also enjoy chatting a lot with people, listening to their chats quietly, constantly exploring whether there is any material to write about from their experiences and occasions, and to suggest ways to address some of the issues and problems asked by the person.


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.